Skip to main content

घनघन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 14/09/2012 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
घन मंदावले मन धुंदावले जळ वाकून वाकून ओघळले झाकलेल्या कळा आत ओढाळल्या रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या झाडपानात सण पळ श्रावण श्रावण अंग अंगणात चाहुली पागोळल्या लवे भरून डोळा कणकण हळवेला एक एकटाच जीव होई खुळा बावळा पापणीची स्थिती आळवावी किती ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती .........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1436
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

बकवास कविता लेखन. यमकजुळव्या कवितांचा आता मला वीट आला आहे. ले ला ले, ल्या ला ल्या, ती ला ती असे किती दिवस बाळबोध आणि पारंपरीक कविता लेखन करणार. समज वाढवा.. आधुनिकोत्तर कविता लेखन करत तुमची आणि तुमच्या वाचकांची जाणीव पुढच्या स्तरावर न्या.

:-| :stare: काय प्रतिसाद आहे नाचें चा ?? रडाव कि हसाव तेच कळत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी एवढच म्हणते.