Skip to main content

खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी. तसेच यापुढे सुद्धा मिसळपाववर महत्त्वाची अथवा संवेदनशील माहिती ठेवू नये ही विनंती.
स्वगृहात हे वाचले आणि काळजात लख्खकन वीजच चमकली बघा. 'आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी' असे देखील लिहिलेले दिसले. काय सांगू ह्यांना ? अहो खरडवहीतील प्रत्येक खरड आणि खरडच महत्त्वाची आहे हो माझ्यासाठी. मिपाची खरडवही म्हणजे आमचा सर्वात मोठा वीक पॉइंट. ही खरडवही आणि ह्यातील प्रत्येक खरड म्हणजे जणू हृदयात ठेवलेल्या एखाद्या चांदीच्या पेटीतील गुलाबाच्या पाकळ्याच आहेत म्हणा ना. मिपावरती आल्या आल्या पहिली ओळख झाली ती खरडवहीचीच. मग हळूहळू खरडवही आणि खरडफळा म्हणजे 'घरी नसू तेव्हा संपूर्ण वेळ पडीक राहण्याचे ठिकाण' बनले. खरडवहीसम्राट धमालपंतापर्यंत आमची मजल नाही, पण तरी देखील खरडवही आणि तिच्यातील जुन्या खरडी शिवाय आमच्या जीवाला चैन नाही. अगदी ह्या खवसाठी 'खव उचकपाचक मंडळ' स्थापन करेपर्यंत आमची मजल गेली म्हणजे विचार करा. साल्या ह्या सगळ्या खरडवह्या म्हणजे मिपाचा इतिहास आहे. काही मोजक्या जुन्या जाणत्यांच्या खरडवह्या म्हणजे मिपाइतिहासातील वेद आहेत म्हणाले तरी चालेल. हे लिखाण ह्या सगळ्या खरडवह्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी करतो आहे. मिपावरती आल्यापासून माझ्या आठवणीप्रमाणे तरी आजवर फक्त ३ खरडी माझ्या खरडवहीतून उडवल्या गेल्या आहेत. एकदा आमच्या नानबाने चुकीचा कोड टाकल्याने सगळ्याच खरडी स्क्रोल व्हायला लागल्या तेव्हा, एकदा एका संपादक काकांनी स्वत: टाकलेली खरड स्वतःच उडवली तेव्हा आणि एकदा इंट्याच्या विनंतीवरून त्याने माझ्या खवत खरडी मधून दिलेला त्याचा नंबर उडवला म्हणून. अन्यथा माझ्या खरडवहीतून एकाही खरडीला कधी हद्दपारी मिळालेली नाही. ह्या खरडवह्यांवरती आमचे नितांत प्रेम आहे हो. ह्या खरडवहीत काय नाहीये ? अगदी प्रत्येक मिपाकांडाची नोंद इथे सापडेल. लष्कर-ए-खरडाची स्थापना असो, किंवा शेकडा खेकड्याचा उगम असो. आज जेव्हा ह्या घटनांवरती भाष्य होते तेव्हा संदर्भासाठी नवीन सदस्य कुठला आधार घेणार माहिती घ्यायला ? मिपावरचा प्रत्येक वाद इथल्या खरडवह्यांतून चर्चीला गेलेला आहे. अगदी राजा आणि वहिदाच्या भांडणापासून ते श्रीमती म्हणावे, सौ म्हणावे का कुमारी म्हणावे ह्या वादापर्यंतचा वाद असो, किंवा कधी काळी कोणा कोणाच्या रंगलेल्या आदल्या रात्रीच्या मैफिलींची चर्चा असो... फक्त इथे आणि इथेच त्यांना पुन्हा पुन्हा उजाळा मिळत राहतो. आजही खरडवहीचे कुठलेही जुने पाने पान उघडले तरी वेळ कसा जातो कळत नाही. त्या खरडीच्या काळातल्या दिवसांच्या आठवणी सरता सरत नाहीत. ह्याच खरडवहीच्या एकाच पानावरती, मी एका खाली एक अशा अदिती आणि नैनीच्या खरडी ह्याची देही ह्याची डोळा पाहिलेल्या आहेत, कुठल्याश्या पानावरती आमच्या सर्किट काकांनी दिलेला दणका अनुभवलेला आहे, मध्येच काही पानांवरती आमच्या कर्तृत्वामुळे तात्याला एक मिपाकर आणि मालक म्हणून कशी शरम आली ह्याचे तात्याने केलेले वर्णन आहे, कुठे आमच्या झकासरावांनी केलेली ह्या पुतण्याची चौकशी आहे, तर कुठे प्रभुगुर्जींच्या क्रिप्टिकने उडवलेली दांडी आहे.... दर चार पाना आड मी, नान्या, डान्या, धम्या ह्यांनी उधळलेल्या गुणांच्या आंबट गोड आठवणी देखील आहेत. पार तिकडे खालच्या अंगाला सखाराम गटणे देखील डोकावतो आहे. कधी काळी आमचे सहज मामा खरडी देखील लिहायचे ह्याचे पुरावे आता कुठून आणणार ? दोन दोन पाने घासुगुर्जींशी केलेल्या खरड कुस्त्या आता पुन्हा कधी वाचायला मिळणार ? आमच्या ब्रिटिश टिंग्याचे 'कृपया भोकात जावे' आणि निळ्याचे 'प्लीज फक ऑफ' पुनर्वाचनाचा आनंद आता कसा मिळवून देणार ? एकाच पानावरती विष्णू - लक्ष्मी, शंकर - पार्वती, राम -सीता अशा श्री व सौ जोड्यांच्या खरडी पुन्हा कधी दिसतील का ? आजकाल फक्त जुन्या खरडींमधून भेटणारे लिखाळ भावजी, शाल्मलीतै, भाग्यश्रीतै, मनीष, घाटावरचे भट पुन्हा भेटतील का ? प्राजुतैचा केलेला छळ पुन्हा अनुभवात येईल का ?, दीड शहाणे असल्याच्या थाटात कोदाला मारलेल्या पिंका पुन्हा चमकतील का ? हॅलोविन आणि पिडाकांची मते आता पुन्हा कुठे वाचायला मिळणार ?, जागुतैने खरडीमधून फक्त पेश्शल म्हणून दिलेली वाटणाची पाकृ ठसका कधी लावणार ?, अदिती अवखळकर पाटील आणि इतर सिंड्रेलाच्या बहिणींच्या हलकट खरडी आता पुन्हा कधी डोळ्यात सलणार ? हजारो नावे ..नावे घ्यावीत तेवढी कमी आहेत. तरी अजून रामदास काका, बिपिनदा, श्रामो ह्यांच्या खरडप्रकल्पांची व्याख्या इथे घेतलेलीच नाही. पुप्याच्या अर्ध कच्चा बुधवारच्या कविता आठवलेल्याच नाहीत. टार्‍याची सर्कस अजून चालू केलेलीच नाही. किती प्रचंड मोठा आनंदाचा ठेवा आहे हा. हा असा नका हिरावून घेऊ. वाटल्यास माझे मिपावरचे सगळे लिखाण उडवा.. प्रतिसाद उडवा. पण ती खरडवही मात्र आहे तशीच रसरसलेली ठेवा येवढीच विनंती. माझ्या खवत आजवर जवळजवळ ओळखीतल्या प्रत्येक मिपाकराचा वावर झालेला आहे. ह्या ठेव्याबद्दल मी त्या सर्वांचाच आभारी आहे. अनावधानाने कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16213
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

