Skip to main content

अकरा तारखेची अकरा वर्षे

लेखक मन यांनी मंगळवार, 11/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अकरा तारखेची अकरा वर्षे..... आज, म्हणजे ११ सप्टेंबरला अकरा वर्षे पूर्ण होतील. अकरा वर्षे झाली. घडले तेव्हा जगभर टीव्हीवर प्रसारितही झाले. आख्ख्या जगाला दिसले. तरीही मुळात घडले काय हेच अजून कुणाला ठाउक नाही म्हणतात. ज्याने ते घडवल्याचा आरोप केला जातो, त्याला खलनायक दाखवलं जातं. त्याच्या ह्याच कामगिरीमुळं कित्येकांचा तो "हिरो" ठरला. त्याचा पूर्वेतिहास पाहता, त्यानेच हे घडवलेले असणे अशक्य वाटत नाही. कुठल्याही मोठ्या घटनेबद्द्ल काही कॉन्स्पिरसी थिअरीज नेहमीच असतात. अगदि मर्लिन मन्रो हिच्या हत्येपासून , ताजमहालाच्या निर्मात्यापर्यंत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते खुद्द गाजलेलं " मानवाचं चंद्रावरचं पहिलं पाउल ". दुनिया आहे ती अशी आहे. इथे काहीही निर्विवाद नाही. अगणित शक्याशक्यतांचा गलबला असाच राहणार. अर्थातच तो पूर्वीही असावा. पण तेव्हा असा माध्यमांचा स्फोट झालेला नव्हता. प्रत्येकजण(माझ्यासारखेच) स्वतःला भारताचे/जगाचे भले चिंतणारा समजत प्रत्येक हेडलाइनवर, आशा - लता ह्यांच्या मतावर नि राजकिय नेत्यांनी दरदिवशी सोयीनं दिलेल्य वक्तव्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत नसायचा. त्याच्या मनोविश्वात त्याच्या स्वतःच्या जगाची जागा बरीच मोठी. पण माध्यम ध्वम फुटला आणि चित्र बदललं. तशातच आख्ख्या जगाला " त्यांच्यातले की आमच्यातले" असं विचारलं गेलं. ( "प्रत्येकाला आज ठरवावं लागेल, तुम्ही त्यांच्याकडून आहात की आमच्याकडून(तिच्यायला तटस्थ रहायचा ऑप्शन च नाही.") थोडक्यात, मुकाट्याने आमच्या मागं या असं सांगणं) . सत्तेचा सारीपाट नव्या रंगमंचावर बदलू लागला. परिमाणंच बदलून गेली. शीतयुद्धात हॉलीवूडपटांना नि अमेरिकन मानसिकतेला कम्युनिस्ट यु एस एस आर हा एक कायमचा ठाशीव शत्रू होता, सगळा राग काढायला. तोच अचानक संपल्यानं सगळा राग त्यांनी काल्पनिक "एलिअन्स"च्या संकटाम्वर काढून घेतला. पण फार काळ तो काढायची गरज नव्हती. सरसकट राग करायला लवकरच एक घबाड हाती लागणार होतं; ते लागलच्. . आजही घटनेचं श्रेय ज्याला दिलं जातं, त्याबद्दल खुद्द त्याच देशातल्या नागरिकांनी शंका उपस्थित केलयत. ज्याला शासन म्हणून मारण्यात आलं, त्याला खरच मारण्यात आलं की नाही ह्यावरही प्रश्न आहेतच, कायमच राहतील. काहींना तर मुळात असं कुणी मागच्या पंधरावर्षापासून जिवंत होतं का, हीच शंका आहे. . खरं खोटं (असलाच तर )देव जाणे.पण घटनेचे पडसाद कसेही कुठेही उमटले. हाती त्रिशूळ नि कपाळाला टिळा लावणार्‍या काहिंना आता "हे ही आमच्यासारखेच पोळलेले आहेत. स्वत्;च्या दुष्कर्माने का असेना पण त्यांना फार जबर किंमत द्यावी लागली आहे" असं वाटायला लागलं. लगोलग त्यांच्या मते शत्रू असनारे आता "सर्टिफाइड" व्हिलन झाले होते. काही विशिष्ट गोष्टी ठेवण्याची आता त्यांच्यातल्या कित्येकांना भीती वाटू लागली. . आमच्या शासनयंत्रणेला तर दरवेळी ऐकवायला डायलॉग मिळाला "अहो तेही कमी पडतात, १००% घटना थांबवायला, आमचे काय घेउन बसलात". थोडकयत आम्ही करतोय त्यात समाधानी रहा, तुमचा स्वतःचा अजून नम्बर लागला नाही, ह्याअबद्दल समाधानी रहा. . आठ दहा हजाराहूनही अधिक पुस्तकं छपली गेली. त्यातली कित्येक प्रचंड खपलीही. . बरच काही आहे, पण बहुसंख्य माणसं एकमेकांकडं संशयानं पहायला शिकली. अम्दाजानं गट ओळखून द्वेष करायला शिकली; हे महत्वाचं. . मागच्या काही दशकात घडलेल्या अत्यंत ठळक घटनांपैकी ही एक घटना म्हणावी लागेल. घडली तेव्हाअ तुमच्या आमचयतले कित्येकजण घटनास्थलापासून काही शे किमीच्या परिसरात होते. काही जण आदल्याच दिवशी तिथे जाउन आले होते. अकरा तारखेला आता अकरा वर्षे पूर्ण होताहेत. . सुचेल तसं इथेच धाग्यात टंकत जातोय.

