मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कताई शास्त्र १

बापू मामा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही. कदाचित हे शास्त्र थोडेसे किचकट व फारच लांबलचक प्रक्रियांचे आहे, त्यामुळे असेल. या लेखात संपूर्ण वस्त्रनिर्मितीचा थोडक्यात आढावा घेउन आपण त्यातील एका मुख्य प्रक्रियेची म्हणजेच सुत निर्मितिची माहिती घेवू. वस्त्रे तीन प्रकारांनी बनविली जातात - १)मागावर विणलेले (वोव्हन) उदाहरणार्थ शर्टिंग, सुटींग, चादरी, पातळे, धोतरे इत्यादी. २) सुयांनी विणलेले ( निटेड) उदाहरणार्थ बनियन, अंडर गार्मेंटस, स्वेटर, मोजे, इत्यादी. ३) नॉन वोव्हन - हे तंत्र आधुनिक असून केमिकल बाँडींग, थर्मल बाँडींग द्वारे बनविलेले टिश्यू पेपर, रुमाल, इंडस्ट्रीयल फॅब्रिक इत्यादी उदाहरणे देता येतील. वस्त्रे निर्माण करण्याच्या तंत्राप्रमाणेच त्या साठी वापरलेल्या कच्च्या माला वरून ( तंतू वरुन) परत तीन मुख्य प्रकार पडतात. १) नैसर्गिक : ह्याचे दोन उपप्रकार आहेत अ) वनस्पतीज - ह्यामध्ये कापूस, ताग( ज्युट), अंबाडी, वगैरे तंतू येतात ब) प्राणिज - ह्यामध्ये रेशिम,लोकर, प्रामुख्याने येतात. २) मानव निर्मित तंतू - नायलॉन, पॉलिएस्टर, ऍक्रॅलिक, ऍस्बेस्टॉस इत्यादी ३) पुनर्निमित तंतू - रेयॉन, विस्कोज इत्यादी. वरील सर्व तंतूंच्या प्रकारात कापूस हा सर्वाधिक लोकप्रिय व वापराचा आहे. कारण कापसात वातानुकूलन व शोषकता हे गुणधर्म आहेत ,ज्या मुळे सुती कापड हे हिवाळ्यात उब देते ( चादरी हे या संदर्भात उत्तम उदाहरण) , तर उन्हाळ्यात थंडावा ( उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण डोक्यांस रुमाल , टोपी, गमछे, फेटे बांधतो. सुती कपडा घाम शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला आर्द्र हवेत ( पावसाळ्यात) खुपच आरामदायी वाटतात. (क्रमशः)

वाचने 2588 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रभाकर पेठकर 13/09/2012 - 17:38
नाविन्यपूर्ण माहिती. पण फारच त्रोटक झाला पहिला भाग. प्रत्येक भाग ह्या भागाच्या साधारणपणे दुप्पट तरी पाहिजे. असो. पुढील विस्तृत भागांच्या प्रतिक्षेत आहे.

मन१ 13/09/2012 - 19:04
पण पोटभर नाही. और आन्दो भाय....

पिंगू 14/09/2012 - 10:09
उपक्रमावरचा विषय मिपावर मांडल्याबद्दल अभिनंदन.. बाकी लेखाची त्रोटक झाली आहे ह्याबद्दल मान्यवर पेठकरकाका आणि मनोबा दोघांशी सहमत आहेच. पुढच्या लेखात ह्या विषयावर अधिक गहिरा प्रकाश पडेल अशी आशा करतो..

बिपिन कार्यकर्ते 14/09/2012 - 13:01
क्या बात है! अगदी वेगळाच विषय. वाचतोय. मात्र किंचित सविस्तर आणि मोठे भाग आल्यास अजून मजा येईल!

किलमाऊस्की 19/09/2012 - 15:57
थोडं अजून मोठा हवा होता लेख

अभ्या.. 19/09/2012 - 18:19
येऊ द्यात अजुन मोठे भाग. आवडले अगदी बेसिक पासून सुरुवात आहे ते. (सोलापूरसारख्या गिरणगावातली दुर्दशा थोडीफार बघितलेला)