Skip to main content

सेन्टी मेन्टी : || You Bloody Civilian ||

सेन्टी मेन्टी : || You Bloody Civilian ||

लेखक सुहास..
Published on मंगळवार, 25/09/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
डिसक्लेमर : पात्रांच्या आणि प्रसंगाच्या अनूषंगाने शिव्या आणि ईग्रंजी शब्दांचा वापर करण्याची मुभा लेखकाने घेतली आहे, संपादक मंडळ, मालक त्याच्या शी सहमत असतील च असे नाही.हा निर्णय पुर्णतः माझा आहे. धन्यवाद ! रविवारी मनसेच्या मिंटीगा एकदा संपल्या की गप आपल पका च्या बियर शॉपीमध्ये जाव, शांतपणे बियर एक मारावी, आठवड्याभराच्या ताणाने जरा मेंदू नावाचा प्रकार हलका करावा, माझी बाईक त्या दिवशी मुद्दाम ग्रामपंचायतीसमोर असते.( तो एक सिग्नल असतो की उपाध्यक्ष आहेत आज मिटींग ला ) त्यामुळे आरामशीर चालत निघालो, तशीच चालताना जरा स्टाईल बी मारता येते ;) तुकाराम महाराज मंदीराच्या समोरच्या चौकातच कुणीतरी आवाज टाकला. " Hey, U bloody Civilian " भर चिखली पावसाळ्यामध्ये स्वच्छ धूतलेली बजाज चेतक, अंगामध्ये Air Force च्या वैमानिकाचा पोषाख , तलवारकट मिश्यांमध्ये प्रसन्न हास्य करत मला हात करणारा हा ईसम कोण आहे या विचारामध्ये मी पडलो. जसजशी त्याची ओळख पटत गेली, तस्स मन भुतकाळात शिरत गेल... +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ " हे क्काय चाललय ? I Don’t Want That ball knocking at my nose for next half an hour !! क्या गां* मरा रहे हो तुम लोग !! अगर ईतनी फटती है तो व्हाय आर यु ईन फुटबॉल टिम ! गो अॅन्ड प्ले सम गर्ल्ज गेम, काय म्हणता तुम्ही त्याला भे*** , लिंगोर्चा पाणी !! और तु ?? यु आर अलोन अॅट ईन फ्रन्ट ऑफ गोली , आणि तु ?? तुझ्या ******* , नाव घालवलस साल्या पेटिट च !! क्या सोच रहा था ?? दॅट येल्लो ड्रेस्सड मरीन गर्ल !! आणि तो सुन्या कुट गेला, पावडर लावुन फिर म्हणा पुढची सगळी वर्ष !! " माझा कोच अर्थातच माझा स्पोर्ट्रस टिचर फुल्ल टु भडकलेला होता, पण मुळात त्याची काहीच चुक नव्हती, अर्धा तास आम्ही फक्त डिफेन्स करत होतो. त्यांच्या डी पर्यंत देखील बॉल पोचत नव्हता आमचा, एक चान्स आला होता मला, पण त्यावेळी, घाईत किंवा ओव्हर-एक्साईटेड झाल्या मुळे माझा शॉट चुकला, बॉल पोस्ट पर्यंत गेलाच नाही. त्या आधी गोली ने एक सॉलीड जम्प मारून अडविला. ( हे बेण त्या गोल पोस्ट पाशी दिसत बी अस्स होतं की जस्सा पिंजर्‍यांमध्ये वाघ ! ). त्यात ही भो*** Air Force शाळेची टिम म्हणजे महाप्रचंड कडक शिस्तबध्द ! शॉर्ट पासेस, लॉन्ग पासेस आणि हवेतले पासेस खतरनाक क्लियर असायचे !! सगळा गेम जागच्या जागी !! अर्ध्या तासात आम्ही दोन यलो कार्ड खाल्ले होते, त्यांना एक ही नाही !! त्यात सगळे फिट आणि सगळे आडवे-तिडवे !! त्यांना पाहून रग्बी खेळायची सोडुन ही मंडळी फूटबॉल खेळायला का आली ? अस प्रश्न पडावा. एकाद्याला नुसता शोल्डर चा धक्का लागला तर प्लेयर सरळ मैदाना बाहेर, दुसर म्हणजे SSPMS च मैदान , दिसायला लाल माती