Skip to main content

ट्रेनच्या प्रवासामधील मधील एक विचीत्र अनुभव

लेखक शुचि यांनी रविवार, 02/09/2012 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
जिंक्स यांचा "अतर्क्य" हा अनुभवात्मक लेख आत्ताच वाचला. खरोखर विचीत्र म्हणावा असा अनुभव आहे. माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते - मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली. मी पर्सवरचा हात काढून डोक्यावर हात नेला की तो हात एकदम जायचा. असे १० मिनीटे चालले. मी मागे वळून तुसड्यासारखी म्हणाले "हात मत लगाओ" , ती बाई म्हणाली "मै नही लगा रही हूं" परत तिला म्हटले "एक बार बोला ना हाथ मत लगाओ" ती बाई परत म्हणाली "अरे बहन मै नही लगा रही हुं". मी पर्सवरचा हात चटकन डोक्यावर नेऊन तो हात पकडायचा प्रयत्न अनेकदा केला पण तो हात बरोब्बर "इन निक ऑफ टाईम" निघून जायचा त्यामुळे माझ्या काही तो हात पकडीत आला नाही. १० मिनिटात मला काही गोष्टी जाणवल्या - (१) स्पर्श हळूवार होता , स्त्रीचा होता(२) हाताची बोटे लहानसर (लांबसडक नाही) पण निमुळती होती . (३) टाळूवरुन हात क्लॉकवाईज फिरत होता. बरं मागील कोणाही स्त्रियांना काही दिसत असल्याचे जाणवत नव्हते. त्या गप्पांमध्ये मग्न होत्या. मी ना पर्सवरचा हात सोडायला तयार होते ना बारवरचा. कारण बारवरचा हात सोडला असता तर १००% बाहेर फेकले गेले असते. तब्बल १० मिनिटांनी हात फिरणे थांबले व मी त्या दिवशी गर्दीमुळे मुलुंडऐवजी ठाण्याला उतरून परत मुलुंडला आले. मुलुंडला माझा फ्रेन्च भाषेचा वर्ग होता (शिकत होते) तो करून घरी आले ती पहील्यांदा आंघोळ केली व देवळात गेले. पुढे काही वर्षांनंतर माझी एक "व्याधी" डायग्नोस झाली जी मेंदूशी संबंधीत होती. आजपर्यंत हे कळले नाही की तो हात का डोक्यावरुन फिरत होता. कोणी चोरट्या बायकांना माझी पर्स लांबवायची होती? चोरट्या बायकांची टोळी असावी ज्यांची "मोडस ऑपरंडी" असावी - लक्ष विचलीत करून पर्स पळविणे. पण डोक्यावर हात फिरवला तर अन्य बायकांच्या लक्षात येईलसे वाटते त्यामुळे या विचारास तितकीशी पुष्टी मिळत नाही. असे असेल का? तो स्पर्श वाईट होता की चांगला? कारण ही व्याधी डायग्नोस होणे ही माझ्याबरोबर घडलेली "सर्वात मोठी चांगली" गोष्ट होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8381
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

>>>कारण ही व्याधी डायग्नोस होणे ही माझ्याबरोबर घडलेली "सर्वात मोठी चांगली" गोष्ट होती. काही समजले नाही .

In reply to by शुचि

व्याधी होउन डायग्नोस होण्यापेक्षा व्याधी न होणेच चांगले नाही का ? (तुमच्या सगट कुठल्याच मिपाकरांना कुठल्याच प्रकारची व्याधी होउ नये अशी इच्छा असलेला) मराठी अन्ना

In reply to by रेवती

तो 'अतर्क्य' लेख वाचून मला ही जरा घाबरल्यासारखे झाले होते थोड्या वेळ उगाच मग मनात भलते-सलते विचार येतात :O

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अतिशय विचित्र अनुभव येतात... एक भीक मागणाऱ्या स्त्रीसोबत एक २-३ वर्षाचा मुलगा होता. ती बाई त्याच्या डोक्यावर गोल गोल हात फिरवायची, आणि हा चाबी लावल्यागत सगळ्यांसमोर पैसे द्या म्हणून हातवारे करायचा. त्याच्या जिभेवर ती कसली तरी पावडर लावत होती. लोकं म्हणत होते तो चुना वगैरे असावा त्या पोराची जीभ जाळायला, पण मला ते वेगळंच वाटलं....ड्रग्ज वगैरे सारखं.... काय माहित.