वाचने 3691
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

९/११ कमीशनच्या रिपोर्ट मधील एक वाक्य या घटनेचे यथार्थ वर्णन करते... It was Failure of Imagination. या घटनेतील सर्वात चटका लावणारी गोष्ट म्हणजे "द फॉलींग मॅन" काय वाटले असेल या व्यक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत..? :-(

काय फरक पडला अमेरिकेच्या राजकारणात? पाकिस्तानी अतिरेकी असुन सुद्धा यांनी अफगाणीस्तान मध्ये सैन्य उतरवल. वर पाकिस्तानला करोडोमध्ये मलिदा चारला. बनवा आणि आतिरेकी. घाला पैसा. शेवटी तो बिन लादेन सापडला कुठे? पाकड्यांच्या संरक्षणात. तरीही अजुन हीलरीबाय निर्लज्जपणे पाकिस्तानला म्हणे अतिरेकी कमी करायला मदत देताहेत. एव्हढ दु:ख उगाळताहेत ९/११ च . आमच्या इथले बॉम्बस्फोट झाले तेंव्हा काय माणस मेली की जनावर? शेअर बाजारच्या स्फोटात घरच्यांनी हा हात अन हे घड्याळ माझ्या नवर्‍यासारख दिसतय म्हणुन त्या नुसत्या हाताचा दाह्संस्कार केला. तुकड्या तुकड्याम्चा ढीग लागला होता. का अमेरिकेत मेल म्हणजे खर मरण अन खरा दहशत्वाद का? प्रत्येक वेळी लगेच उठतात 'भारताने संयम दाखवावा म्हणुन'. मला तर तिरस्कार आहे या ९/११ च स्तोम वाढवणार्‍या प्रत्येकाचा. बाकिच्यांना पण तेव्हढीच झळ बसते दहशतवादाची. हल्ली तर यांच सैन्य पोसत बसाव लागतय इतर देशांना. एका जापनिज मुलीवर एका अमेरिकन सैनिकाने बलात्कार केला. पण त्याला शिक्षा म्हणे जापनिज नाही तर अमेरिकेत ठरवली जाईल. कश्यासाठी मागे लागलेत कुत्र्या सारखे त्या विकिलिंक्सवाल्याच्या? यांच्या सैनिकांनी केलेले अत्याच्यार उघडकिला आणले म्हणुन. अफगाणीस्तानात काय कमी लोक मारताहेत ही लोक? अन सैन्य पाकैस्तानात का नाही घुसवल जर बदलाच घ्यायचा होता तर? फालतु बकवास आहे अमेरिका म्हणजे. एम एफस.

