✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आरती सप्रेम..

म
मेघवेडा यांनी
गुरुवार, 12/02/2010 - 21:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18781 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

मेवे सुरेख रे.....

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/02/2010 - 21:17 नवीन
मेवे सुरेख रे.....
  • Log in or register to post comments

एक नंबर! काय फुल्ल फास्ट

असुर
गुरुवार, 12/02/2010 - 21:22 नवीन
एक नंबर! काय फुल्ल फास्ट लिहिलाय! आमच्या सोसायटीच्या आरतीची आठवण झाली! सेम टू सेम! गणेशोत्सवातल्या आरत्या म्हणजे निव्वळ दंगा, पण काय मजा येते! बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्‍या घेतो! केली झैरात? कुटं चान्स म्हणून सोडत नाय हे! --असुर
  • Log in or register to post comments

सह्ही !!

सूड
गुरुवार, 12/02/2010 - 21:40 नवीन
सह्ही !! Image removed. Image removed. बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्‍या घेतो! पुढल्या गणेशोत्सवासाठी त्वरित संपर्क साधणे. येत्या पाडव्यापूर्वी बुकिंग केल्यास घसघशीत डिस्काऊंट! ** अशी जाहिरात बदलापूर गावातल्या गणपतीच्या देवळातही असते ''सौ. क्षक्षक्ष ( देवळातल्या भटजीबुवांच्या मिसेस) यांच्याकडे हलव्याचे दागिने, तीळाचे लाडू ( हे सणानुसार बदलते, अन्यथा) चादरी, उशांचे अभ्रे इ. इ. योग्य दरात मिळेल." :D
  • Log in or register to post comments

मस्त आहे

निवेदिता-ताई
गुरुवार, 12/02/2010 - 21:25 नवीन
मस्त आहे रे.....................लेखन
  • Log in or register to post comments

येई वो विठ्ठले

मदनबाण
गुरुवार, 12/02/2010 - 21:29 नवीन
पंढरपुरी आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽहे...माझा माय बाप !!! असा लांब लचक सुर धरताना लयं धमाल असते बघ... :) क्लास लिहलं आहेस... :)
  • Log in or register to post comments

मस्त रे मेव्या, झकास लिहिलं

यशोधरा
गुरुवार, 12/02/2010 - 21:35 नवीन
मस्त रे मेव्या, झकास लिहिलं आहेस बघ! ! !
  • Log in or register to post comments

छान रे. एकदम ओघवत लिहिलयस

गणपा
गुरुवार, 12/02/2010 - 21:57 नवीन
छान रे. एकदम ओघवत लिहिलयस :)
  • Log in or register to post comments

एऽऽऽऽऽक लंबर रे!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/02/2010 - 22:03 नवीन
आख्खं चित्रच डोळ्यापुढं उभं केलंस की. चित्रदर्शी लेखन, चित्रदर्शी लेखन म्हणतात ते हेच असावं :)
आमच्याकडे दहांतली निदान सहा माणसे "दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे" असंच म्हणतात!
:D बरेचजण 'सदना' ऐवजी 'सजना' पण म्हणतात. =)) =)) सजना? दास रामाचा वाट पाहे सजना? =))
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां.. अगो गप्प बैस की जरा कार्टे.. अंबे तुजवाचोनि कोण पुरवील आशा.. आता फटके देईन हां मी मनू.. जय देवी जय देवी.. काय आहे गं सारखी कटकट तुझी.. सुरवर ईश्वर वरदे.."
=)) च्यायला! हे हाईट्ट आहे एकदम. :D झक्कास रे झक्कास लिहिलंयस.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिहिलंय ...

