Skip to main content

सहजच..१

अश्फाक यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
आपल्या रोजच्या जिवनात कळत ऩकळत किती लहान मोठे प्रसंग अविरत घडत असतात. कधी ते आपल्याला हसवता,,राग आनतात , कधी दुखी करतात तर कधी उद्वीग्न कधी समधानी करतात . अशाच लहान मोठ्या प्रसंगांना कलमबद्ध करन्याचा एक प्रयत्न करत आहे , बघा आवडले तर अजुन लिहीन. हो तर सुरुवात घरी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगापासुन करु या , मी व सौ सहजच गप्पा मारत बसलो होतो आणि विशय निघाला नविन घराच्या बांधकामाचा , एक जागा दोन वर्शा पासुन घेवुन ठेवली आहे पन काम चालु करयला या ना त्या कारनाने उशीर होत आहे. बोलता बोलता बांधने बांधकाम सारखे शब्द वारवार येत होते . बाजुलाच खेळत असली आमची ४ वर्षीय कन्या हे सर्व ऐकत होती . शेवटी न रहावुन ती जवळ आली आणि प्रश्न विचारला , पर , अब्बाजी घर बांधने के लिये इतनी बडी रस्सी कहा से लायेगे ? मग सर्व घर किती तरी वेळ हसत राहीले , आणि कन्येचा चेहरा गोरामोरा झाला .
राही

अशी निरागस मुले अवती भवती बागडत असली की मनातले घरातले विखारी विचार, कटुता कुठ्ल्याकुठे पळून जातात. असे लिखाण एखाद्या संस्थळावर कितीही भाबडे वाटले तरी त्यामुळे दोन क्षण का होईना, प्रसन्न वाटते. असे निर्व्याज लिखाण आणखी येऊ दे.
29/09/2012 - 21:38 Permalink
श्रीरंग_जोशी

अश्फाकभौ - लहान असताना या बांधा मुळे आमचाही जरा वांधाच व्हायचा. मुंबई दूरदर्शन वर आपण यांना पाहिलंत का बघताना प्रत्येक हरविलेल्या व्यक्तीला सडपातळ बांधा, मध्यम बांधा अशी सूचना प्रेक्षकांना दिली जायची. तेव्हाच्या माझ्या आकलनशक्तीप्रमाणे कुणी हरविले म्हणजे घरचे कुणी रागावले म्हणून पळून गेले असेच वाटायचे. आता अशी व्यक्ती कुणास सापडल्यास पुन्हा पळून जायचा प्रयत्न करेल म्हणून प्रथम तीस बांधून ठेवणे गरजेचे आहे असे वाटायचे. सडपातळ हा कुठल्या तरी पातळाचा प्रकार असावा असा माझा समज होता. कुणी जरा हट्टा कट्टा असेल तर मग मध्यम बांधा नाहीतर स्वतःला सोडवून पुन्हा पळून जाईल.
03/10/2012 - 08:31 Permalink
दादा कोंडके

In reply to by श्रीरंग_जोशी

किस्सा मस्तच! आणि या कार्यक्रमात फोटोत आणि त्या व्यक्तीच्या वर्णनात जमीन अस्मानाचा फरक असे. :) धाग्यातला अश्फाकयांचा सुद्धा किस्सा छानच.
06/10/2012 - 01:09 Permalink
प्रभाकर पेठकर

शीर्षक 'सहजच..१' पेक्षा, 'चिमखडे बोल' हे जास्त समर्पक वाटते.
06/10/2012 - 02:05 Permalink
आशु जोग

तुमच्या लेखनामुळे आम्हालाही काही गोष्टींची याद येवून गेली धन्यवाद ! बाकी तुमच्या धाग्याला आलेले काही प्रतिसाद अगदीच हे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे
06/10/2012 - 22:34 Permalink