सेन्टी मेन्टी : || You Bloody Civilian ||
डिसक्लेमर : पात्रांच्या आणि प्रसंगाच्या अनूषंगाने शिव्या आणि ईग्रंजी शब्दांचा वापर करण्याची मुभा लेखकाने घेतली आहे, संपादक मंडळ, मालक त्याच्या शी सहमत असतील च असे नाही.हा निर्णय पुर्णतः माझा आहे. धन्यवाद !
रविवारी मनसेच्या मिंटीगा एकदा संपल्या की गप आपल पका च्या बियर शॉपीमध्ये जाव, शांतपणे बियर एक मारावी, आठवड्याभराच्या ताणाने जरा मेंदू नावाचा प्रकार हलका करावा, माझी बाईक त्या दिवशी मुद्दाम ग्रामपंचायतीसमोर असते.( तो एक सिग्नल असतो की उपाध्यक्ष आहेत आज मिटींग ला ) त्यामुळे आरामशीर चालत निघालो, तशीच चालताना जरा स्टाईल बी मारता येते ;) तुकाराम महाराज मंदीराच्या समोरच्या चौकातच कुणीतरी आवाज टाकला.
" Hey, U bloody Civilian "
भर चिखली पावसाळ्यामध्ये स्वच्छ धूतलेली बजाज चेतक, अंगामध्ये Air Force च्या वैमानिकाचा पोषाख , तलवारकट मिश्यांमध्ये प्रसन्न हास्य करत मला हात करणारा हा ईसम कोण आहे या विचारामध्ये मी पडलो. जसजशी त्याची ओळख पटत गेली, तस्स मन भुतकाळात शिरत गेल...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
" हे क्काय चाललय ? I Don’t Want That ball knocking at my nose for next half an hour !! क्या गां* मरा रहे हो तुम लोग !! अगर ईतनी फटती है तो व्हाय आर यु ईन फुटबॉल टिम ! गो अॅन्ड प्ले सम गर्ल्ज गेम, काय म्हणता तुम्ही त्याला भे*** , लिंगोर्चा पाणी !! और तु ?? यु आर अलोन अॅट ईन फ्रन्ट ऑफ गोली , आणि तु ?? तुझ्या ******* , नाव घालवलस साल्या पेटिट च !! क्या सोच रहा था ?? दॅट येल्लो ड्रेस्सड मरीन गर्ल !! आणि तो सुन्या कुट गेला, पावडर लावुन फिर म्हणा पुढची सगळी वर्ष !! "
माझा कोच अर्थातच माझा स्पोर्ट्रस टिचर फुल्ल टु भडकलेला होता, पण मुळात त्याची काहीच चुक नव्हती, अर्धा तास आम्ही फक्त डिफेन्स करत होतो. त्यांच्या डी पर्यंत देखील बॉल पोचत नव्हता आमचा, एक चान्स आला होता मला, पण त्यावेळी, घाईत किंवा ओव्हर-एक्साईटेड झाल्या मुळे माझा शॉट चुकला, बॉल पोस्ट पर्यंत गेलाच नाही. त्या आधी गोली ने एक सॉलीड जम्प मारून अडविला. ( हे बेण त्या गोल पोस्ट पाशी दिसत बी अस्स होतं की जस्सा पिंजर्यांमध्ये वाघ ! ). त्यात ही भो*** Air Force शाळेची टिम म्हणजे महाप्रचंड कडक शिस्तबध्द ! शॉर्ट पासेस, लॉन्ग पासेस आणि हवेतले पासेस खतरनाक क्लियर असायचे !! सगळा गेम जागच्या जागी !! अर्ध्या तासात आम्ही दोन यलो कार्ड खाल्ले होते, त्यांना एक ही नाही !! त्यात सगळे फिट आणि सगळे आडवे-तिडवे !! त्यांना पाहून रग्बी खेळायची सोडुन ही मंडळी फूटबॉल खेळायला का आली ? अस प्रश्न पडावा. एकाद्याला नुसता शोल्डर चा धक्का लागला तर प्लेयर सरळ मैदाना बाहेर, दुसर म्हणजे SSPMS च मैदान , दिसायला लाल माती असली तरी याच मातीमध्ये छोटे-छोटे मुरूमात असतात तसे दगड होते !! अर्ध्या च तासाच्या खेळामध्ये शब्दश घाम काढला होता .
