लेखकप्रभाकर पेठकरयांनी गुरुवार, 13/09/2012 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
बटण मश्रूम १०-१२ नग
बेबी कॉर्न १०-१२ नग
तेल २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून)
लसूण २ ते ३ मोठे चमचे
कांदा १ मोठा
टोमॅटो १ मध्यम
हळद १/२ लहान चमचा ( टी स्पून)
तिखट १/२ लहान चमचा
गरम मसाला १/२ लहान चमचा
मीठ चवीनुसार
कोथिंबीर मुठभर
तयारी:
मश्रूमचे चार चार तुकडे करून घ्या.
बेबी कॉर्नचे (तिरपे) तुकडे करून घ्या.
२ ते ३ मोठे चमचे होतील एवढा लसूण बारीक चिरुन घ्या.
कांदा बारीक चिरुन घ्या.
टोमॅटो मिक्सर मधून फिरवून त्याची प्यूरे करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
कृती:
एखाद्या छोट्या कढईत अथवा फ्राय पॅन मध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापले की त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून मध्यम आंचेवर लाल होई पर्यंत परतुन घ्या. लसूण लाल झाला की त्यावर बारीक चिरलेला कांदा लाल होईस्तोवर परतुन घ्या.
कांदा नीट परतला गेला की त्यावर ३ मोठे चमचे टोमॅटो प्यूरे टाकून परता. त्यावर मीठ, हळद, तिखट, गरम मसाला टाकून परतत राहा.
आता त्यावर मश्रूम टाकून परता. मश्रूम मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे पाणी टाकताना सांभाळून. आपल्याला रस्सा भाजी करायची नसून अंगचाच मसाला असला पाहिजे. थोड्यावेळाने मश्रूमला पाणी सुटेल. गरज भासल्यास अगदी १-२ मोठे चमचे (टेबलस्पून) पाणी टाकून परतत राहा. मश्रूम जसे शिजत जातील तसे आकाराने जरा लहान होतील. साधारण शिजले की त्यात बेबी कॉर्न आणि, सजावटी साठी थोडी बाजूला ठेवून, कोथिंबीर घाला.
मंद आंचेवर शिजवा. गरज भासेल त्या नुसार १-२ चमचे पाणी घाला.
बेबी कॉर्न जरा करकरीतच राहू द्या.
आता भाजी बाऊल मध्ये काढून उरलेल्या कोथिंबीरीने सजवा.
शुभेच्छा...!
सुरेख. मश्रुम (अनेकांना याचे वावडे असते) आणि बेबी कॉर्न दोन्ही गोष्टी आणि त्यांचे कॉम्बीनेशन आवडते.
फक्त जरा लसुणाचीच भिती आहे. तरीसुद्धा ट्राय करणारच.
अवांतर- जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा.
जनातलं:
सुरेख फोटो...
पेठकरबुवांच्या रेसेपीबद्दल काय बोलणार, ती फक्कड असतेच.
डिशची चवही सुरेखच असणार...
मनातलं:
ते बेबी-कॉर्न घातल्यानंतर आणि कोथिंबीर घालायच्या अगोदर जर चार खाडीची सुंगटा त्यात घातली तर काय बहार येईल!!
नाय म्हणजे जी भाजी आता अप्सरास्वरूप आहे ती देवतास्वरूप होईल!!!!
:)
कुठल्याही पाककृतीत स्वतःच्या आवडीनुसार आणि स्वजोखमीवर हवे तसे बदल करण्यास परवानगी आहेच. जे कांही नवनिर्माण होईल ते (उत्तम झाल्यास) मिपावर, अगदी स्वतःची पाककृती म्हणून, उपलब्ध करून द्यावे.
काल हा पदार्थ ट्राय केला. घरात फक्त मला मश्रुम्स आवडतात अश्या समजातून कमी केला होता. पण या पाकृत दिलेली मापे-प्रमाण जराही न चुकवता केला आणि इतका मस्त झाला होता की फोटो काढण्यापुरताही राहिला नाही ;)
आभार!