असली तरी याच मातीमध्ये छोटे-छोटे मुरूमात असतात तसे दगड होते !! अर्ध्या च तासाच्या खेळामध्ये शब्दश घाम काढला होता . मुळात शहर स्तरावर असलेल्या या आंतर शालेय फूटबॉल स्पर्धेत या टिम च काही काम नव्हतं, पण कमीटी ला काही कामे नाहीत, आंमत्रिंत संघ या सदराखाली टिम चा समावेश थेट क्वार्टर्स- क्वालिफायर गेम मध्ये !! मी त्यांचा गेम पाहिला होता आधी, मी शाळेत असताना खडकीच्या रेंजहिल्स क्लब ला ही प्रॅक्टीस करायचो , तेव्हा याच टिमबरोबर एक दोन मॅच झाल्या होत्या . खर सांगायचे तर फूटबॉल सारखा गेम नाही, तो जितका बोलण्याचा किंवा रिप्ले करून बघण्याचा आहे, तितकाच तो खेळण्याचा आहे, त्यात बर्‍याचश्या कोणाला कळणार नाहीत अश्या टर्म/ जार्गन्स असतात. फॉल बॅक, ऑन यु , शुट द बॉल, रेज द बॉल, चेंज द गेम, फॅन आऊट, वॉच द बॅक !! अश्या टर्म्स मध्ये एक टर्म असते, " टी- शर्ट आऊट " नावाची , टी शर्ट आऊट म्हणजे ज्या टिमने पहिला गोल मारला त्याच्या प्रतिस्पर्धी टिमने गोल्टीसकट अंगातील टी-शर्टस काढुन, जो पर्यंत ईक्विलायजर मारत नाही तोवर, उघड्या अंगाने खेळायचे. ( ज्याला गेम माहीत आहे त्याच्या लेखी हा प्रकार महाप्रचंड अपमानास्पद आहे, पण तोच अपमान पुन्हा गोल मारण्याला उत्साह ही देतो.) त्या एक दोन मॅचेस मधे त्या शाळेच्या टिम ने रेंजहिल्स ची अशी हालत केली होती की गेम संपेपर्यंत ऊघड्या अंगाने खेळावे लागले होते. म्हणुन माझी क्वार्टर्स- क्वालिफायरला ही टिम म्हटल्याबरोबर .....असो त्यांच्या समोर आमच्या टिमची प्रॅक्टीस ती काय ?? दिवसातले दोन पिरियड्स स्पोर्ट्सचे, शनी-रवी एखादी प्रॅक्टीस मॅच, शिवाय ते शाळेतल शेवटचे ( त्याचे आणि आमचे ही )वर्ष असल्याने कोच अजुन खवळला होता. त्याची भाषा तशीच होती.सरते शेवटी मैदानात शिरताना कोच ने एक मेसेज दिला. " Everything is fair in love and war, if you cannot play, Don’t let them too " मेसेज क्लियर होता, " आता पाडापाडी सूरू होणार होती. रफ गेम चालु करावा लागणार होता, पण कोणासोबत? या धडधाकट ९ जणांबरोबर, विचार करूनही जीव जात होता, एक आयडिया होती, तंगड्यात तंगड !! नो मोअर फुटबॉल नाऊ, आता थेट कुस्ती !! पण पहिल्या दहा मिनीटातच आम्हालाच दोन सबस्टिट्युट घ्यावे लागले. एकाला गुडघ्याला क्रॅम्प आणि दुसर्‍या ची मांडी सुजून निघाली होती. गोल नव्हता झाला, ना त्यांचा ना आमचा !! रफ खेळण्याच्या नादात टिमची वाट लागत होती. पण खुमखुमी , खुन्नस कमी झाली नव्हती. वर कोच उभा राहुन ओरडत सुचना देत होताच !! १५ वा मिनीट...त्यांच्या कॅप्टन माझ्या गोल -पोस्ट पाशी बॉल घेवुन १० यार्डात होता....कोणाच्या ही ड्रिबंलिंग दाद देत नव्हता...ती मुव्ह च तशी होती , माझी अर्धी टिम डाव्या बाजुला स्ट्रेट लाईनला होती...आणि याने 'चेंज द गेम ' ची आरोळी टाकली, बॉल हवेतला पास होवून थेट याच्याकडे उजव्या बाजुला कॉर्नर ला आला ..उजव्या बाजुला मी आणि सुन्या .......याची स्पीड खतरनाक होती ..मी त्याच्या समोर.....