नेता की अभिनेता ?
लई नाटकी नाटकी
या देशामधला नेता
मतलबापायी होतो
घडीघडी अभिनेता
झोपडीतल्या दीनाची
त्याला येई ना कदर
पण खुर्चीसाठी खातो
गरीबासंगे भाकर
तसे तर खुर्चीदास
सदा एसीतच राहे
पण मतासाठी मात्र
डोईवर भार वाहे
पैशांशीच देणे-घेणे
विकासाला मारी लाता
परि भाषणात त्यांच्या
करी विकासाच्या बाता
आपल्या छाताडावर
उड्या मारती हे मस्त
डोळ्यावरले झापड
काढा, राहू नका सुस्त
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1414
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता..अजून येऊ द्या.
छान कविता..अजून येऊ द्या.
तुमच्या सारख्या कवींची आज देशाला गरज आहे.
@तुमच्या सारख्या कवींची आज
In reply to छान कविता..अजून येऊ द्या. by गणामास्तर
@तुमच्या सारख्या कवींची आज देशाला गरज आहे. >>> देशाचं आहेच हो...! मि.पा.चं काय? -ते बोला. ;-)
मिपासाठी तुम्ही आहात की.
In reply to @तुमच्या सारख्या कवींची आज by अत्रुप्त आत्मा
मिपासाठी तुम्ही आहात की. कशाला चिंता करता?
@मिपासाठी तुम्ही आहात की.>>
In reply to मिपासाठी तुम्ही आहात की. by अन्या दातार
@मिपासाठी तुम्ही आहात की.>>>माताय विसरलोच होतो मी,पण अता लक्षात आलं,की लक्षात अणून द्यायलाही तुम्ही आहात की. :-p
+१
तो एक राजपुत्र आणि जनता त्रस्त !
खुप खुप धन्यवाद !!!!!!
खुप खुप धन्यवाद !!!!!!