मुळात शहर स्तरावर असलेल्या या आंतर शालेय फूटबॉल स्पर्धेत या टिम च काही काम नव्हतं, पण कमीटी ला काही कामे नाहीत, आंमत्रिंत संघ या सदराखाली टिम चा समावेश थेट क्वार्टर्स- क्वालिफायर गेम मध्ये !! मी त्यांचा गेम पाहिला होता आधी, मी शाळेत असताना खडकीच्या रेंजहिल्स क्लब ला ही प्रॅक्टीस करायचो , तेव्हा याच टिमबरोबर एक दोन मॅच झाल्या होत्या . खर सांगायचे तर फूटबॉल सारखा गेम नाही, तो जितका बोलण्याचा किंवा रिप्ले करून बघण्याचा आहे, तितकाच तो खेळण्याचा आहे, त्यात बर्याचश्या कोणाला कळणार नाहीत अश्या टर्म/ जार्गन्स असतात. फॉल बॅक, ऑन यु , शुट द बॉल, रेज द बॉल, चेंज द गेम, फॅन आऊट, वॉच द बॅक !! अश्या टर्म्स मध्ये एक टर्म असते, " टी- शर्ट आऊट " नावाची , टी शर्ट आऊट म्हणजे ज्या टिमने पहिला गोल मारला त्याच्या प्रतिस्पर्धी टिमने गोल्टीसकट अंगातील टी-शर्टस काढुन, जो पर्यंत ईक्विलायजर मारत नाही तोवर, उघड्या अंगाने खेळायचे. ( ज्याला गेम माहीत आहे त्याच्या लेखी हा प्रकार महाप्रचंड अपमानास्पद आहे, पण तोच अपमान पुन्हा गोल मारण्याला उत्साह ही देतो.) त्या एक दोन मॅचेस मधे त्या शाळेच्या टिम ने रेंजहिल्स ची अशी हालत केली होती की गेम संपेपर्यंत ऊघड्या अंगाने खेळावे लागले होते. म्हणुन माझी क्वार्टर्स- क्वालिफायरला ही टिम म्हटल्याबरोबर .....असो
त्यांच्या समोर आमच्या टिमची प्रॅक्टीस ती काय ?? दिवसातले दोन पिरियड्स स्पोर्ट्सचे, शनी-रवी एखादी प्रॅक्टीस मॅच, शिवाय ते शाळेतल शेवटचे ( त्याचे आणि आमचे ही )वर्ष असल्याने कोच अजुन खवळला होता. त्याची भाषा तशीच होती.सरते शेवटी मैदानात शिरताना कोच ने एक मेसेज दिला. " Everything is fair in love and war, if you cannot play, Don’t let them too " मेसेज क्लियर होता, " आता पाडापाडी सूरू होणार होती. रफ गेम चालु करावा लागणार होता, पण कोणासोबत? या धडधाकट ९ जणांबरोबर, विचार करूनही जीव जात होता, एक आयडिया होती, तंगड्यात तंगड !! नो मोअर फुटबॉल नाऊ, आता थेट कुस्ती !!
पण पहिल्या दहा मिनीटातच आम्हालाच दोन सबस्टिट्युट घ्यावे लागले. एकाला गुडघ्याला क्रॅम्प आणि दुसर्या ची मांडी सुजून निघाली होती. गोल नव्हता झाला, ना त्यांचा ना आमचा !! रफ खेळण्याच्या नादात टिमची वाट लागत होती. पण खुमखुमी , खुन्नस कमी झाली नव्हती. वर कोच उभा राहुन ओरडत सुचना देत होताच !! १५ वा मिनीट...त्यांच्या कॅप्टन माझ्या गोल -पोस्ट पाशी बॉल घेवुन १० यार्डात होता....कोणाच्या ही ड्रिबंलिंग दाद देत नव्हता...ती मुव्ह च तशी होती , माझी अर्धी टिम डाव्या बाजुला स्ट्रेट लाईनला होती...आणि याने 'चेंज द गेम ' ची आरोळी टाकली, बॉल हवेतला पास होवून थेट याच्याकडे उजव्या बाजुला कॉर्नर ला आला ..उजव्या बाजुला मी आणि सुन्या .......याची स्पीड खतरनाक होती ..मी त्याच्या समोर.....मी थेट आडवा होवून पडलो .....बॉल ला टच झाला पण माझा पाय त्याच्या पायात अडकून तो दोन कोलांट्या खात पडला.....तसाच झटक्यात ऊठला.....अंगाला लागलेली माती, जखमा याची पर्वा न करता मागे वळला...माझ्या दिशेने आला...गंचाडी धरत मला " you bloody Civilian !! नीट खेळता येत नसेल तर बांगड्या भर हातात, नाहीतर मी भरून देतो गेम झाल्यावर ! " मी काही बोलणार तेव्हढ्यात रेफ्री ची शिट्टी वाजली,त्यामुळे वाचलो, एक फ्री किक मिळाली तरी त्याचा फायदा त्याला उचलता आला नाही.