मी थेट आडवा होवून पडलो .....बॉल ला टच झाला पण माझा पाय त्याच्या पायात अडकून तो दोन कोलांट्या खात पडला.....तसाच झटक्यात ऊठला.....अंगाला लागलेली माती, जखमा याची पर्वा न करता मागे वळला...माझ्या दिशेने आला...गंचाडी धरत मला " you bloody Civilian !! नीट खेळता येत नसेल तर बांगड्या भर हातात, नाहीतर मी भरून देतो गेम झाल्यावर ! " मी काही बोलणार तेव्हढ्यात रेफ्री ची शिट्टी वाजली,त्यामुळे वाचलो, एक फ्री किक मिळाली तरी त्याचा फायदा त्याला उचलता आला नाही. शेवटची पाच मिनीटे राहिली होती... लेफ्ट बुट असलेल्या सुन्याची आणि माझी एक मस्त मूव्ह चालली होती.....बॉल सेंटर मधुन शॉर्ट पासेस करत त्यांच्या गोल-पोस्ट पासून २० यार्डात आणला होता...सुन्या लेफ्ट कॉर्नर ला सटकला आणि मी बॉल घेवुन राईट कॉर्नर ला निघालो...तिकडे त्यांच्या कॅप्टन ला पाडल्याच्या खुन्नस मध्ये दोन बॅकी, सेंटर फॉरवर्ड आणि खुद्द कॅप्टन माझ्या साईडला आला...येताना गोल-पोस्ट च्या समोरच सेंटर मोकळ सोडल...सुन्या तिथे हजर आणि मला आवाज टाकला " बॅक बॅक !! अलोन अलोन !! " .....मी आवाजाच्या दिशेने बॅक पास टाकला...आणि मागे वळुन पाहे पर्यंत बॉल सुन्या च्या लेफ्ट बुट मधुन बंदुकीच्या गोळीसारखा बॉल पोस्ट कडे निघाला होता...गोल्टी ने जम्प टाकली...बॉल त्याच्या बोटांना स्पर्श करत जाळीला धडकला....मी क्षणभर निर्मुढ ....गोल !! म्हणत सुन्याने अक्षरक्षा अंगावर सूर मारली..... पुढची पाच मिनीटे आम्ही सगळे आमच्या हाफ मधे होतो.....पाच मिनीटे एकमेकांमध्ये पास करत टाईमपास करत होतो....शेवटी एकदाची शिट्टी वाजली आणि आम्ही जिकंलो ... खेळ संपल्यावर त्यांचा कॅप्टन माझ्यापाशी तेच प्रसन्न हास्य करत " वेल प्लेड यु ब्लडी सिव्हिलीयन " म्हणुन शेक हॅन्ड करूत स्पोर्टमनशीप दाखवुन गेला..पण नजरेत खुन्नस जशीच्या तशी होती...पुढे चालुन तो आणि मी एकाच कॉलेजला पण वेगळ्या सेक्शन ला गेलो...तो सायन्स ला मी कॉमर्स ला ...११ वी १२ वीच्या दोन वर्षात, बर्‍याच प्रॅक्टीस मॅच झाल्या...तो सायन्स चा कॅप्टन म्हणुन स्साला एक ही गेम हरला नाही...मी १२ वी नंतर परिस्थिती आणि राजकारण संभाळता - संभाळता फुटबॉल विसरून गेलो ..तो एन.डी.ए. ला गेला.....पायलट झाला ( आणि मी अजुन आंजांवर दळणं दळतो आहे ;) ) ....आणि आज ही तशीच फिट राहून खुन्नस देत होता. त्याला घेवुन बसलो . तो अजुनही खेळतो आहे गेम ! त्याने मला विचारले " खेलता है की नही अभी ? " ...काय सांगणार ....आयटीतील नौकरी, पार्ट-टाईम राजकारण आणि मंडळ संभाळण्यात जीव जातो आहे...मागच्या दिवाळीत , हा खेळ मिस करत असताना , लोहगावांत थोडा-फार ' आट्या-पाट्या ' खेळलो. स्केट्स आणुन सहा महिने झाले, त्याला देखील मुहुर्त लागेना, आयुष्यात असलेलं स्पोर्ट्स ' रम आणि कॅरम ' मध्ये सिमीत होवून बसलय ... At last I am a Civilian, A Bloody Civilian !! .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6535
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