मस्तानी
गुरुवार, 12/02/2010 - 22:57 नवीन
गणपतीतल्या आरत्या खूप miss करते असं मी नेहेमी म्हणते पण म्हणजे नक्की काय ते सांगता येत नाही, हा लेख बरचसं सांगतो हे नक्की. (सर्वसामान्य आरत्या म्हणता येणारी)
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
Fri, 12/03/2010 - 00:08 नवीन
मस्त लेख रे, मेव्या! चिखलवाडीत जवळजवळ तासभर चालणार्‍या आरत्या आठवल्या.
कुणी तारसप्तकात लीलया खेळत मोठ्या उत्साहात पीतांबरधारी लंबोदरास आळवत असतो तर कुणी अरुंद बोळात अडकल्यासारखं एकाच सुरात, आपलंच तुंड वक्र करून सरळ शुंडेच्या विघ्नहर्त्यास आळवत असतो!
आता सगळ्या महिषासुरमर्दिन्यांचा आपापल्या घरातल्या महिषापेक्षा आपण वरचढ कशा आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होतो!
--- खी: खी: खी: बाकी आरतीतले शब्द चुकीचे म्हणणे, थोडे अधिकचे त्यात घालणे (काही मंडळी 'पंढरीचा महिमा वर्णावा किती' म्हणताना त्यात 'पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा' अशी भर घालतात) हे गमतीचे. 'हरितात्या'मधलं आरतीचं वर्णन 'सभासद इति' हे पायरी चुकून पडल्यासारखे येणारे शब्द इ. आठवलं :) किंचित अवांतर - मिभोकाकांनी (त्यांच्या पूर्वाश्रमीच्या अवतारात :)) सुखकर्ता दु:खहर्ता मधल्या शब्दांकडे लक्ष वेधले होते ('वार्ता विघ्नाची नुरवी'). त्या चर्चेत धनंजयांनी दिलेला लताबाईंनी म्हटलेल्या याच आरतीचा दुवा नुरवीनंतरच्या स्वल्पविरामासाठी ऐकून पहावा असा. 'गोणेस्पोती राया'चा दुवाही वाचनीय.
  • Log in or register to post comments

>> काही मंडळी 'पंढरीचा महिमा

मेघवेडा
Fri, 12/03/2010 - 01:00 नवीन
>> काही मंडळी 'पंढरीचा महिमा वर्णावा किती' म्हणताना त्यात 'पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा' अशी भर घालतात खरंच रे.. वास्तविक हे लेखात लिहिणार होतो पण म्हटलं कुणीतरी प्रतिसादांत विषय काढेलच म्हणून नाही लिहिलं! तेवढाच ट्यार्पी! ;) खूप सारी उदाहरणे आहेत अशी! गमतीदारच! एका ठिकाणी आरतीत मी ऐकलं होतं, "जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शनमात्रे नम, श्रवणमात्रे मन कामनापूर्ती!" आता गणपतीला ऐकायला हे लोक कुठे गेले होते ते काही कळलं नाही! ;) आणि शब्द चुकीचे म्हणण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठलाच्या आरतीत - "राही रखमाबाई राणी या सकळा, ओवाळितीं राजा विठोबा सावळां." या ओळीत बरेच जण सरळ "ओवाळितो राजा विठोबा सावळां.." म्हणतात! म्हणजे काय? विठोबा ओवाळतो की काय राहीबाई, रखमाबाईंना? हल्ली स्त्री-पुरूष समानतेच्या युगात बायका घेतील करून असं नवर्‍यांकडून पण त्या काळी, देवादिकांकडून अशा अपेक्षा ठेवण जरा अतिच नाही का? (गविंच्या या धाग्यावर हा प्रतिसाद लिहिला होता. तो प्रतिसादच खरंतर या लेखाची प्रेरणा) बाकी 'नुरवी पुरवी' च्या चर्चेतला धनंजयांचा प्रतिसाद म्हणजे, केवळ __/\__!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

भयंकर खुसखुशीत लेख.

शुचि
Fri, 12/03/2010 - 00:39 नवीन
भयंकर खुसखुशीत लेख :-D.
  • Log in or register to post comments

वाह!!! मस्तच!! खूप छान लिहिलं

प्राजु
Fri, 12/03/2010 - 00:45 नवीन
वाह!!! मस्तच!! खूप छान लिहिलं आहेस. खूपच छान!
  • Log in or register to post comments

व्वा व्वा..

