Skip to main content

व्हेज दम बिर्याणी..

लेखक डावखुरा यांनी शुक्रवार, 07/09/2012 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
दम बिर्याणी..[व्हेज] साहित्य : ४-५ कांदे, कोथिंबिर आणि ३-४ टमाटे, २५० ग्रॅम फ्लॉवर,३-४ गाजर,हिरवी मिरची ,४-५ लिंबु, तेल ,दही, गुलाब जल.. मसाले : आले-लसुण, तेजपान, दालचिनी, बाजा, काळी मीरी,जिरे, .लवंग,, हिरवी व काळी विलायची, ..धणे पुड, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ,लाल तिखट...पुदीना... कृती : सर्वात आधी बिर्याणी मसाल्याची तयारी करुन घेऊ.. त्यासाठी कांदे अगदी बारीक चिरुन घ्या.. त्यानंतर टमाटेही चिरुन घ्या..अगदी बारीक हं.. त्यानंतर चिरलेले गाजर आणि फ्लॉवर थोडावेळ पाण्यात राहुद्या म्हणजे ककाही माती वैगैरे लागली असेल तर ती निघुन जाईल.. नंतर त्याना थोड्या तेलात तळुन घ्या.. त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या.. आणि लिंबुही चिरुन घ्या.. चिरलेल्या लिंबुंचा एका वाटीत रस काढुन ठेवा..[त्यातुन बिया काढुन घ्यायच्या विसरु नका हं.] आलं-लसुणची बारीक पेस्ट करुन घ्या.. आता बिर्यानी साठी भात बनवुन घेऊ.. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा..पाणी गरम झाल्यावर त्यात थोडे तेल..मीठ चवीप्रमाणे आणि मसाल्यांमधुन बाजा आणि दालचिनी टाका.. आणि उकळत्या पाण्यात धुतलेला अखंड बासमती तांदुळ ३ वाटी टाकुन झाकण ठेवुन द्या.. भात पुर्ण शिजु न देता साधारण ८० % शिजल्यावर तो गॅस वरुन उतरवुन घेऊन, त्यातील पाणी चाळुन घ्या आणि ताटांमध्ये मोकळा करुन ठेवा..म्हणजे तो त्यातील वाफेने पुर्ण शिजणार नाही.. आता बिर्याणी साठी मसाला बनवुन घेऊ.. (आधी साहित्य तयार करुन ठेवल्याने आता कष्ट कमी पुरतील..) कढीत थोडे तेल टाकुन ते तापल्यावर... फोडणीसाठी जिरे टाकुन घ्या.. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, दालचिनी, बाजा, तेजपान, काळे मिरे..हिरवी काळी विलायची हे टाकुन थोडे चाळत रहा.. कांदा थोडा तांबुस-सोनेरी रंगावर आला की त्यात टमाटे घाला..आणि चाळुन घ्या.. त्यात आता हळद, धणे पूड, चवीनुसार मीठ..बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालुन घ्या.. बनलेल्या मसाला बराच कडक आहे..त्याला थोडा माईल्डनेस येण्यासाठी क्रीम किंवा दही घालु शकता.. आता मसाल्यात डीपफ्राय केलेल्या भाज्या घाला..फ्लॉवर, गाजर, घेवडा... ही झाली पुर्वतयारी .. आपण आत्तापर्यंत ८०% शिजलेला भात आणि बिर्याणीचा मसाला बनवुन ठेवल्या.. आता खरी कृती चालु होतेय.. बिर्याणीला दम देणे.. प्रथम एक जाड बुडाचे पातेले[भांडे] घ्या.. त्यात पुर्वी बनवुन ठेवलेल्या बिर्याणी मसाल्यातील अर्धा मसाला व्यवस्थित पसरवुन घ्या.. त्यावर थोडीशी कोथिंबिरही पेरा.. आणि स्लीट मारलेली हिरवी मिरचीही.. (उभी कापलेली) त्यावर ८० % शिजलेल्या अखंड बासमती भाताचा एक थर द्या..साधारण निम्मा भात वापरुन घ्या.. त्यातील शिजताना टाकलेले अक्खे गरम मसाले काढुन घ्या.. त्यावर लिंबाचा र व गुलाबपाणी शिंपडा..आणि पुदिन्याची पाने, उभ्या चिरलेल्य मिरच्या पेरुन टाका.. त्यावरुन परत एक बिर्याणी मसाल्याचा थर द्या.. वरच्या थराला पण समान कृती करा.. आता सर्व थर लावुन झाल्यावर ह्या भांड्याला वरच्या बाजुला कणकेचा जाड थर लावुन घ्या.. आणि त्यावर झाकण घट्ट लावा..म्हणजे व्यवस्थित दम बसेल... भात ८०% शिजलेला असल्याने त्याला जास्त उष्णतेची गरज नाहीये.. त्यामुळे जाड तवा घेऊन तो गॅस वर तापवुन घ्या..मग हे कणकेने पॅक केलेल्या झाकणाचे भांडे तव्यावर ठेवा..अर्ध्या मिनिटानंतर गॅस मंद आचेवर करुन १० मिनिटांनी बंद करा.. त्यानंतर झाकण उघडुन मस्त चळुन घ्या.. व्हेज दम बिर्याणीचा सुंदर घमघमाट सुटलेला आहेच...लगेच गरमागरम बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार.... सोबत तोंडी लावायला बुंदी रायता पण घेऊ शकता बरंका.. टीप : प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..

