(विशेष सुचना: सदर जाळ्यांचे आम्ही फक्त फोटो काढलेत, याउपर, का/ कधी/ कसे/ कुठे/ कुणी/ कशाला असे प्रश्न ओरीजिनल कोळ्यास विचारावे.)
एकावर एक, पण छोटा बहुदा मरणार थोड्याच वेळात..
गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा, पंधरा दिवसामाग पाखर शोधायला आम्ही माळशेजच्या खालच्या जंगलात घुसलेलो, सकाळी सहा ते बारा फिरुनही, एकही मनासारखा फोटो मिळाला नाही. जंगलात चोहुकडे भरपुर पाणी आणी दाट झाडोरा झाल्याने आमची सगळी मेहनत फुकट गेली, दुधाची ताकावर या न्यायाने, व रिकामा न्हावी भिंतीला तुंबडी लावी या भावाने मी ही कोळीष्ट्क टिपलीत.
शेवटची दोन चित्र सहज काढली, आवडली म्हणुन इथे टाकलीत..
छायाचित्रे आवडली व विशेष सुचना पण.
अवांतर - माझा एक मित्र रिव्हर्स लेन्स मॅक्रो तंत्र वापरून अश्या कोळ्यांचे व लहान सहान किड्यांचे जबरी फोटोज काढतो.
त्यामुळे तुंम्हाला नवे प्रयोग करायचे असल्यास या तंत्राबद्दल अवश्य विचार करा. बिंग.कॉम वरचा चार दिवसांपूर्वीचा वॉलपेपरमध्ये ड्रॅगनफ्ल्यायचा या तंत्राने काढलेला फोटो होता. होमपेज वर अजूनही उपल्ब्ध आहे.
माझ्या माहितीप्रमाणे नुसताच एक adapter मिळतो - त्याची मागची बाजू लेन्स च्या माउंट्सारखी असते आणि पुढची बाजू फिल्टर रिंग सारखी, ह्या फिल्टर रिंगला लेन्स उलटी करुन लावायची. माझ्याकडे आहे पण मॅन्युअल अॅपर्चर अॅडजस्ट करता येत नसल्यामुळे आणि माझ्याकडे खर्या मॅक्रो लेन्स extension tube सकट असल्यामुळे नाद सोडला.
हा दुवा बघा: reverse macro lens adapters
प्रतिक्रिया
कोळिष्टके सुरेखच आहेत्.पण
गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा,
मस्त !
धन्यवाद मालक..
मस्तच रे शैलेंद्र.
तुझाही येवु दे पहिल्या धारेचा
लवकरच येईल.
अरे, पहिल्या धारेचा माल
उत्तम छायाचित्रे
रिव्हर्स लेन्स मॅक्रो नक्की
स्पेअर लेन्सच हवी असे नाही
मुळात मी हे करुन पाहीलेल नाही
लई भारी फोटो आणि कोळी पण.
कोळीण
"कोळीणीचेही काढले असते तर
..........
भर...
आहा.. जबरदस्त.. तेरा कोळी
मस्त फोटोज..
नाही , जास्तच झालाय, प्रोसेस