उपास
Fri, 12/03/2010 - 05:34 नवीन
आरत्या म्हणजे नॉस्टेल्जिक करुन सोडणारा एकदम नाजूक विषय.. मस्तच लिहिलयस मेवे, आवडलंच... गिरगावात चाळीतल्या आरत्याना काय मजा येते (हो गुजराती आलेत बरेच तरीही) महाराजा.. काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानाचे.. आम्ही आता नेहमीच्या आरत्यांमध्ये प्रमुख स्वामींची गुजराथी आरती ही घेतो :) आरत्यां म्हणण्याच्या पद्धतीत सुद्धा वैविध्य आहेच.. काहीजण सार्वजनिक ठिकाणी आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी किंवा अंगभूत वळणाने असे शब्द वापरतात जसे नंदनने वर उदाहरण दिले आहेच तर काही जण त्या समूह गायनात शब्द आणि ताल पकडायला धडपडतात हे अगदी बघण्यासारखंच.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आरत्या कितीही आणि कधीही म्हटल्या तरी कंटाळा येत नाही. .चाळीत बर्‍याच जणांकडे गणपती आणि एकीकडच्या आरत्या म्हणून झाल्या की तितक्याच उत्साहाने त्याच आरत्या दुसरीकडे आणि त्याशिवाय सार्वजनिक आहेच.. घसे न बसले तरच नवल.. शिवाय गणपतीचे दहा झाले की नवरात्रांचे नऊ दिवस, पुढे खंडोबाचे नवरात्र असेल तेव्हा तेच आणि सत्यनारायण वगैरे असला की पुन्हा. संकष्टीचा उपास सोडताना चंद्रोदयालाही असतेच आरती दर महिन्यात. डॅलस मधे मराठी मित्राकडे गणपती बसवला होता आणि आरतीला उभे राहिलो आणि मी इतक्यावर्षांच्या सवयींनुसार (इथे आपटेंसारखा) सुरु झालो एका मागून एक तर काय लोकांना आरत्या येणे सोडाच ती म्हणण्यापेक्षा संपवण्याकडेच कल जास्त :) म्हणजे दोन्-तीन वेळा मधेच कुठल्या तरी काकूंनी घालिन लोटांगण सुरु केलं.. पण मी ही मुरलेला असल्याने भक्कम आवाजात सत्राणे उड्डाण उडवलं.. तेव्हापासून 'आरती' -फेम झालो हे ही खरं! पण आरती म्हणणार्‍यांचा ग्रुप असेल तर खरी मजा! महत्त्वाचं: 'आरती महासागर' माझ अतिशय आवडतं आरत्यांच पुस्तक आणि आरती भुवनसुंदराची आणि त्याच चालावरची आरती दत्तात्रयप्रभूंची अतिशय आवडती आणि जयजय त्रिंबकराज सुद्धा! त्यात काही आरत्या आणि चाली अशा आहेत की त्या आधीच्या पिढीतल्यांकडून शिकूनच घ्यायला हव्यात. अवांतर: मेवे ह्या आरत्यांसारखंच लग्नातल्या मंगलाष्टकांबद्दलही लिही रे.. लोकांना मंगलाष्टक लिहीण्याचा, तो गाण्याचा आणि लांबवण्याचा जो काही उत्साह विवाह नामक गदारोळात असतो की ज्याचे नाव ते.. एकदा मुहूर्तावर 'तारा बलंत चंद्र बलंत देव' झालं की भटजींचा जीव भांड्यात ;)
  • Log in or register to post comments

>> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे

मेघवेडा
Fri, 12/03/2010 - 15:52 नवीन
>> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आरत्या कितीही आणि कधीही म्हटल्या तरी कंटाळा येत नाही अगदी अगदी. गणपतीच्या दिवसांत घरोघरी जाऊन आरत्या गाजवलेल्या आहेत. उलट जितक्या जास्त वेळा म्हणू तितकी अधिक मजा येते! >> डॅलस मधे मराठी मित्राकडे गणपती बसवला होता आणि आरतीला उभे राहिलो आणि मी इतक्यावर्षांच्या सवयींनुसार (इथे आपटेंसारखा) सुरु झालो एका मागून एक अगदी सारखा अनुभव मला आला यंदा. मी म्हणत होतो पण पब्लिक बहुभाषिक असल्याने त्यांना कदाचित सगळे जोरदार बाऊन्सर गेल्याने "आता पुरेऽ" म्हणायची वेळ आली! ;) बाकी भुवनसुंदराची आरती आहेच गोड! "किंकिणिक्वणित नाद घणघणित वांकिवर झुणित नुपुरें झनन मंजराची!" हे लै भारी! अशीच महालक्ष्मीची आरती - वससि व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी" - फार सुंदर आहे. तशीच "जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती, गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती" ही पंचायतनाची आरती. ही तर आमच्याकडे कुठलंही कार्य असलं तरी म्हटली जाते. माझी सर्वात आवडती आरती हीच. फारच सुरेख नादमय रचना आहे! मजाच येते म्हणायला. शब्दही इतके सुंदर वापरले आहेत.. अहाहा! मस्तच! कुणाला हवी असल्यास सांगणे. लिहून देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

नेकी तरी पण म्हणे.... लिही

यशोधरा
Fri, 12/03/2010 - 16:09 नवीन
नेकी तरी पण म्हणे.... :D लिही इथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+१

असुर
Fri, 12/03/2010 - 16:19 नवीन
अक्षरश: सहमत! ओ आरतीकथेतील मेवेकुमार, भाव खाणं बंद करा आणि लिहा पटापट! उगाच धतिंग नाय पायजेल! --असुर क्याप्टन, 101st सिंहलद्वार रेजिमेंट, उत्तरद्वार, लंका बुद्रुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हा हा हा, घे!

मेघवेडा
Fri, 12/03/2010 - 16:21 नवीन
जय देव जय देव जय सुखकरमूर्ती, गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती ॥धृ.॥ अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा, आद्या सुरवरवंद्या नरवारणवेषा। पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा, निजपद देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा॥जयदेव.॥१॥ नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा, मन्मथदहना शंभो वातात्मजनयना। सर्वौपाधिविवर्जित तापत्रयशमना, कैलासाचलवासा करिति सुर नमना॥ जयदेव.॥२॥ पयसागरजाकांता धरणीधरशयना, करूणालव वारिसी भव वारिजदलनयना। गरुडध्वज भजनप्रिय प्रभु पीतवसना, अनुदिनी तव कीर्तनरस चाखो हे रसना॥ जयदेव. ॥३॥ पद्मप्रबोधकरणा नेत्रभ्रमहरणा, गोधनबंधनहर्ता द्योतक आचरणा। किरणस्पर्शे वारिसी या तम आवरणा, शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा॥ जयदेव. ॥ ४॥ त्रिभुवन उत्पत्ति पालन करिसी तूं माया, नाही तुझिया रूपा दुसरी उपमा या। तुझा गुणगणमहिमा न कळें निगमा या, करूणा करिसी अंबे मनी विश्रामा या॥ जयदेव. ॥५॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुंदर आरती, माझ्याकडे सुद्धा

स्पा
Fri, 12/03/2010 - 16:26 नवीन
सुंदर आरती, माझ्याकडे सुद्धा काही मस्त देवीच्या वेगळ्या आरत्या आहेत, ज्या सहसा म्हटल्या जात नाहीत जमलं तर टाकेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मस्त लेख...आरत्या हा विषयच छान आहे.

सुबक ठेंगणी
Wed, 09/26/2012 - 16:46 नवीन
ह्या लेखातल्या आपटे काकांसारखी माझी आज्जी होती. आम्ही मारे आरतीचं पुस्तक वगैरे घेऊन तिच्याबरोबरीने म्हणायला जायचो आणि मग झेपलं नाही की काही वेळाने शिस्तीत पुस्तक मिटून फक्त टाळ्या वाजवायचो. बादवे, मेवा तुला "सुंदर देखिली भवानी, तुळजापुर वासीनी तनमन ओवाळू" ही देवीची आरती माहिती आहे का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