वाचने 29014
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

अतिशय धन्यवाद, नुसतं वाचुन प्रतिसाद द्यायला नको म्हणुन दिला नव्हता, काय घरी प्रयोग करुन पाहिला थोडासा हसला, थोडासा रुसला, एकुण काय ३०% फसला, असो. तुमचं प्रेझेंटेशन एकदम मस्त झालंय, मी मिरच्या आणि टोमॅटो अंमळ कमी घातले होते त्यामु़ळं गंडलं असावं बहुधा. आता एकदा तुमच्याबरोबर करुन पहावी म्हणतो, कधी जमवाल ते बोला.

चार घटक गोळा करुन त्याचा शब्दशः गोळा करुन शिजवून गिचका करणं हे खूप सोपं.. पण निगुतीने कष्ट घेऊन समरस होऊन बनवलेला कोणताही पदार्थ हा नेहमीच अत्यंत स्वादिष्ट असतो. केवळ अलंकारिक अर्थानेच त्यात "हृदय" उतरलेलं असतं असं नाही तर प्रॅक्टिकलीही त्यात अचूक प्रोसेस आणि सर्व आवश्यक घटक नीट वापरले जाऊन क्वालिटी येतेच येते. आजी लोकांच्या पदार्थाची चव अजूनही लक्षात असण्यामागे फक्त नात्यातली भावना नसते.. त्यांचं स्वयंपाकातलं "प्रोफेशनलिझम" त्यात असतं. (त्या घरगुती असल्या तरी "प्रोफेशनलिझम" शब्द बरोबर आहे.) दगडफूल म्हणा किंवा एखादा बारीकसा वाटणारा इन्ग्रेडिएंट घरात नसेल तर पोरांना दुकानात पिटाळून तो आधी आणल्याखेरीज तो पदार्थ पूर्ण न करणार्‍या या व्यक्ती. तडजोड नको.. शॉर्टकट नामंजूर. अमुक एक चाकवताची पातळभाजी ताकातली बेष्ट लागते तर ताकातलीच करणार.. ताकाशिवाय आजचा दिवस भाजी उरकून टाकू हा भागच शक्य नाही. एकवेळ बेत रद्द करतील..पण करायचं तर सर्व जिन्नस हवेतच.. तशीच ही बिर्याणी.. शिवाय हे वाचून बनवू इच्छिणार्‍यालाही शंका न रहावी अशा रितीने जे काही तपशीलवार दाखवलं आहे त्याचा जवाब नाही. असंख्य धन्यवाद.

खतरणाक. दम न दिलेली बिर्यानी खाणं एरवी पसंत असतं आपल्याला. पण हे प्रकरण पाहून सालं एकदा दमदार बिर्यानी बी खौन बघावी असं वाटायलंय आता.

मस्त :) अमोल केळकर

मस्त वर्णन ..बिर्याणी आवडली. अवांतरः आय डी डावखुरा आणि कांदा उजव्या हातानी का कापताय? ;-)