Skip to main content

मिसळपाव दिवाळी अंक

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 13/10/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे. दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता. तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. - नीलकांत

वाचने 38429
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

कृपया अंक कधी प्रकाशित होणार आहे, कुठे उपलब्ध असेल व ई-आवृत्ती विकत घेता येईल काय ही माहिती द्यावी. अंकास शुभेच्छा.

In reply to by सस्नेह

इथच मिपावर अंक असेल, विकत घेता येणार नाही कारण तो मोफत असेल. ;) अंक प्रकाशित होण्याची तारीख मिपामालक कळवतील.

दिवाळीअंकासाठीचे लेख, कविता, पाककृती, भटकंती आदी सर्व वर दिलेल्या दिवाळी अंक नावाच्या आयडीवर पाठवावेत किंवा गवि यांना पाठवावेत. रामदास काका व गवि मिपाच्या दिवाळी अंकाची मुख्य जवाबदारी सांभाळताहेत. लेख प्रकाशित करू नये. व्यक्तिगत निरोप करून पाठवावा. - नीलकांत

In reply to by नीलकांत

लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि वापरावा. दिवाळी अंक या आयडी सोबतच मला आणि रामदास काकांना एकत्रच व्यनि करावा.

In reply to by एकुजाधव

आपण आपले लेख, कविता, पाकृ किंवा काय असेल ते गवि आणि रामदास यांना व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावेत. जर निवडले गेले तर दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध होईल.

इतके सिद्धहस्त लेखक मिपा वर उपलब्ध असताना काय बिशाद आहे की अंक चांगला होणार नाही.......... अनेक शुभेच्छा........

दिवाळी अंकासाठी लेखनाची मूळ मर्यादा २५ ऑक्टोबर वाढवून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या लेखनाचा विचार दिवाळी अंकासाठी केला जाईल. कृपया साहित्य "दिवाळी अंक", "गवि" आणि "रामदास" या तीन आयडींना व्यनिने पाठवावे.

मला आजच मिसळपाववर प्रवेश मिळालाय. आणि अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत कालपर्यंत होती. त्यामुळे साहित्य पाठवायचा असूनही, पहिला अंक फक्त वाचक म्हणूनच एन्जॉय करावा लागेल, असंच दिसतंय,.!

मनापासुन दिवाळी अंकास शुभेच्छा! एक विभाग 'अंडे न घालता' पाकक्रुती ह्या करिता राखुन ठेवणे. क्रुपया प्रतीसाद हलका घेणे.

In reply to by दिपक.कुवेत

अंडे घातल्यावर प्रतिसाद किंवा पदार्थ हलका होतो. अंडे न घालता जड होतो. ;)

नमस्कर मि.पा.करानो... मि मिपा चि नविन सदस्य आहे....मिपा च्य परिवारामधिल हिस्सा बनायाला खुप आवडेल.

वा वा! मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!