✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक साधन - दोन कलाकार - भाग १

५
५० फक्त यांनी
गुरुवार, 09/13/2012 - 08:34  ·  लेख
लेख
दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे. प्रचि.१ प्रचि.२ प्रचि. ३ यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत.. प्रचि.४ प्रचि. ५ प्रचि. ६ प्रचि. ७ प्रचि.८ प्रचि.९ प्रचि.१० प्रचि. ११ हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे. प्रचि. १२ प्रचि. १३ प्रचि. १४ प्रचि. १५ प्रचि. १६ संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे, प्रचि. १७ प्रचि. १८ एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा. प्रचि. १९ प्रचि. २० प्रचि. २१ हे मुख्य मंदिराचं शिखर प्रचि.२२ बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय... प्रचि. २३ प्रचि. २४ प्रचि. २५ प्रचि. २६ प्रचि. २७ प्रचि.२८ हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला. हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, मेवे या इथं (http://www.misalpav.com/node/22584#comment-422386) म्हणतात तसं, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात. प्रवासमाहिती स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर. प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे. हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे. जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय. सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
तंत्र
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10737 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

खल्लास एकदम! मंदिराची शैली

अन्या दातार
गुरुवार, 09/13/2012 - 08:54 नवीन
खल्लास एकदम! मंदिराची शैली खजुराहोशी मिळती-जुळती वाटत आहे असे माझे निरीक्षण नोंदवून रजा घेतो.
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रचेतस
गुरुवार, 09/13/2012 - 09:05 नवीन
मस्त. गोंदेश्वर पंचायतनाबद्दल फारशी माहिती नाही पण एकंदर शैलीवरून शिलाहारकालीन असावे खिद्रापूराचा कोपेश्वर आणि अंबरनाथचे शिवमंदिर या दोन्ही मंदिराच्या शैलीशी कमालीचे साम्य दिसत आहे (प्रचि. क्र. १०). बाकी ह्या पंचायतनात शिवाबरोबरच इतर कुठले देव आहेत? भाग २ मध्ये काय?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो. डिट्टो

बॅटमॅन
गुरुवार, 09/13/2012 - 11:25 नवीन
हेच म्हणतो. डिट्टो खिद्रापूरचा भास झाला बघून :) शिवाय सिन्नरच्या कॉर्पोरेट स्टँडबद्दल बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मुख्य मंदिर शंकराचं आहे, इतर

५० फक्त
गुरुवार, 09/13/2012 - 11:55 नवीन
मुख्य मंदिर शंकराचं आहे, इतर चार मंदिरं आहेत त्यात एक देवीचं आहे, ज्याला तिथली लोकं पार्वती म्हणतात, त्या खेरीज एक विष्णुचं मंदिर आहे, आणि एक गणपतीचं. त्या ख्रेरीज पाचव्या देवळात कोणता देव आहे ते समजलं नाही. अधिक माहिती मिळण्यासाठी तुझी एक भेट गरजेची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पाचवा सूर्य

सूड
गुरुवार, 09/13/2012 - 14:35 नवीन
पंचायतन होतं ना ? मग पाचवा सूर्य असेल कदाचित. जाणकार अधिक माहिती देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सुंदर.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/13/2012 - 09:28 नवीन
मनमोहून टाकणारे सुंदर, बारीक नक्षीकाम आणि तत्कालीन, विस्मयकारक स्थापत्यनमुना.
  • Log in or register to post comments

आवडलं.

शिल्पा ब
गुरुवार, 09/13/2012 - 09:54 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
गुरुवार, 09/13/2012 - 10:40 नवीन
उत्तम माहिती अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मस्त माहिती

मी_आहे_ना
गुरुवार, 09/13/2012 - 11:32 नवीन
छान प्र.चि., मस्त माहिती. धन्यवाद. (ते सिन्नर एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं कसं दिसतं ते जरा फटू टाकून दाखवा की) :)
  • Log in or register to post comments

जालावरून...

