मिपाचा पंचवर्षीय वाढदिवस नुकताच साजरा झाला.....
त्यानिमित्ताने अलिकडे उंबराचे फूल झालेल्या बर्याच लेखकांनी लेखनाची हौस पुरवून घेतली!! ;)
मिपामालकांनीही माळा साफ करावा तसं संस्थळ साफ आणि अद्ययावत करायचं बरेच दिवसांचं पेंडिंग काम उरकून घेतलं....
सगळं काही मस्त झालं, अपवाद एकच!
देवनागरीत टाईप करताच येईना हो!!!!
:(
धागा काढतांना, व्यनि पाठवतांना, आणि वरताण म्हणजे लोकाच्या खवत लिहिण्याचा आमचा मुख्य उद्योग करतांना देवनागरीत लिहायचा प्रयत्न केला कि रोमन अक्षरं उमटायची.....
भाषा बदला मध्ये जाऊन शंभरवेळा मराठी/ इंग्रजी टॉगल करून पाहिलं, पण मिपा ढिम्म्!!!
शेवटी कोकिळा जशी कावळीच्या घरट्यात अंडी घालते त्याप्रमाणे आधी गमभन वर जाऊन तिथे लिखाण करायचं आणि मग ते इथे कॉपी-पेस्ट करायवं असा द्राविडी प्राणायाम करायची वेळ आली....
मालकांना विचारलं की हे काय गौडबंगाल? तर त्यांनी उत्तर दिलं की हे उर्ध्वश्रेणीचं वरण आहे म्हणून!!!
आधी वाटलं की हा थट्टा करतोय!!!
किंवा पिडांकाकांच्या खात्याचा ठरवून गेम केलेला दिसतोय!!
पण माणूस मुळात अतिशय सालस आहे ही खात्री असल्याने मलाच काही घंटा कळलं नसावं अशी समजूत करून घेतली झालं!!!
नंतर हा प्रश्न फक्त मलाच पडलेला नसल्याची खात्री देणार्या खरडी व्यनि यायला लागले....
एका ताईने विंग्रजीतून 'मला मराठीत का लिहिता येत नाहिये?' असं विचारलं....
तिला सांगितलं की बहुतेक पराने तुझ्या खात्यात व्हायरस घुसवला असेल!!! :)
नाहीतरी आजकाल मिपावर काहीही धुमशान झालं की परावर त्याचा आळ घ्यायची फॅशन आहेच!! ;)
पण मिपावर देवनागरीत लिहिता येऊ नये म्हणजे पंचाईतच की!!!
एकतर आम्हाला रोमन लिपित लिहिलेलं मराठी वा हिन्दी चट्कन वाचता येत नाही. Tere mere samane किंवा mai tulasi tere aamgana ki वगैरे वाचायला लागलं की आमच्या तोंडून शिव्यागाळी बाहेर पडतात!!!
पण अहो त्या शिव्यांनाही रोमन लिपीत तो जोर नाही हो!!
आम्ही च्यामायला असं लिहिलं तर ते chyamayalaa असं उमटायचं...
आता हे आमच्या पेठकरकाकांना वाचून समजणार कसं आणि त्याबद्दल ते आमचा निषेध करणार कसा?
सगळाच गोंधळ!!
हे उर्ध्वश्रेणीचं वरण आता आंबट वरण लागायला लागलं होतं!!!
:)
शेवटी हा सगळा वैताग व्यक्त करायला (आणि जमल्यास त्याची टंचनिका निरखायला) पराच्या खरडवहीत गेलो...
पण टंचनिका गायब!
पराला जाब विचारला तर तो म्हणतो की धाग्यावर जरी फोटो टाकता येत असले तरी खव मध्ये टाकता येत नाहीयेत. कारण हेच!
आता मात्र ह्या उर्ध्वश्रेणीच्या आंबट वरणाचा भलताच राग आला!!!
म्हणजे धाग्यांवर चित्रविचित्र पदार्थांचे, पानाफुलांचे, विक्षिप्त ठिकाणांचे फोटो बघायला लागतात आणि खवमध्ये टंचनिका बघायची बंदी! अगदी घासूगुर्जींच्या खवमधली ती शिंक आलेली मधुबालासुद्धा गायब!! हा म्हणजे शुद्ध अन्याय झाला!!!!
आणि हे उर्ध्वश्रेणीचं आंबट वरण आम्ही ओरपायचं तरी किती दिवस? याला काही शेवट आहे की नाही?
शेवटी जर आज मराठीत टाईप करता आलं नाही तर पुढले काही दिवस मिपावर यायचंच नाही असा निर्धार करून आज मिपावर लॉगइन केलं....
बघतो तर पराचा निरोप! देवनागरीतून मराठी लिहिता येतंय म्हणून!!
काय आनंद झालाय म्हणता! त्या आनंदाला वाट करून देण्यासाठी हे प्रकटन!!
:)
मिपामालकांचं अभिनंदन!
आता जरा त्या खवमध्ये फोटो टाकायची सुविधाही सुरू करा...
म्हणजे पराच्या खवला भेट द्यायला बरं!!!!
;)
वाचने
9241
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
ही ही ....
रवळनाथाला
उर्ध्वश्रेणीचे (आंबट) वरण
तुर्तास
पाककॄती
+१, +१: अंड?
In reply to पाककॄती by नंदन
+११
In reply to पाककॄती by नंदन
उगाच काहीतरी तक्रारी
+१०००००
In reply to उगाच काहीतरी तक्रारी by राजेश घासकडवी
टिब्बल निषेध!
In reply to उगाच काहीतरी तक्रारी by राजेश घासकडवी
उगीच??
भारी!
अगदीच काही आंबट नाहीयेय
मला ही ...
शिंक आलेली घासुबाला खासच!! >>
:)
शिंक आलेली मधुबाला >>
मस्त..
हा हा हा
संक्षीप्त
अता टूलबॉक्स लवकर येवो,,आणी
शिंक आलेली घासुबाला >>खिक खिक..
आगाग्गाग्गा..............!
In reply to शिंक आलेली घासुबाला >>खिक खिक.. by सस्नेह
:)
In reply to शिंक आलेली घासुबाला >>खिक खिक.. by सस्नेह
गूळ नाय वो,
In reply to :) by गणपा
हाहाहा!
अंग आस्स
++++++++१११११११११११११११ भरपूर
In reply to अंग आस्स by चौकटराजा
सो मालक, हजर सभासद च्या लिंक
मराठी लिहीताना अक्षरे एकमेकात
'उर्ध्व लागणे' == कालचा गोंधळ