मुंबईत आम्ही एका उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर रहातो. सोसायटीला आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. पहिली अनेक वर्षे या वरच्या मजल्याचे आम्हाला आणि घरी येणार्या परिचितांना कोण कौतुक होते. भरपूर हवा, प्रकाश यामुळे पंख्याची आवश्यकताही कमी भासे. तसेच, वर गच्चीत जाणे हे सोपे असल्यामुळे, ते एक विशेष आकर्षण होते. संध्याकाळी नुसते गच्चीत जाऊन पाय मोकळे केले व चौफेर दिसणारे विहंगम दृश्य बघत बसले तरी एखादा तास सहज जात असे.
कालांतराने सोसायटीतले जुने सदस्य सोडून जायला लागले व त्यांच्या जागा, अव्वाच्यासव्वा किंमतीला विकत घेऊन, अमराठी सदस्य वाढायला लागले. कुणाचे धार्मिक असणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे असे मी समजत होतो. पण या नवीन लोकांनी त्यांचे कल्चर बरोबर आणले. सोसायटीच्या दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारतींच्या गच्चीवर आणि खिडक्यांच्या बाहेरच्या वेदरशेडवर, हे पुण्यात्मे धान्य टाकू लागले. रोजच हे अन्नछत्र सुरु झाल्याने प्रचंड प्रमाणात कबुतरे गोळा होऊ लागली. कावळे व मैनाही हजेरी लावू लागल्या. पण त्यांचा काही त्रास नव्हता, कारण ते हुशार पक्षी असल्यामुळे घरांत येत नाहीत. कबुतरे मात्र सर्रास घरांत येऊ लागली. खिडकीच्या जाळ्या मोठ्या असल्यामुळे ती सहजच आंत प्रवेश करत. सुरवातीला काठीने हांकलल्यावर ती दिवसभर परत येत नसत. पण नंतर त्यांची संख्या वाढल्यावर तो एक मोठाच त्रास झाला. सोसायटीच्या मिटिंग्समधे सांगून देखील हे पुण्य गोळा करायला बसलेले सदस्य ऐकेनात. कबुतरांच्या विष्ठेने इमारतीचे नुकसान होते आहे, कारण ती अॅसिडिक असते, हेही त्यांच्या डोक्यात शिरेना.
सध्या स्थिती इतकी वाईट आहे की,दिवसा घरी असलो तरी खिडक्यांच्या सरकत्या काचांमधे बारीक फट ठेवावी लागते. ती चुकून जरी मोठी झाली तरी लगेच एखादी जोडगोळी आंत येऊन उंच कपाटावर बसते आणि ते 'कुटुरघुम' चालू होते. त्यांना हाकलायला गेले तरी, उघडलेल्या खिडकीतून पटकन बाहेर न जाता, ती दुसर्या बंद खिडकीवर धडका मारत रहातात आणि बाहेर जाईपर्यंत शिटत रहातात. अशा तर्हेने आम्ही या कबुतरांच्या दहशतवादाचा रोज सामना करत आहोत. जोपर्यंत त्या, कबुतराएवढाच मेंदू असलेल्या,, सदस्यांच्या डोक्यात उजेड पडत नाही तोपर्यंत हे असेच चालणार!
कबुतरे हांकलायला पेस्ट कंट्रोलचे उपाय महागडे आहेत. एखादा साधा उपाय कुणी सुचवू शकेल काय ?
याद्या
28827
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवाळी येतच आहे. लवंगी
बाब्बौ!!
In reply to दिवाळी येतच आहे. लवंगी by गणपा
मांसाहारी
In reply to दिवाळी येतच आहे. लवंगी by गणपा
खी खी खी आमच्या कंपनीच्या शॉप
सर्व परिस्थिती अश्शीच..
गविशी सहमत
In reply to सर्व परिस्थिती अश्शीच.. by गवि
अरेच्या तुम्ही 'कबूतरघाणे'
कबुतरांचे आक्रमण
मण्यांची बंदूक
दुरुन भारी वाटतं.
अहो अजुन ऐका
In reply to दुरुन भारी वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कबुतरे >>>>दाणे>>>>उंदीर/ घुशी
एला हा वाढीव त्रास झाला.
In reply to कबुतरे >>>>दाणे>>>>उंदीर/ घुशी by सर्वसाक्षी
त्यापेक्षा प्रतिसादाचा कबुतर
In reply to एला हा वाढीव त्रास झाला. by गणपा
+१
In reply to कबुतरे >>>>दाणे>>>>उंदीर/ घुशी by सर्वसाक्षी
न्हाई वो गविभाऊ
In reply to +१ by गवि
ही घ्या रेशिपी
In reply to न्हाई वो गविभाऊ by विसुनाना
जोडनी कुटं गेली?
