Skip to main content

गावाकडचे जीवन

लेखक सचिन भालेकर यांनी शुक्रवार, 12/10/2012 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
a b c d e i

वाचने 6556
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

खरच छान वाटलं .मी वर्षातुन एकदाच चार ते पाच दिवसांसाठी गावी जायची . आठवड्याचा बाजार तालुक्याच्या गावी भरायचा .फ्रेश ताज्या ,नुकत्याच शेतातुन काढुन आणलेल्या भाज्या ,फ्रेश वातावरण ,शेतकरी भाजीवाले ,फळवाले मजा यायची सगळं बघुन .एक आंतरिक समाधान ,अजुनहि हे सगळं पूर्वापार जे आहे ते तसच पूढे चालु आहे . मला सगळ्यात जास्त हिरव्या आणि पिवळ्या लिंबाचा मांडलेला ढिग आवडायचा .माहित नाहि का? बस्स दिल गार्डन गार्डन होता था ;) :)

हे काही फक्त गावाकडील जीवन वाटत नाही. ;) भाजीपाल्याचे असे फटू पुण्याचा मार्केटयार्डात काढता येतील. फोटोतल्यासारखा गणपती आम्हाला नुकताच भेट म्हणून मिळालाय मग तो फोटू देऊन अमेरिकेतील भक्तीरसपूर्ण जीवन म्हणू शकेन का? (तो गाडीत कसा चिकटवलाय ते जरा सांगा म्हणजे मीही चिकटवीन म्हणते.)रुईचे असेच झाड पुण्यात माझ्या मामांच्या बागेत आहे. बाकी गायीचा अश्या प्रकारचा फोटू मी कोल्हापुरातून आणू शकेन. (कोल्हापूर हे मोठे शहर आहे, गाव नाही असे गृहित धरले आहे.)हलके घ्यालच. ;)

In reply to by रेवती

स्टेशनरीच्या दुकानात 'डबल साईड अधेसिव्ह टेप' मिळते ती वापरून गणपती किंवा कुठलीही वस्तू डॅशबोर्डावर चिकटवता येतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो. आणते टेप. गणपानं आधी फक्त दोन फोटू निरोपातनं पाठवले तेंव्हा समजले नव्हते. काही वर्णन नाही की काही नाही. नंतर समजलं.

In reply to by रेवती

काही वर्णन नाही की काही नाही.
स्वारी यात आमचा काय बी दोश न्हाई. आमी लिवलं होतं बैजवार. ते तुमास्नी दिसत नसंन तर कांताला गार्‍हानं घालावं. ;)

In reply to by रेवती

सातार्‍यात काही दिवसांपुर्वीच अशी मंडई पाहिली होती.. आणि खरेतर गावातली मंडई इतकी भरलेली नसते, असा माझातरी अनुभव आहे.. बाकी गाडीतल्या गणपतीबाप्पांचा गावाशी जोडलेला संबंध कळला नै..

गंपतीचा डब्बलरोल असलेला फोटो आवडला...