:) आपण रात्रीच्या २, अडीच वाजता जे मैदान पाहिलं होतं ते याच बाबतीत का? ;-)

भलतंच झकास झालंय लिखाण. प्रत्यक्षात जसे संवाद ऐकले असते, वाचताना अगदी तस्साच फील आला.... असंच लिहिता रहा, भाई!

>>>>आयटीतील नौकरी, पार्ट-टाईम राजकारण आणि मंडळ संभाळण्यात जीव जातो आहे...मागच्या दिवाळीत , हा खेळ मिस करत असताना , लोहगावांत थोडा-फार ' आट्या-पाट्या ' खेळलो. सत्तर-ऐंशी ओळींमध्ये मस्त खुलवलेला लेख अगदी दिड ओळीत गुंढाळला त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा क्षणार्धात जमिनीवर आदळल्या. असो. पुढच्या वेळेस लेखाचा समतोलही पाहावा.

लेखाचा समतोल या पेठकरांच्या मताशी सहमत. किंचित स्पष्ट करत असे म्हणेन की, लेखविषयाचा समतोल पाहिजे. इतके चांगले लेखन असे आपल्याच हाताने आपटण्याचा सोस मात्र जुनाच आहे. कायम अस्थिर, चंचल... दीर्घ बैठक मारायची नाहीच. :-(

फुटबॉल सामन्यांचे रंजक वर्णन व एकंदरीत लेखच मनापासून आवडला. अवांतर - बंगबंधूंच्या सहभागामुळे महाविद्यालयात अनेक वर्षे कधीही पराभूत न झालेला आमचा फुटबॉलचा संघ त्याच बंगबंधूंना शेवटच्या वर्षी महाशिवरात्रीच्या प्रसादाचा ओव्हरडोस झाल्याने अंतिम सामन्यात मानहानिकारकरीत्या हरला होता त्याची आठवण झाली.

सहसा स्वताच्या धाग्यावर लिहायचे टाळत असतो मी , पण पेठकरकाकांना दुर्लक्षतो आहे असे वाटु नये, म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच !! मुळात मी लेखक नाही ( सिध्दहस्त तर अजीबात नाही) काही वास्तवातील जुजबी अनुभव लिखाणरूपी मांडुन भावनांना वाट करून देणे हा लिखाणाचा मुळ उद्देश ! अर्थात सिध्दहस्त व्हायची ईच्छा आहेच त्याच मुळे तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाची नोंद घेतली आहे :) आणि त्याबद्दल आपले आणि मोडकांचे धन्यवाद .. काही येक्क्षप्लेनेशन्स ( खर तर स्वत लिहीलेल्या वर हे करणे म्हणजे जोक उलगडुन सांगण्यासारखेच दुखदायक आहे.) एक आधी धागा लिहिला होता. ती: एक गुणगुण नावाचा, त्यात तुम्ही प्रतिसादांमधुन 'प्रेमा एवजी शारिरिक आकर्षणच जास्त वाटले ' असा धाग्यावर उल्लेख केला होता, तेव्हाही काही सांगावेसे वाटत होते, पण वयाच्या, मानाच्या आणि ज्येष्ठतेच्या मर्यादा समोर आल्या आज त्याच मी थोडासा विसरतो आहे आणि लहान तोंडी मोठा घास घेतो आहे त्याबद्दल क्षमस्व ! आंजावर आयडींना वय नसते हे जरी खरे असले तरी काही वयाने जास्त असलेली मंडळी ,यंग जनरेशन ला ( ईथे मी यंग जनरेशन म्हणतो आहे, चिल्लर पार्ट्या करणारी यंगर जनरेशन नाही.फार - फार तर दहा एक वर्षांचा फरक ! ) समजुन घ्यायला कमी पडतात असे माझे मत आहे . त्याच्याच एक संदर्भ म्हणुन " खर्‍या प्रेमात शारिरिक आकर्षण नसते. हे माझ्या मते अतिशय भंपक वाक्य आहे, प्रेम किती ही खरे असले तरी त्या मध्ये ( अ‍ॅज अ पिंच ऑफ अ सॉल्ट ! ) थोडे का असेना नैसर्गिकपणे आकर्षण असतेच ..असो हे झाले त्यावेळच्या त्या धाग्याबद्दल ,पण आज तो विषय मला टाळायचा नाहीये. आजच्या या लेखाबद्दल, मी नेहमी प्रयत्न करत असतो की , शब्द पाल्हाळ न लावता, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय वाचकांपर्यत पोहोचावा.(पुन्हा सगळ्या गोष्टींचा शॉर्ट-फॉर्म करणारी यंगर जनरेशन हे ही लक्षात घ्या ) आज कदाचित प्रयत्न फसला असावा. पण नो ईश्श्युज ..नेक्स टाईम :)

In reply to by सुहास..

