Skip to main content

हा पहाटवारा...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 20/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नाजूक बाहुंची मिठी अन् प्रेमाचा उबारा, मोहवून जातो मज हा पहाटवारा. केसांमधे लहरतो, श्वासामधे बहरतो, बाहूत या मोहरतो हा पहाटवारा. अनमोल आहे, मुक्त, अनंत आहे, आहे सृष्टीची अमृतधारा हा पहाटवारा. कधी सावली प्रेमाची, कधी उब वात्सल्याची, कधी गोड्सा शहारा... हा पहाटवारा. कधी सखे तुझा हा सुगंध घेऊन येतो. श्वासात भरून राहतो हा पहाटवारा.
लेखनविषय:

वाचने 1794
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कधी सावली प्रेमाची, कधी उब वात्सल्याची, कधी गोड्सा शहारा... हा पहाटवारा. हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धन्यवाद, काही सुचना असतील तर नक्कि कळवा. आपला क्रुपाभिलाशी, अंकुश चव्हाण.