फक्त टोमॅटो अधिक लाल असल्याने की काय माहित नाही पण ग्रेव्ही लालचुटुक झाली होती.. चवीला ब्येष्ट असल्याने फार विचार केला नाही.. मात्र वरचा रंग आणायला काही वेगळे करावे लागते का? (हाटेलातही असाच रंग असतो)
जाई., sagarpdy, गणपा, रेवती, वल्ली, निवेदिता-ताई, सानिकास्वप्निल, अर्धवटराव, ज्योति प्रकाश, अत्रुप्त आत्मा, चिंतामणी, श्रीरंग_जोशी, पिवळा डांबिस, पिंगू, पियुशा, कच्ची कैरी, परिकथेतील राजकुमार, मदनबाण, पैसा, पैलवान, इरसाल, ऋषिकेश सर्वांना धन्यवाद.
@चिंतामणी,
>>>> जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा.
आवश्यकता भासत नाही. जी गोष्ट शब्दात वर्णन करून समजते त्यासाठी छायाचित्र देणे मला पटत नाही. अंतिम पदार्थ कसा दिसेल हे शब्दात वर्णन करता येणार नाही म्हणून आणि पाककृतीला आकर्षकता यावी म्हणून तेवढे एक छायाचित्र मी टाकतो.
@ॠषिकेश,
टोमॅटो पेक्षा जे तिखट वापरले ते बदलून पाहा. काही काही तिखटात खायचा रंग आधीच मिसळलेला असतो. असे तिखट सर्वस्वी टाळावे. काश्मिरी मिरच्याही रंगाला खुप लाल असतात. त्या आणि त्याचे तिखट टाळावे. साधे बिन रंगाचे आणि मध्यम तिव्रतेचे तिखट वापरावे. भारतात कुसुम ब्रँडची दोन तिखटे मिळतात. एक सर्वसाधारण तिखट आहे ते बिन रंगाचे असते. दुसरे आहे रेशीमपत्ती. ते मध्यम लाल, मध्यम तिव्र आणि चवीला चांगले असते. मी सहसा तेच वापरतो. रंगाची गरज असेल तर काश्मिरी मिरच्या वापरतो. कुसुम ब्रँड मिळत नसेल तर गुंटूर आणि बॅडगी मिरच्या चांगल्या आहेत. अन्यथा कुठलेही बिन किंवा कमी रंगाचे पण चांगल्या चवीचे तिखट वापरावे.
तिखटात रंग, चव आणि तिखटपणा हे तिन गुणधर्म पाहावे लागतात. हे तिन्ही गुणधर्म एकाच प्रकारच्या मिरचीत मिळत नाही. तेंव्हा दोन प्रकारच्या मिरच्या मिसळून तिखट बनवावे. जसे, काश्मिरी+बेडगी किंवा काश्मिरी +गुंटूर किंवा बेडगी+गुंटूर इ.इ.इ.
प्रतिक्रिया
झकास
कातील!
तोंपासु
अगदी मस्त! हा प्रकार
जेवणातील भाजी.
In reply to अगदी मस्त! हा प्रकार by रेवती
येकदम जबरी झालीय पाकृ.
मस्तच
मस्त
मस्त !!
जबरदस्त पाकृ व फोटो .
(No subject)
वा वा वा.
लज्जतदार!!
जनातलं - मनातलं
पिडाकाका, पण आमच्यासारख्या
In reply to जनातलं - मनातलं by पिवळा डांबिस
प्रयत्नांती परमेश्वर...
In reply to जनातलं - मनातलं by पिवळा डांबिस
रेसेपी झकास अन सोपी आहे पण
उत्तर वरती दिले आहे.
In reply to रेसेपी झकास अन सोपी आहे पण by पियुशा
रेसेपी झकास अन सोपी आहे पण
एक नंबर
जबराट !
बरेच आहेत.
In reply to जबराट ! by परिकथेतील राजकुमार
ग्रेट.
In reply to बरेच आहेत. by प्रभाकर पेठकर
आहाहा... आधीच मश्रूम मला फार
लै भारी दिसतंय!
देखणी डीश
वाह वाह वाह
काल हा पदार्थ ट्राय केला.
फक्त टोमॅटो अधिक लाल असल्याने
In reply to काल हा पदार्थ ट्राय केला. by ऋषिकेश
धन्यवाद.