तू ग्रेट आहेस मेवे! प्रसन्न

रेवती
Fri, 12/03/2010 - 04:01 नवीन
तू ग्रेट आहेस मेवे! प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां यातलं निजदासा मी निजलासा म्हणत असे. अनेक जण आपापल्या पद्धतीने आरत्या म्हणतात. ध्रुवपदाशी आल्यावर प्रत्येकजण अडखळायला लागतो. कारण 'जयदेव जयदेव जय श्री शंकरा' किंवा त्यापुढे 'स्वामी शंकरा' असे थोडे थोडे बदल असतात म्हणून. आजी आजोबांचे वय झाल्यावर आरत्या म्हणण्याचे प्रकार आमच्याकडे बदलले. त्यांचे सगळे दात गेल्यावर उच्चारही वेगळे होत आणि आम्ही नातवंडे तेच म्हणत असू.;) तश्याच प्रकारे मी 'निजदासाला' 'निजलासा' केले होते.;) त्यावेळचे कितीतरी चुकिचे उच्चार अजूनही तसेच चालू आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त लेख....आम्हालाही लहानपणी

शिल्पा ब
Fri, 12/03/2010 - 04:02 नवीन
मस्त लेख....आम्हालाही लहानपणी आरत्यांपेक्षा प्रसादाचेच कौतुक होते..आता नाही असे नाही ;)
  • Log in or register to post comments

मस्तच!!

बेसनलाडू
Fri, 12/03/2010 - 04:48 नवीन
आरतीपुराण फारच छान रंगवून सांगितलंय. आवडले. आरतीच्या मांडवातील वानरांच्या भुभु:कारांचा वगैरे प्रत्यक्ष दांडगा अनुभव असल्याने लेखाशी अधिक जवळीक साधता आली. (वाचक)बेसनलाडू आमच्या चाळीच्या गणपतीत स्पीकरवरून 'अलाउन्स्मेन्ट' करून न बोलावता झांजा-ढोलकीच्या साथीने भजने, लावण्या, गौळणी म्हणून सर्वांना आरतीसाठी (अनौपचारीकपणे) चौकात आमंत्रित केले जायचे, त्याची आठवण झाली. चौकातून त्यांचे स्वर कानावर पडले की लहानपणी जेवणाच्या ताटावरून उठून हातही न धुता आरतीला पळायचो. शक्य असेल तर आरतीच्या आधी अर्धा तासापासून चौकात ठिय्या देऊन बसायचो, गोंधळ घालायचो. आरत्यांमधील वेरिएशन्स, काही खास आरत्या - जसे दशावताराची, ज्ञानोबा माउलींबरोबरच (आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा) जवळजवळ सर्व संतांच्या आरत्या(आरती एकनाथा, आरती तुकारामा, आरती साईबाबा...), वैशिष्ट्यपूर्ण चालीत म्हटली जाणारी 'येई ओ विठ्ठले माझे माउली ये' (आणि पुढच्या ओळीत बेंबीच्या देठापासून लावलेला आवाज - निढळावरी करअऽऽऽऽऽऽ (!!!!!!!), निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे (!!)) ही तर कधीही विस्मृतीत न जाण्यासारखी! किंबहुना सगळ्याच आरत्या या चालीत म्हटल्याने किंवा त्यांच्या खास वेगळ्या चालींमुळे नि वेरिएशन्स मुळे आजही तोंडपाठ आहेत. म्हणताना पुस्तक हातात घ्यावे लागत नाही. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

व्वा मेवे! अगदी पुलकित लेखन

नगरीनिरंजन
Fri, 12/03/2010 - 05:29 नवीन
व्वा मेवे! अगदी पुलकित लेखन वाटले. गणपतीचा मंडप डोळ्यासमोर उभा राहिला आणि कानात झांजा- मृदुंग वाजायला लागले. जियो!
  • Log in or register to post comments

कडक लेख रे मेव्या

स्पा
Fri, 12/03/2010 - 06:50 नवीन
अगदी १०० % वस्तुस्थिती वर्णन केली आहेस... गणपतीतल्या आरतीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला..... गर्दीतून वाट काढत पुढे येणारी आपटेबुवांची पीतांबर (अर्थात पिवळं पडलेलं बनियान) धारण केलेली लंबोदर आकृती दिसू लागते! आणि सगळ्यांना "चालत गर्दीतुनि माझा कैवारी आला" अशी भावना होऊन "हुश्श.." होतं हॅ।हॅ हॅ कै च्या कै ;) अवांतर :- बाकी लेखात माझं नाव (प्रसन्न)आणि आडनाव (आपटे) वापरल्याबद्दल मला ROYALTI हवी आहे ;)
  • Log in or register to post comments

ओ आपटे, ते आपटे वायले हां !!