बहुगुणी
Fri, 09/14/2012 - 14:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

छानच आहे. स्वच्छही. असंच

रेवती
Fri, 09/14/2012 - 22:05 नवीन
छानच आहे. स्वच्छही. असंच ठेवायला मात्र हवं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

--^--^--^--

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 12:20 नवीन
--^--^--^--
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. असंख्य सिन्नर

गणेशा
गुरुवार, 09/13/2012 - 14:17 नवीन
अप्रतिम .. असंख्य सिन्नर वारीतील हे हक्काचे ठिकाण .. फोटो दिल्या बद्दल धन्यवाद. बाकी श्रीराम मिसळ एक नंबर मिसळ आहे सिन्नर ची.
  • Log in or register to post comments

थक्क!

पैसा
Fri, 09/14/2012 - 00:35 नवीन
सिन्नर गावात असं काही आश्चर्य आहे हे नव्हतं बाबा महित! काय बोलू समजत नाहीये पण हे अपुरं राहिलं नसावं. पडझड आणि मूर्तीभंजनातून शिल्लक राहिलेले दगड मग पुराणवस्तू खाते कसेतरी रचून ठेवते तसं वाटतंय.
  • Log in or register to post comments

२६ नं फोटो अतिशय म्हणजे

स्पंदना
Fri, 09/14/2012 - 13:56 नवीन
२६ नं फोटो अतिशय म्हणजे अतिशयच आवडला.
  • Log in or register to post comments

ऑन डिमांड

५० फक्त
Fri, 09/14/2012 - 22:41 नवीन
अपर्णाताई, हे त्या प्रचि २६ मधले काही डिटेलस Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आणि हा शेवटचा फोटो, कशाचा आहे सांगु शकेल का कोणी ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

नमयनरम्य !

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/14/2012 - 14:27 नवीन
कलाकुसर आणि शिल्पे एकदम आवडेश. अवांतर :- शिर्षकाने उगाच नको त्या भावना चाळवल्या गेल्या.
  • Log in or register to post comments

सुंदर शिल्पकला!

बहुगुणी
Fri, 09/14/2012 - 14:48 नवीन
'एक साधन - दोन कलाकार' म्हणताय म्हणजे पुढच्या भागात सिन्नरजवळच्याच 'गारगोटी संग्रहालया'ची माहिती असेल असं वाटतंय, खूप कौतुक ऐकलंय त्याचं...वाट पाहातो. ( प्रकाशचित्र क्र. ३ चं composition अप्रतिम! त्यावरची टिप्पणीही आवडली :-))
  • Log in or register to post comments

प्रचंड शिळांमधून इतकं सुंदर

मराठे
Fri, 09/14/2012 - 21:25 नवीन
प्रचंड शिळांमधून इतकं सुंदर आणि नाजूक शिल्पकाम करणार्‍या अनामिक कलाकारांना सलाम!
  • Log in or register to post comments

ये धागा नजरसे सूट गया था

रेवती
Fri, 09/14/2012 - 22:06 नवीन
ये धागा नजरसे सूट गया था इसलिये उशिरा प्रतिसाद दे रही हूं. सगळे फोटू आणि थोडक्यात पण सगळी माहिती दिल्याबद्दल धन्स.
  • Log in or register to post comments

सुंदर !!

अर्धवटराव
Fri, 09/14/2012 - 22:10 नवीन
त्या अनामीक कलाकारांना सलाम. प्रची बद्दल धन्यवाद ५० जी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

भारीच. छान प्रकाश चित्रे नि

प्यारे१
Sat, 09/15/2012 - 14:39 नवीन
भारीच. छान प्रकाश चित्रे नि माहिती!
  • Log in or register to post comments

संपुर्ण भारतभर बर्‍याच ठीकाणी

शिल्पा ब
Sun, 09/16/2012 - 22:14 नवीन
संपुर्ण भारतभर बर्‍याच ठीकाणी अगदी छोट्या गावातुनसुद्धा जुनी मंदीरं वगैरे असावीत जी परकियांच्या तडाख्यातुन सुटली. आपल्या आजुबाजुच्या गावात सुद्धा अशी कला आढळु शकते.
  • Log in or register to post comments

सिंप्ली ग्रेट !

गणपा
Sun, 09/16/2012 - 22:26 नवीन
कोरीवकाम भन्नाट आहे. प्रचि. २२ त्याची साक्ष देतेय. धन्यवाद हो पन्नासराव ही माहिती आणि प्रकाशचित्रे इथे दिल्या बद्दल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा