मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड
तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड..
मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग
तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग..
मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र
तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र
मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती..
माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1786
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
khup chaan.....
छान ( स्विट अन शोर्ट)
वा व्वा !
In reply to छान ( स्विट अन शोर्ट) by ज्ञानराम
(No subject)