" काय.......?? एच. आय. व्हि. टेस्ट...... डोकं बिकं फिरलय का.....???
चायला नको करुस लग्न काही अडलं नाहीये पण हे असलं काहिहि काय बोलायचं?
अत्तार्यंत मुलाला सॅलरी स्लीप मागितल्याच ऐकलं होतं पण हे म्ह्णजे अतिच होतय.
वाटलं मुलगी बघायला आलोय, बोलणं ब-यापैकी झालयं वाटतेय पण ओके पण अता हे काय नविनच. "
" दोन मिनिट मि काहि बोललोच नाहि. विचार हेच डोक्यात... काहीही काय....?
ती पण माझ्याकडेच बघत होती. काय बोलतो हा, चेह-यावरुन काही रिअॅक्शन कळते का.... मग या बाबतित मि पण हुशार आहे.
मठ्ठासारखा चेहरा करुन बसलो, काहिहि भाव नाहित चेह-यावर, ती आपली बघतेय अरे काहि तर बोल...
पण मग २ मि. शुन्यात पाहुन ठिक आहे, मि विचार करुन सांगतो म्हणालो." विशाल.
खर तर आता दिनेश विचार करायला लागलो होतो.
"मग पुढे..?" दिनेश.
"पुढे काय मग... ईकडच्या तिकड्च्या गप्पा काय काय आवडतं वगेरे वगेरे. आणि कॉफी संपवुन मग टाटा बाय बाय."
"नाहि म्हणायला एक मेकांचे फोन नंबर आणि चॅट आयडी घेतले. फोन नं. पण तिने स्वतःच दिला आणि निघालो."
खरं तर ऐकुन मि जरा उडालोच होतो... "मग तु काय ठरवलं आहेस..?" दिनेश.
"आयचा घो..... तेच तर कळत नाहिये ना.... म्ह्ट्लं मुलगी चांगली शिकलेली आहे, चांगला फर्म जॉब आहे, बोलण्या वरुन पण दोघांना ओके वाटतय... तर हे काय भलतच ?
सांगु सरळ आपण नाय करणार ते टेस्ट बिस्ट... करायचं तर कर लग्न. आपल्याला नाहित काहि तसल्या सवयी." विशाल
"मान्य आहे विशाल हे अनएक्सपेक्टेड आहे पण काय हरकत आहे?" दिनेश.
" ए दिन्या तुला महितिये आपल्याला तसल्या काहि सवयी नहियेत म्हणुन, तेच करयचं असतं ना तर छप्पन पोरि फिरवल्या असत्या. आजकाल मुलि पण काहि कमि नसतात..." विशाल.
"अरे पण ती व्हर्जिनिटि टेस्ट कर अस म्हणाली आहे क तुला...? तिचं पण म्हणणं ठिक आहे रे. आत्ता तुच नाहि का बोललास मुलं आनि मुलिंच्या बाबतित" दिनेश.
"दिन्या उगि तिचि बाजु घेउ नकोस हा तु.... तुला महितिये आपण तसले नहित म्हणुन." विशाल.
"अरे काय एकच टुमणं लावलम अहेस 'आपण तसले नाहि, आपल्याला तसल्या सवयी नहित'. ज्यांना आसतात त्यांच्या काय कपाळावर लिहलेलं असतं का?
तुला माहितिये ना एच. आय. व्हि. कसा पसरु शाकतो ते, ब्लड काँटेक्ट पण होउ शकतो. आजकाल काहि पण होउ शकतं. आणि प्रश्न जेव्हा आयुश्याचा आहे तेव्हा तिने तरी का रिस्क घ्यावि" दिनेश.
"का रिस्क घ्यावि म्हणजे मी सांगतोय ना. विश्वास नाहि का मझ्यावर " विशाल.
"अरे भेंडि... तुला तरि काय माहिती रे तुला एच. आय. व्हि. आहे का नाहि ते? ते टेस्ट केल्यावरच कळेल ना. असं लोकांना कळालं असतं तर पसरला असता का असा एच. आय. व्हि.
आणि मुळात जेव्हा अरेंज मॅरेज आहे तर तिने ईतका विश्वास ठेवावाच का?" दिनेश.
"वा म्हणजे लव्ह मॅरेज असेल तर विश्वास असावा नाहि तर नसला तरि चालतो असं म्हणायच आहे का तुला?" विशाल.
"अरे आय मिन त्यात मुलगा आणि मुलगि एकमेकांना ओळखत असतात, त्याचं डिसिजन असतं आणि काहि प्रमाणात ते दोघाहि जबाबदार असतात. पुरवी व्हायचे लग्न तेव्हा माहितितले असायचे मुलगा मुलगी पण आजकाल नसतं तसं पण तु ऊगिच फाटे नको फोडुस अत्ता तो आपला विशय नाहि आणि तुझ लव्ह मॅरेज हि नाहि, विचारलं तिने तर तु पण हो/ओ.के. काही म्हणुन टाकायचं...
अर्थात तुझ्या बाकिच्या क्रायटेरीयात बसत असेल तर.....
वाचने
3501
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या सगळ्या गोष्टी पत्रिका
कथा आवडली
धन्यवाद
In reply to कथा आवडली by पैसा
मित्राला सांगा तुझी एच आयव्ही
बरोब्बर! झाला की विषय कट!
In reply to मित्राला सांगा तुझी एच आयव्ही by स्पंदना
ओ भौ....
In reply to बरोब्बर! झाला की विषय कट! by बॅटमॅन
मग मीतरी कुठे अझ्यूम केलेय की
In reply to ओ भौ.... by अनुरोध
ह्म्मम्म. आजकाल गरजेचे आहे
येउ द्या अजुन अशाच