कबुतरांचा दहशतवाद
मुंबईत आम्ही एका उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर रहातो. सोसायटीला आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. पहिली अनेक वर्षे या वरच्या मजल्याचे आम्हाला आणि घरी येणार्या परिचितांना कोण कौतुक होते. भरपूर हवा, प्रकाश यामुळे पंख्याची आवश्यकताही कमी भासे. तसेच, वर गच्चीत जाणे हे सोपे असल्यामुळे, ते एक विशेष आकर्षण होते. संध्याकाळी नुसते गच्चीत जाऊन पाय मोकळे केले व चौफेर दिसणारे विहंगम दृश्य बघत बसले तरी एखादा तास सहज जात असे.
कालांतराने सोसायटीतले जुने सदस्य सोडून जायला लागले व त्यांच्या जागा, अव्वाच्यासव्वा किंमतीला विकत घेऊन, अमराठी सदस्य वाढायला लागले. कुणाचे धार्मिक असणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे असे मी समजत होतो. पण या नवीन लोकांनी त्यांचे कल्चर बरोबर आणले. सोसायटीच्या दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारतींच्या गच्चीवर आणि खिडक्यांच्या बाहेरच्या वेदरशेडवर, हे पुण्यात्मे धान्य टाकू लागले. रोजच हे अन्नछत्र सुरु झाल्याने प्रचंड प्रमाणात कबुतरे गोळा होऊ लागली. कावळे व मैनाही हजेरी लावू लागल्या. पण त्यांचा काही त्रास नव्हता, कारण ते हुशार पक्षी असल्यामुळे घरांत येत नाहीत. कबुतरे मात्र सर्रास घरांत येऊ लागली. खिडकीच्या जाळ्या मोठ्या असल्यामुळे ती सहजच आंत प्रवेश करत. सुरवातीला काठीने हांकलल्यावर ती दिवसभर परत येत नसत. पण नंतर त्यांची संख्या वाढल्यावर तो एक मोठाच त्रास झाला. सोसायटीच्या मिटिंग्समधे सांगून देखील हे पुण्य गोळा करायला बसलेले सदस्य ऐकेनात. कबुतरांच्या विष्ठेने इमारतीचे नुकसान होते आहे, कारण ती अॅसिडिक असते, हेही त्यांच्या डोक्यात शिरेना.
सध्या स्थिती इतकी वाईट आहे की,दिवसा घरी असलो तरी खिडक्यांच्या सरकत्या काचांमधे बारीक फट ठेवावी लागते. ती चुकून जरी मोठी झाली तरी लगेच एखादी जोडगोळी आंत येऊन उंच कपाटावर बसते आणि ते 'कुटुरघुम' चालू होते. त्यांना हाकलायला गेले तरी, उघडलेल्या खिडकीतून पटकन बाहेर न जाता, ती दुसर्या बंद खिडकीवर धडका मारत रहातात आणि बाहेर जाईपर्यंत शिटत रहातात. अशा तर्हेने आम्ही या कबुतरांच्या दहशतवादाचा रोज सामना करत आहोत. जोपर्यंत त्या, कबुतराएवढाच मेंदू असलेल्या,, सदस्यांच्या डोक्यात उजेड पडत नाही तोपर्यंत हे असेच चालणार!
कबुतरे हांकलायला पेस्ट कंट्रोलचे उपाय महागडे आहेत. एखादा साधा उपाय कुणी सुचवू शकेल काय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ... ते पाखरांच्या
जंगली कबूतरे?
कबुतराचे रक्त
तिमा, कबुतरांवर आलेला
काही इलाज
राहता कुठे.?? आमच्या घरची
मी केलेले काही उपाय.....
माकड सेना
कबुतरांसाठी नामी उपाय म्हणजे
अल्ट्रासोनिक
बाल्कनीच्या खालच्या भागात,
आपण माणुस आहोत
त्रास देणार्या उंदरांना हाच