Skip to main content

छायाचित्र : पिवळे फुल

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 20/08/2008 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्याच एका बागेत टिपलेले हे पिवळे फुल. नाव कोणते आहे ते बघायचो विसरलो! :(
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12453
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कोल्बेर्राव ! भारी जमते बोवा फोटॉग्राफी तुम्हाला. हेहे पहिला प्रतिसाद म्हणजे ...." तुझी माझी धाव आहे वैद्याकडून वैद्याकडे" ;-)

मस्तच आहे !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हे डेलीया जातीचे फूल आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

स्वच्छ सुर्यप्रकाश असलेला दिवस[वेळ] प्रसन्न!! धनंजय व इतर मातब्बर मंडळींनी चर्चीलेले १/३, तिरके आदी नियम सांभाळून काढलेला दिसतो. :-) अवांतर - ह्या वैद्याला आजपासुन "चौकट राजा" उपाधी द्यावी का? ;-) कृ. ह. घे.

In reply to by सहज

सहजराव, अवांतरः चौकट राजा हा चित्रपट अशोक पाटोळ्यांच्या "बोन्साय" ह्या नाटकावर आधारित आहे. -- वैद्य

In reply to by एकलव्य

घोस आहे फुलांचा. अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयावरून 'मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं कुरूप असतात की काय?' हे आठवले :). [कृ. ह. घे.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


अतिशय सुंदर फुल आहे... मिंटी, एकलव्य यांनी टाकलेली फुले देखील सुंदर आहेत... स्वगतः आपल्याला काय पिवळे म्हणजे फक्त झेंडू. ही घ्या झेंडूची फूले...

आवडले. कोलबेर, आपली चित्रे छानच असतात. एकलव्या यांचे चित्र सुद्धा आवडले. मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते. - सूर्य.

डोमकावळा, चित्र छान आहे. बॅकग्राउंडला, विजेच्या तारा येतायत, त्या यायला नको होत्या. तसेच डाव्या बाजुला जी पाने येतायत ती सुद्धा खटकतायत. फक्त फुलांवर फोकस असता तर अजुन चांगले दिसले असते असे वाटते. - सूर्य.

मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते. धन्यवाद्.....बॅकग्राऊंड अशी असण्याचे कारण म्हणजे ते एक रानटी फुल आहे......

आणखी एक पिवळे फ़ूल. ह्यातले पाकळ्यांच्या मधे असलेले रंगीत कलाबतू काम मला खूप वेगळे वाटले म्हणून फ़ोटो घेतला चतुरंग

In reply to by चतुरंग

असे वाटते. सर्व हिरवळ कातरून फक्त मधले मोठे आणि उजवीकडचे फूल ठेवायला हवे. कलाबतूंची दोन "फुलपाखरे" नैरृत्य आणि ईशान्येच्या १/३वर यावीत.

वा! अवघी पिवळाई आवडली :) एकलव्याचा पुणेरी बिट्ट्यांचा गुच्छ तर लंबर १.. बिट्ट्याच आहेत ना का गोकर्ण? -('मिसळ'लेला) ऋषिकेश