अकरा तारखेची अकरा वर्षे.....
आज, म्हणजे ११ सप्टेंबरला अकरा वर्षे पूर्ण होतील.
अकरा वर्षे झाली. घडले तेव्हा जगभर टीव्हीवर प्रसारितही झाले. आख्ख्या जगाला दिसले. तरीही मुळात घडले काय हेच अजून कुणाला ठाउक नाही म्हणतात.
ज्याने ते घडवल्याचा आरोप केला जातो, त्याला खलनायक दाखवलं जातं. त्याच्या ह्याच कामगिरीमुळं कित्येकांचा तो "हिरो" ठरला. त्याचा पूर्वेतिहास पाहता, त्यानेच हे घडवलेले असणे अशक्य वाटत नाही.
कुठल्याही मोठ्या घटनेबद्द्ल काही कॉन्स्पिरसी थिअरीज नेहमीच असतात. अगदि मर्लिन मन्रो हिच्या हत्येपासून , ताजमहालाच्या निर्मात्यापर्यंत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते खुद्द गाजलेलं " मानवाचं चंद्रावरचं पहिलं पाउल ".
दुनिया आहे ती अशी आहे. इथे काहीही निर्विवाद नाही. अगणित शक्याशक्यतांचा गलबला असाच राहणार.
अर्थातच तो पूर्वीही असावा. पण तेव्हा असा माध्यमांचा स्फोट झालेला नव्हता. प्रत्येकजण(माझ्यासारखेच) स्वतःला भारताचे/जगाचे भले चिंतणारा समजत प्रत्येक हेडलाइनवर, आशा - लता ह्यांच्या मतावर नि राजकिय नेत्यांनी दरदिवशी सोयीनं दिलेल्य वक्तव्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत नसायचा. त्याच्या मनोविश्वात त्याच्या स्वतःच्या जगाची जागा बरीच मोठी. पण माध्यम ध्वम फुटला आणि चित्र बदललं. तशातच आख्ख्या जगाला " त्यांच्यातले की आमच्यातले" असं विचारलं गेलं. ( "प्रत्येकाला आज ठरवावं लागेल, तुम्ही त्यांच्याकडून आहात की आमच्याकडून(तिच्यायला तटस्थ रहायचा ऑप्शन च नाही.") थोडक्यात, मुकाट्याने आमच्या मागं या असं सांगणं)
.
सत्तेचा सारीपाट नव्या रंगमंचावर बदलू लागला. परिमाणंच बदलून गेली. शीतयुद्धात हॉलीवूडपटांना नि अमेरिकन मानसिकतेला कम्युनिस्ट यु एस एस आर हा एक कायमचा ठाशीव शत्रू होता, सगळा राग काढायला. तोच अचानक संपल्यानं सगळा राग त्यांनी काल्पनिक "एलिअन्स"च्या संकटाम्वर काढून घेतला. पण फार काळ तो काढायची गरज नव्हती. सरसकट राग करायला लवकरच एक घबाड हाती लागणार होतं; ते लागलच्.
.
आजही घटनेचं श्रेय ज्याला दिलं जातं, त्याबद्दल खुद्द त्याच देशातल्या नागरिकांनी शंका उपस्थित केलयत.
ज्याला शासन म्हणून मारण्यात आलं, त्याला खरच मारण्यात आलं की नाही ह्यावरही प्रश्न आहेतच, कायमच राहतील.
काहींना तर मुळात असं कुणी मागच्या पंधरावर्षापासून जिवंत होतं का, हीच शंका आहे.
.
खरं खोटं (असलाच तर )देव जाणे.पण घटनेचे पडसाद कसेही कुठेही उमटले. हाती त्रिशूळ नि कपाळाला टिळा लावणार्या काहिंना आता "हे ही आमच्यासारखेच पोळलेले आहेत. स्वत्;च्या दुष्कर्माने का असेना पण त्यांना फार जबर किंमत द्यावी लागली आहे" असं वाटायला लागलं. लगोलग त्यांच्या मते शत्रू असनारे आता "सर्टिफाइड" व्हिलन झाले होते. काही विशिष्ट गोष्टी ठेवण्याची आता त्यांच्यातल्या कित्येकांना भीती वाटू लागली.
.
आमच्या शासनयंत्रणेला तर दरवेळी ऐकवायला डायलॉग मिळाला "अहो तेही कमी पडतात, १००% घटना थांबवायला, आमचे काय घेउन बसलात". थोडकयत आम्ही करतोय त्यात समाधानी रहा, तुमचा स्वतःचा अजून नम्बर लागला नाही, ह्याअबद्दल समाधानी रहा.
.
आठ दहा हजाराहूनही अधिक पुस्तकं छपली गेली. त्यातली कित्येक प्रचंड खपलीही.
.
बरच काही आहे, पण बहुसंख्य माणसं एकमेकांकडं संशयानं पहायला शिकली. अम्दाजानं गट ओळखून द्वेष करायला शिकली; हे महत्वाचं.
.
मागच्या काही दशकात घडलेल्या अत्यंत ठळक घटनांपैकी ही एक घटना म्हणावी लागेल. घडली तेव्हाअ तुमच्या आमचयतले कित्येकजण घटनास्थलापासून काही शे किमीच्या परिसरात होते. काही जण आदल्याच दिवशी तिथे जाउन आले होते.
अकरा तारखेला आता अकरा वर्षे पूर्ण होताहेत.
.
सुचेल तसं इथेच धाग्यात टंकत जातोय.
वाचने
3691
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
९/११ कमीशनच्या रिपोर्ट मधील एक वाक्य...
बाप रे!!! भयंकर आहे फोटो आणि
In reply to ९/११ कमीशनच्या रिपोर्ट मधील एक वाक्य... by मोदक
काय फरक पडला अमेरिकेच्या
aparna तैंशी
जे घडले ते बहुधा अमेरीकेची
जगातला सर्वात मोठा आतंकवादी
अगदी बरोबर.पण आपल्यातलेच
In reply to जगातला सर्वात मोठा आतंकवादी by मदनबाण
येर्यागबाळ्याचे काम नव्हे !
In reply to जगातला सर्वात मोठा आतंकवादी by मदनबाण
संयम ? याला संयम म्हणायचे की
अरेच्या!
In reply to संयम ? याला संयम म्हणायचे की by विजुभाऊ
चर्चा वाचतोय...
कॉन्स्पिरसी थिअरीज
अमेरीकेत सगळ्याच गोष्टींबद्दल