सूड
Fri, 12/03/2010 - 13:32 नवीन
ओ आपटे, ते आपटे वायले हां !! ढिस्क्लेमर लिवलाय ना मेव्यान् खाली ता वाचा जरा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हॅ हॅ हॅ

स्पा
Fri, 12/03/2010 - 13:38 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जिवंत वर्णन आणि एकदम वाचत

गवि
Fri, 12/03/2010 - 09:59 नवीन
जिवंत वर्णन आणि एकदम वाचत राहण्यासारखा.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Fri, 12/03/2010 - 10:19 नवीन
मस्त लेख, आरतीतले काही काही चुकीचे उच्चार आज आठवले की हसु येतं! :)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त...... अगदी

मधु बन
Fri, 12/03/2010 - 10:45 नवीन
एकदम मस्त...... अगदी सार्वजनिक गणपति मंडळ कींव्हा एखाद्या देवळातल्या आरतिला गेल्या सारख वाटल..
  • Log in or register to post comments

मस्त ! सुरेख !!

अवलिया
Fri, 12/03/2010 - 11:17 नवीन
मस्त ! सुरेख !!
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या द स्त रे मेव्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/03/2010 - 11:40 नवीन
ज ह ब र्‍या द स्त रे मेव्या :) अतिशय सुरेख वर्णन. मला तर आरतीचा प्रसंग आजुबाजुला घडतोय असेच वाटत होते.
  • Log in or register to post comments

मस्त रे.....

प्रभो
Fri, 12/03/2010 - 12:03 नवीन
मस्त रे.....
  • Log in or register to post comments

मस्त!!!!!

विलासराव
Fri, 12/03/2010 - 12:13 नवीन
लेख आवडला. अवांतरः मला तर सुखकर्ता दुखकर्ता ही एकच आरती येते. ति तरी न चुकता येते का ते पहावे लागेल आता.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

इंटरनेटस्नेही
Fri, 12/03/2010 - 12:40 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय मेवे. चित्रदर्शी

राजेश घासकडवी
Fri, 12/03/2010 - 14:07 नवीन
छान लिहिलंय मेवे. चित्रदर्शी आणि खुसखुशीत असा विरळा संगम असलेली लेखनशैली मस्त. अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

मस्तं !

प्राजक्ता पवार
Fri, 12/03/2010 - 15:30 नवीन
छान लिहलय .
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Fri, 12/03/2010 - 18:49 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

गणपतीच्या आरतीला

पैसा
Fri, 12/03/2010 - 20:17 नवीन
प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखं वाटलं. रत्नागिरीत सगळ्या शेजार्‍यांकडे सगळ्या आरत्या म्हटल्या गेल्याच पायजेत असा दंडक होता. आणि आरती संपली की नेनेवहिनींकडे कॉफी, जोश्यांकडे पोहे वगैरे असायचंच. "भक्त संकटी नानाऽ" म्हटलं की नाना मणेरकर डोळ्यासमोर यायचे आणि हसायला यायचं. इथे गोव्यात आरत्या म्हणजे मोठं प्रकर्ण असतं. घुमटाच्या साथीने म्हटलेल्या आरत्यांसाठी स्पर्धा असतात, आणि अशा आरत्या म्हणणारे स्पेशालिस्ट असतात. त्याना मुद्दम भरपूर बिदागी देऊन गणपतीत बोलावतात.
  • Log in or register to post comments

आमच्या इथेही...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/27/2012 - 01:07 नवीन
आमच्या इथेही 'नाना मणेरीकर' आणि 'श्रीकृष्ण कुलकर्णी' असे दोन ज्येष्ठ नागरीक होते. 'भक्त संकटी नानाSSSSSSSS ही आरोळी आम्ही नाना मणेरीकर ह्यांच्याकडे पाहून करीत असू. तर 'गोपीकांचे प्रेम पाहूनी श्रीकृष्ण भुलले' ह्या ओळीला आम्ही श्रीकृष्ण कुलकर्णी ह्यांच्याकडे पाहून हसत असू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मेवे! अगदी हलवा झालाय लेख.