खरं आहे. माझं वाक्य 'प्रेमा ऐवजी शारिरिक आकर्षणच जास्त वाटले ' असे आहे. ह्याचा अर्थ शारिरीक आकर्षण असूच नये असा होत नाही. भावनिक 'प्रेम' आणि 'शारिरीक आकर्षण' ह्या दोन्ही गोष्टी मान्य आहेत फक्त त्यांचे प्रमाण चुकले आहे असे मला म्हणायचे आहे. तुमच्याच वरील प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे 'अ‍ॅज अ पिंच ओफ सॉल्ट' मान्य आहेच की. म्हणजे तुम्ही (यंग जनरेशनचे प्रतिनिधी) आणि मी (म्हातार्‍यांचा प्रतिनिधी) ह्यातील जनरेशन गॅप जरी मान्य असली तरी इथे आपले विचार तंतोतंत जुळातातच आहेत नं. >>>>आंजावर आयडींना वय नसते हे जरी खरे असले तरी काही वयाने जास्त असलेली मंडळी. आंजावर आणि प्रत्यक्ष समोरासमोरही वाद घालताना समोरच्याच्या वयाकडे न पाहता मुद्द्यांकडे पाहून प्रतिवाद करावा. आणि आपली भाषा संयमित असेल तर वयाचा प्रश्न येतच नाही. >>>>शब्द पाल्हाळ न लावता, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय वाचकांपर्यत पोहोचावा... ती तर लेखकाची खरी कसोटी. मी माझ्या प्रतिसादात पाल्हाळाचा आरोप कुठेही केलेला नाही. उलट शेवट थोडक्यात आटोपलात असे म्हंटले आहे. प्रत्यक्ष खेळ, त्यातील जार्गन्स, प्रशिक्षकाशी संवाद आणि त्याच्या सूचना (मनाला पटल्या नसल्या तरीही) तपशीलवार आल्या आहेत. त्यातून तुमचे त्या काळातील खेळा बद्दलचे प्रेम दिसून येते. पण पुढे दुर्दैवाने किंवा परिस्थितीमुळे ते आटले आणि तुम्ही जीवनाच्या रहाटगाडग्यात गुंतुंन पडलात, खेळ- शारिरीक तंदुरुस्ती वगैरे त्याकाळातील महत्त्वाचे विषय मागे पडले त्यावर, खेळावरील व्यक्त प्रेमाच्या प्रमाणात, भाष्य दिसले नाही. मीही कोणी सिद्धहस्त लेखक नाही. पण जे मुद्दे जाणवले ते, आपले लेखन अजुन फुलण्याच्या दृष्टीनेच, आपल्या नजरेस आणून दिले. असो. मागिल धाग्यावरील प्रतिसादाचा उहापोह ह्या धाग्यावर करून आपणास काय साध्य करायचे होते कळले नाही. आपण त्या बाबत मला व्यनि करू शकला असतात किंवा 'त्या' धाग्यावरही तेंव्हाच प्रतिसाद देता आला असता. प्रामाणिक मत प्रदर्शन आपल्याला आवडत नसेल तर तसे व्यनितुन कळवावे. मी प्रतिसाद देणे बंद करीन पण उगीचच 'छान छान' असे प्रतिसाद देणार नाही.

In reply to by सुहास..

मुळात मी लेखक नाही ( सिध्दहस्त तर अजीबात नाही)
प्रस्तुत लेखक असल्या समजुती ओलांडून स्वत:च्या क्षमता ओळखेल तो सुदिन. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>प्रस्तुत लेखक असल्या समजुती ओलांडून स्वत:च्या क्षमता ओळखेल तो सुदिन. या वाक्यासाठी बिकांना जोरदार अनुमोदन.

जबरदस्त! मजा आली आणि सिव्हीलीयन तोही ब्लडी असल्याची जाणीव काळिज कुरतडून गेली. -(बल्डी सिव्हीलीयन) सोकाजी

फुटबॉल सामन्यांचे मस्त वर्णन व लेख मनापासून आवडला.

लेखन आवडेश. तुझ्या लेखनातून दरवेळी एका नव्या सुहासची ओळख होत असते.

मस्त रे सुहाश्या! :)

टिपिकल वाश्या ष्टाईल लेख.. आणि काही तरी भयंकर नसल्याने (नागपूर चाळ टाईप) अजून आवडला.. बारीक गोष्टी काढता येतील .. पण मग असलेल्या पदार्थाची मजा जाते.. लिहित रहा.. मध्ये कुठे गायबला होता..

लेख आवडला.

कोच चे नको इतके ओरडणे.. काही चुकलेले निर्णय.. अन त्यामुळे आम्हाला पाळावा लागलेला.. "टी शर्ट आउट" आणि मग.. मेच हरतोय.. हे पक्क झाल्यावर .. एक मुद्दाम चुकलेली फ्री किक .. त्याचा चेहऱ्यावर.. सगळं अगदी.. अगदी सगळाच आठवलं

जिवंत वर्णन, अगदि धावत्या कमेंट्री सारखा होत गेलेला भाग आवडला. मॅचच पाहत होतो जणू.

क्या बात है. अर्धवटराव