बाप्पा आमच्या घरी विराजमान झाले होते.आरत्या झाल्या, अथर्वशीर्षाचे पठण झाले. उकडीच्या मोदकांचा नैव्यद्य दाखवला गेला.जास्वंदीच्या झाडाला बरोबर आजच फुल आल होत. ते वाहील. बाप्पांची साग्रसंगीत पूजा पार पडली. आमचे मखर मात्र अजूनही बसवायचे बाकी होते. एका दिवसाची सक्तीची विश्रांती घेऊन परत शुक्रवारी आम्ही मखर बनवायला घेतला. त्यावर रंग आणि इतर नक्षीकामास सुरवात झाली. त्या दिवशी बाप्पाच आम्हाला जणू बुद्धी देत होते कस करत जावा ह्याची. आणि बघता बघता एक सुंदर मखर तयार झाले. बाप्पाच्या कृपेने माझे पण त्यात महत्वाचे योगदान होते :) पूर्ण झालेलं मखर पाहून तर विश्वास बसत नव्हता की, हे मखर आम्हीच तयार केल आहे. बाप्पा आणि मखर दोघांनी त्या हॉलला वेगळच सौंदर्य प्राप्त करून दिल होत.
वाचने
4345
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन आवडले हरिप्रिया.
मस्त....
गणेशोत्सव.
पेठेकर काका तुम्ही म्हणता तशी
In reply to गणेशोत्सव. by प्रभाकर पेठकर
काल फोटो दिसत नव्हते म्हणुन
आवडला लेख अन सजावट
फरच लोभस आहेत बाप्पा
फरच लोभस आहेत बाप्पा ,... >>>
छान