............. तरुणी ह्रुदयसम्राट ह्यासोबत ,तरुणींचे स्फुर्तीस्थान हे पद पण पायजेलाय .. तरुणींचे स्फुर्तीस्थान ,स्पा..स्पा ..स्पा>>>>

In reply to by परिकथेतील राजकुमार

या फलकामध्ये एकाही पाशवी शक्तीचा उल्लेख नाही हे पाहून शरम वाटली. नवा फलक बनवून स्त्रियानी पुढे आले पाहिजे.

In reply to by श्रावण मोडक

खरय खरय .. पराण्णा ..तुमी स्त्रीयांसाठी खास फलक बनवा वो ... त्यात आमची स्फुर्तीस्थानं मात्र आम्हाला हवी तीच आणी तेहि पूरुषच असतिल ह्याकडे नीट लक्षं द्या म्हणजे झालं .:P :D

च्यायला.... मरा ठी संस्थळ कसं चालवायचं ते आमच्या कांताला विचारा.....! एक गुगली टाकला नि १७६० विके टा निघाल्या. ;)

In reply to by श्रावण मोडक

'कश्चित् कान्ताविरहगुरुणा' हा श्लोक आठवला :)

In reply to by नंदन

मेघदूत कळलं. आता हा 'कवी कालिदास' कोण ते सांग! :-)

हबीणंदन हो. शतकी मजल मारण्याबद्दल.