स्पंदना
Sat, 12/04/2010 - 17:55 नवीन
मेवे! अगदी हलवा झालाय लेख. हे आवडल ते आवडल म्हणायला जाव तर सारा लेख च कॉपी पेस्ट करावा लागेल . डोळ्या समोर आले भोगुलकर आप्पा! ढेरपोटाचा उपयोग आरती ठेवण्या साठी करणारे.
  • Log in or register to post comments

लय भारी

ऋषिकेश
Sun, 12/05/2010 - 10:36 नवीन
मेव्या मेव्या! लय भारी! मजा आली दरवर्षी अजूनही अस्साच धिंगाणा आम्ही घालतो.. चांगली तास-सव्वातासभर आरती चालते आमची.. ते सगळं डोळ्यापुढे उभं राहिलं.. बर्‍याच आरत्यांवर वर तु आनि इतरांनी प्रतिसादात लिहिलं आहेच. या फेमस आरत्यांबरोबरच मला महालक्ष्मीच्या दोन्ही टंग ट्वीस्टर आरत्याही आवडतात (जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आणि अलिकुलकोमलबाले)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Sun, 12/05/2010 - 13:56 नवीन
मेव्या, आरतीपुराण आवडले, मस्तच लिहिले आहेस. लहानपणच्या सगळ्या आठवणी जाग्या करुन नॉस्टेल्जिक केलेस, आता दिवसभर तरी डोक्यातून ते हलणार नाही आणि त्रास होणार आहे.. स्वाती
  • Log in or register to post comments

LOL!

यशोधरा
Fri, 09/21/2012 - 13:42 नवीन
आज पुन्हा एकदा वाचले आरतीपुराण! एकदम फ्रेश वाटले वाचून. अवांतरः झैरात करुन दिलेय! :D
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय...

ज्ञानराम
Wed, 09/26/2012 - 10:26 नवीन
मस्त लिहीलय... माझी आजी लवथवती विक्राळा म्हणायच तर "लवलवती" विक्राळा म्हणायची.. आणी अजूनही म्हणते. ( मला ही आरती सुरु झाली की किंचीत हसू येते) लहाण पणी तेच म्हणत होतो आम्ही पण एकदा पुस्तक हातात पडले तेव्हा वाचले की आपण अर्थाचा अनर्थ करतोय... Image removed. आणी घालीन लोटांगण ला पुढे काय घोटाळा झालेला अस्तो काय माहीत...( कायेन वाचा...............) मधुनच आवाज कमी होरो.....परत हरे राम हरे रामसुरु झालं की मात्र लोकांचा आवाज वाढतो...
  • Log in or register to post comments

लईच मजा येते असं करायला.

sagarpdy
Wed, 09/26/2012 - 15:29 नवीन
>>> मग "प्रल्हादाकारणेंऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ला पंधरा सेकंदांनी श्वास सुटला तरी एकदा ब्रेक घेऊन परत.. "हेऽऽऽऽऽऽऽऽहे.." असं ताणत ढोलकी वाजवणार्‍याचा पेशन्स टेस्ट केला जातो! अगदी अगदी! लईच मजा येते असं करायला. लेख मस्त! उत्खननासाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्तच!!

प्रसाद गोडबोले
Tue, 02/19/2013 - 19:05 नवीन
अहाहा ...कसलं भारी लिहिलय !! ० मिनिटात गणेशोत्सवात आमच्या गल्लीततल्या गणपतिबापाच्या मुर्ती समोर जाऊन पोचलो !! अप्रतिम लेखन !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा