बार्ली डोसा
नमस्कार मंडळी! 'या लेखकाने पाककृती विभागात सक्रिय लिखाण करण्याचं धाडस कसं केलं' असा विचार करून दचकू नका! ही पाककृती माझी नाही :-) तेंव्हा नि:शंक मनाने प्रयोग करा, हा पदार्थ फारच नामी होतो असा माझ्या जिभेचा दावा आहे!
अमेरिकेत राहूनही फक्त शाकाहारी आणि फक्त स्वहस्ते शिजवलेलंच खाणार्या आमच्या परिचयातील हिमबिंदू या तेलुगू कन्यकेने, 'नेहमी नवीन काहीतरी प्रयोग करून पहायचं' या वृत्तीने ही अनोखी डिश खायला घातल्याबद्दल आणि त्याची पाककृती पुरवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा सहभाग फक्त ही पाककृती तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवणे इतकाच आहे, डोसा आवडेल अशी आशा आहे.
[ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी: बार्ली हे गव्हासारखं एक द्विदल धान्य, ते असं दिसतं:
]
डोसा:
१ कप बार्ली
१/४ कप उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
१०-१२ मेथी दाणे
वरील सर्व पदार्थ सकाळी एकत्र भिजवून ठेवा.
संधाकाळी ८-१० तासांनी अर्धी वाटी पोहे ५ मिनिटे भिजवून, आधी भिजवलेल्या वरील मिश्रणात एकत्र करा, आणि हे सर्व मिक्सर मधून मऊ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. आता हे मिश्रण रात्रभर उबदार जागी आंबवण्यास ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे डोसे करा. ६-८ डोसे होतील. ते खालील दुधी भोपळ्याच्या चटणीबरोबर गरम-गरम खायला द्या/घ्या.
दुधी भोपळ्याची चटणी:
हिमबिंदूने ही चटणी बरीचशी या दुव्यावर दिलेल्या कृतीने केली, फक्त तिने दुधी भोपळा शिजवण्यापासून सुरूवात करण्याऐवजी दुधी भोपळ्याचा तयार पल्प वपरला आणि त्यात चिंचेचा एक चमचाभर कोळ वापरला.
१०० ग्रॅम दुधी भोपळ्याचा पल्प आणि अर्ध्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ हे दोन्ही एकत्र करून त्याला १ चमचा गरम तेलात खालीलप्रमाणे फोडणी द्या:
१ टेबल्स्पून उडीद डाळ, ती तांबूस/ ब्राऊन झाल्यावर,
२ टेबल्स्पून जिरं
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची
६-८ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ लसूण पाकळ्या
६-७ पानं कडीपत्ता
हे क्रमाने घातल्यावर मग वरील दुधी भोपळा-चिंच मिश्रण घाला. आता १/२ चमचा हळद घालून ३-५ मिनिटे परता (कच्च्या दुधी भोपळ्याचा वास गेला पाहिजे).
नंतर हे परतेलेले मिश्रण १ मूठभर भाजलेले, सोललेले शेंगदाणे घालून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करा, आवश्यक वाटेल तितकेच पाणी घाला.
वाचने
11718
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
वाह!!
हा प्रकार बराच पौष्टिक असणार
छान लागतो +१
In reply to छान लागतो +१ by धनंजय
I stand corrected, Sir!
चटणी नक्की करुन बघेन.
In reply to चटणी नक्की करुन बघेन. by शिल्पा ब
डोस्याला फाट्यावर मारले का ताई??
वा! छानच!
बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य
In reply to बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य by रेवती
कुठली पाककृती?
In reply to कुठली पाककृती? by प्रभाकर पेठकर
बार्ली सूपची पाकृ एका
In reply to बार्ली सूपची पाकृ एका by रेवती
निराश.
In reply to निराश. by प्रभाकर पेठकर
निराश.
In reply to निराश. by सन्जयखान्डेकर
उगीच काय..
In reply to निराश. by प्रभाकर पेठकर
हा हा हा. नाही नाही. ते पेय
In reply to बहुगुणींना इथे पाहून आश्चर्य by रेवती
आश्चर्यच ना, भीती नाही वाटली, हे बरं झालं!
अगदी छान... आणी चटणीसाठी-खास
नविन
वा
माझे बार्ली प्रेम.
अरे, हा तर एकदम वेगळाच प्रकार
आवसम! चटणीची पाकृ पण छान !
वा मस्त!
पाकृ - मस्त विथ समस्या !
धन्यवादस हो काकानु.
In reply to धन्यवादस हो काकानु. by परिकथेतील राजकुमार
कोणीतरी कश्याला? हक्काचं
In reply to कोणीतरी कश्याला? हक्काचं by रेवती
ऑ ?
In reply to धन्यवादस हो काकानु. by परिकथेतील राजकुमार
खोटारड्या!!!!!
In reply to धन्यवादस हो काकानु. by परिकथेतील राजकुमार
हेच हेच
प्रचंड , दारूण , भीषण , सहमत.
In reply to प्रचंड , दारूण , भीषण , सहमत. by तर्री
नक्की कोणासाठी ?
In reply to नक्की कोणासाठी ? by परिकथेतील राजकुमार
दोघांशाठी !
सर्वांना धन्यवाद!
आजच केला होता हा दोसा. चांगला
बार्ली नसल्यानं फक्त चटणी
वा..
पास
वा वा!
चला