aparna तैंशी सहमत. अमेरिकेपेक्षा भारतात काही कमी दहशतवादी कृत्ये घडली आहेत असे नाही. पण अमेरिकेचे श्वान, सगळे म्हणती चान, चान... बाकी लेख अभ्यासपूर्ण आहे.

जे घडले ते बहुधा अमेरीकेची अर्थव्यवस्था सावरण्यासाठे केले असे म्हणतात. अफगाणीस्थान हा त्यावेळेस असा देश होता की ज्यावर हल्ला केला तर त्याचे पडसाद उमटणार नव्हते. त्या शिवाय इराणवर अंकुशासाठी तेथे सैन्य असणे गरजेचे होते. अडचण होती ती तेथील स्थानीक अडाणी सरकारची. अमेरीकेने तेथील असंख्य नागरीकाना मारलेच. मुख्य आरोपी मोकळेच राहीले. मुल्ला ओमर किंवा त्याचे साथीदार जवाहिरी मोकळेच आहेत. लादेन चे नक्की काय झाले ते कोणालाच माहीत नाही. त्याचे प्रेतही कोणाला दिसू दिले नाही. युद्धखोर जोर्ज बुशने त्यानंतर इराकवर नक्की कशासाठी हल्ला केला ते खरे कोणालाच सांगीतले नाही. डॉलर आणि यूरो च्या लढाईत सद्दाम आणि इराकचा बळी गेला. धर्मांध अतीरेक्यांपासून दूर असलेला/ महीलाना बर्‍यापैकी स्वातन्त्र्य देणारा इराक पूर्णपणे उध्वस्त झाला. अफगाणीस्थानातील हजारो नागरीकाना बेघर करणार्‍या तसेच इराकमधील हजारो नागरीकाना ठार करणार्‍या जॉर्ज बुश ह्याला खरेतर सर्वात मोठा दहशतवादी डिक्लेअर करायला हवे होते.

In reply to by मदनबाण

अगदी बरोबर. पण आपल्यातलेच काही (beneficiaries) त्या देशाची फुकटची वकिली करतात. स्वाक्षरीत "अमेरिकन ** *" असे टंकतात.

In reply to by मदनबाण

बरोबर.. अमेरिकेने तालिबान्यांना संपवून त्या दोघांच्यात काही फरक नाही हेच दाखवून दिले. इतके हल्ले होऊनही भारतासारखा संयम बाळगणे हे (अमेरिकेसारख्या) येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे ! नाही का?

In reply to by विजुभाऊ

अरेच्या! अमेरिकेने हल्ला केला की ते आतंकवादी.. भारताने हल्ला न करता संयम बाळगला की तो दुर्बळ .. नक्की म्हणणे काय आहे हल्ला करणे योग्य की अयोग्य?

सध्या ही फक्त पोच. फुरसतीत परततोय. . . अतिकामाने त्रस्त झालेला....

सध्या याविषयीच्या कॉन्स्पिरसी थिअरीज पहात आहे/ वाचत आहे. यूट्यूबवर बरेच विडीओ आहेत. बर्‍याच शॉकिंग गोष्टी कळताहेत. यासंबंधी हे पाहिलं http://www.youtube.com/watch?v=aAmegwUdJdA आणि हे वाचलं, http://www.harkatnay.com/2010/09/blog-post_23.html

अमेरीकेत सगळ्याच गोष्टींबद्दल कोन्स्पिरन्सी थेअरी असते. त्यामुळे अर्थातच त्यांच्या प्रशासनावर ढिम्म परीणाम होतो.