In reply to ही घ्या रेशिपी by विसुनाना
होय हो.. तेच की.. कबुतर
In reply to न्हाई वो गविभाऊ by विसुनाना
आँ....
In reply to कबुतरे >>>>दाणे>>>>उंदीर/ घुशी by सर्वसाक्षी
खर आहे ..मी पण वैतागलोय या कबुतरांना ..
कावळे पाळा. कबूतरांना कावळे
(No subject)
बाल्कनीत आहेत खर , पण कधी
..
In reply to बाल्कनीत आहेत खर , पण कधी by सुहास..
हा हा हा !
In reply to .. by गवि
कबूतर जा जा
विसुनाना नी सांगितलेला उपाय
ससाणा पाळता येईल का?
पी एच डी साठी माल मसाला
अशाच कबुतरीय प्रश्नाचा सामना
आयला .. इथे ही तोच त्रास हे
मी केलेला उपाय.
त्रास
अशाच कबुतरीय प्रश्नाचा सामना
अशाच कबुतरीय प्रश्नाचा सामना पैसाताईला करावा लागला होता असे आठवते.व्हय... हीच ती वैताग आणणारी कबुतरे पण संध्या मिपा गंडल्याने पैसा ताईच्या प्रतिसादला "पंख" फुटलेले दिसत आहेत ! ;)अगदी आमच्या रुममधल्या अडगळीत
समज की अनुभव
In reply to अगदी आमच्या रुममधल्या अडगळीत by सूड
@समज की अनुभव>>>
In reply to समज की अनुभव by ५० फक्त
योगायोग
तुम्ही वरच्या मजल्यावर म्हणजे
In reply to योगायोग by सुधीर
नंन
In reply to तुम्ही वरच्या मजल्यावर म्हणजे by sagarpdy
प्रतिसाद
एक दोन अहिंसात्मक उपाय सुचले आहेत
३)
In reply to एक दोन अहिंसात्मक उपाय सुचले आहेत by सहज
अजून एक अतिशय अहिंसात्मक उपाय
In reply to एक दोन अहिंसात्मक उपाय सुचले आहेत by सहज
युरोपियन उपाय
अरे वा... कबुतर खाण्याने दमा
३) तेही नाही झाले तर खिडकी उघडून ठेवा व कबूतर घरात येताच त्यांना दाणे टाकून समोर टिव्ही/ संगणकावर कबूतर रेसीपीचे व्हिडीओ लावा.खी.खी.खी सहजरावांनी खत्रुड कल्पना सुचवली आहे ! ;) मला इथे एक चावट रेसेपी देण्याचा मोह टाळता येत नाहीये... साहित्यः- गुबगुबीत,लुसलुशीत टच्च पाखरु, स्वतः मधील प्रयोगशिलता. ;) कॄती:- पाखराला "मंद आचेवर" ठेवावे,त्याच्या फडफडी प्रमाणे आच कमी-जास्त करावी.पाखराचा राग-रंग पाहुन त्याला इथुन-तिथुन "व्यवस्थितपणे" परतवुन घ्यावे.चुंबनाची खमंग फोडणी द्यावी.साहित्य अत्यंत नाजुक असल्याने त्याची हाताळणी "हळुवारपणे" करावी.पाखरु व्यवस्थित "तयार" झाले आहे याचा अंदाज येताच,नजाकतीने त्याचा आस्वाद घ्यावा ! ;) (प्रेमळ ससाणा)तुमची पाकृ वाचुन जुन्या मराठी
In reply to अरे वा... कबुतर खाण्याने दमा by मदनबाण
नावाप्रमाणेच प्रतिसाद
In reply to अरे वा... कबुतर खाण्याने दमा by मदनबाण
ऑ?
In reply to अरे वा... कबुतर खाण्याने दमा by मदनबाण
हॅहॅहॅ... ते पाखरांच्या
In reply to ऑ? by सहज
जंगली कबूतरे?
In reply to अरे वा... कबुतर खाण्याने दमा by मदनबाण
कबुतराचे रक्त
तिमा, कबुतरांवर आलेला
काही इलाज
राहता कुठे.?? आमच्या घरची
मी केलेले काही उपाय.....
माकड सेना
कबुतरांसाठी नामी उपाय म्हणजे
अल्ट्रासोनिक
बाल्कनीच्या खालच्या भागात,
आपण माणुस आहोत
In reply to बाल्कनीच्या खालच्या भागात, by परिंदा
त्रास देणार्या उंदरांना हाच
In reply to आपण माणुस आहोत by टवाळ कार्टा