शेवटची पाच मिनीटे राहिली होती... लेफ्ट बुट असलेल्या सुन्याची आणि माझी एक मस्त मूव्ह चालली होती.....बॉल सेंटर मधुन शॉर्ट पासेस करत त्यांच्या गोल-पोस्ट पासून २० यार्डात आणला होता...सुन्या लेफ्ट कॉर्नर ला सटकला आणि मी बॉल घेवुन राईट कॉर्नर ला निघालो...तिकडे त्यांच्या कॅप्टन ला पाडल्याच्या खुन्नस मध्ये दोन बॅकी, सेंटर फॉरवर्ड आणि खुद्द कॅप्टन माझ्या साईडला आला...येताना गोल-पोस्ट च्या समोरच सेंटर मोकळ सोडल...सुन्या तिथे हजर आणि मला आवाज टाकला " बॅक बॅक !! अलोन अलोन !! " .....मी आवाजाच्या दिशेने बॅक पास टाकला...आणि मागे वळुन पाहे पर्यंत बॉल सुन्या च्या लेफ्ट बुट मधुन बंदुकीच्या गोळीसारखा बॉल पोस्ट कडे निघाला होता...गोल्टी ने जम्प टाकली...बॉल त्याच्या बोटांना स्पर्श करत जाळीला धडकला....मी क्षणभर निर्मुढ ....गोल !! म्हणत सुन्याने अक्षरक्षा अंगावर सूर मारली..... पुढची पाच मिनीटे आम्ही सगळे आमच्या हाफ मधे होतो.....पाच मिनीटे एकमेकांमध्ये पास करत टाईमपास करत होतो....शेवटी एकदाची शिट्टी वाजली आणि आम्ही जिकंलो ...
खेळ संपल्यावर त्यांचा कॅप्टन माझ्यापाशी तेच प्रसन्न हास्य करत " वेल प्लेड यु ब्लडी सिव्हिलीयन " म्हणुन शेक हॅन्ड करूत स्पोर्टमनशीप दाखवुन गेला..पण नजरेत खुन्नस जशीच्या तशी होती...पुढे चालुन तो आणि मी एकाच कॉलेजला पण वेगळ्या सेक्शन ला गेलो...तो सायन्स ला मी कॉमर्स ला ...११ वी १२ वीच्या दोन वर्षात, बर्याच प्रॅक्टीस मॅच झाल्या...तो सायन्स चा कॅप्टन म्हणुन स्साला एक ही गेम हरला नाही...मी १२ वी नंतर परिस्थिती आणि राजकारण संभाळता - संभाळता फुटबॉल विसरून गेलो ..तो एन.डी.ए. ला गेला.....पायलट झाला ( आणि मी अजुन आंजांवर दळणं दळतो आहे ;) ) ....आणि आज ही तशीच फिट राहून खुन्नस देत होता.
त्याला घेवुन बसलो . तो अजुनही खेळतो आहे गेम ! त्याने मला विचारले " खेलता है की नही अभी ? " ...काय सांगणार ....आयटीतील नौकरी, पार्ट-टाईम राजकारण आणि मंडळ संभाळण्यात जीव जातो आहे...मागच्या दिवाळीत , हा खेळ मिस करत असताना , लोहगावांत थोडा-फार ' आट्या-पाट्या ' खेळलो. स्केट्स आणुन सहा महिने झाले, त्याला देखील मुहुर्त लागेना, आयुष्यात असलेलं स्पोर्ट्स ' रम आणि कॅरम ' मध्ये सिमीत होवून बसलय ... At last I am a Civilian, A Bloody Civilian !!


याद्या
6535
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
खास सुहास स्टाईल लेख. आवडला.
वाह.. क्या बात है... खास...
आवडलं.
क्या बात हे साल्या
मस्त मस्त रिटन यू ब्लडी
मस्त.
व्वॉव!
वाश्या छान किस्सा.
छान किस्सा!
चांगला आहे.
अपेक्षा क्षणार्धात जमिनीवर
In reply to चांगला आहे. by प्रभाकर पेठकर
लेख आणि विषय
बरंचसं खेळातलं काय ते समजलं
सुहास, लेख एकदम फुल फॉरवर्ड!
आवडले
मस्त रे लई भारि लिहिलंय, मजा
सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद !
खरं आहे. माझं वाक्य 'प्रेमा
In reply to सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद ! by सुहास..
मुळात मी लेखक नाही (
In reply to सर्वच प्रतिसादांसाठी धन्यवाद ! by सुहास..
वाश्या लेख एक नंबरी आहे.
In reply to मुळात मी लेखक नाही ( by बिपिन कार्यकर्ते
जबरदस्त! मजा आली आणि
मस्त
झक्कास . एकदम झक्कास.
क्या लिखेला है भाय
मस्त रे !
___/\____ मस्त लिहील आहे...
:)
मस्त
छान
छान
मस्त लिहिलंस
मस्त.. आवडला..
आवडलं...
लाईव्ह कव्हरेज .... खेळाडूनं
व्वा !!