हा लेख विडंबन आहे का??? :) आणि व्याधी डायग्नोस होण्याचा आणि डोक्यावरुन कोणाचातरी हात फिरणे याचा एकदुसर्याशी संबंध कोणत्या लॉजिकने???

लोकलच्या गर्दीत जिवंत सहीसलामत घरी परत येणे ही एक चमत्कार म्हणण्यासारखी गोष्ट असावी.

शुचि, म्हणजे तुला असं म्हणायचय का कि त्या डोक्यावरच्या स्पर्शाची आणि नंतर डायग्नोस झालेल्या मेंदुच्या व्याधीची काही रीलेटीव्हिटी आहे. तो अनुभव हा काही संकेत ( दैवी वगैरे) होता... असं काही?

मलाही अगदी अस्साच अनुभव आला होता. मी मुंबईच्या प्रचंड गर्दीच्या लोकलच्या जनरल डब्यातून (द्विरुक्ती, त्रिरुक्ती होतेय) करी रोड ते ठाणे प्रवास करत असताना दादरपासून पुढे माझ्या पाठीवर कोणीतरी छापापाणी खेळत असल्यासारख्या थपाथप थापा मारत होतं. मागे वळून पाहायचा प्रयत्न केला की कोणीतरी "सिद्दा खडा रहो" असं ओरडायचं. मधून मधून थापा पडतच होत्या. स्पर्श जोरदार होता, पाठीच्या मध्याकडून बाहेर पसरत जाणारा आणि विरळ होत जाणारा (हायपरबोलिक) होता. हाताची बोटे जाडजूड होती. हात (पक्षी: हाताचा मालक) कनवाळू वाटत होता. योगायोग असा की या प्रसंगाआधी दोन वर्षं मला एक व्याधी डिटेक्ट झाली होती, ती पाठीशी संबंधित होती. या लोकलच्या थापाप्रसंगानंतर ती पाठीशी संबंधित व्याधी कायमची बरी झाली. काही गोष्टी अतार्किक आणि विलक्षण असतात हेच खरं..

In reply to by गवि

हे राम. हे पण विडंबन आहे? अनुभव असेल असे दिसत नाही.... ;) या वेळी चक्क गांधी? जरा जपून ... ते थत्तेचाचा आले तर खैर नाही तुमची! की आयडी हॅक झालाय की क्वॉय??? मुळ प्रतिसादात
लोकलच्या थापाप्रसंगानंतर
असे असल्याने विचारले बॉ...

बहुतेक कोणीतरी तुम्हाला 'सहज'चे रिअलायझेशन द्यायचा प्रयत्न करत असावे.... हात क्लॉकवाईस फिरवत होते की अँटीक्लॉकवाईस?

व्याधी चे डायग्नोसिस होणे व ट्रेनमधील अनुभव यांचा एकमेकांशी सांकेतिक संबंध आहे अस काही म्हणायच आहे का तुम्हाला?

@गवि - ताबडतोब व्यनि केला आहे. @ घाटपांडे आणि जाई - मला तो अनुभव अतर्क्य वाटतो. सांकेतिक संबंध असावा

तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला तुमच्या शरीरात दडलेल्या व्याधीबद्दल सांकेतिक स्वरुपात आगाऊ माहिती दिली असा एक तर्क होऊ शकतो. आपल्या मेंदूचे कार्य अजूनही विज्ञानाला एक कोडे आहे. तुम्हाला झालेला आभास हा तुमच्याच मेंदूने घडवून आणलेला एक भास असावा. कितीतरी वेळा आपल्याला अचानक एखादे गाणे अवेळी सुचते व बराच वेळ ते डोक्यात रेंगाळत राहते. त्याचा सुद्धा भविष्यातील घडणाऱ्या घटनेशी संबंध असावा असे मला वाटते. त्याची प्रतीची मला आलेली आहे.

लोकल मधले एक से एक अतर्क्य हनुभव गेल्या १० वर्ष्यांच्या प्रवासात गाठोडित जमा केले आहेत .. लिहायचं म्हटल तर वेगळी सिरीज सुरु करावी लागेल ;) बाकी डोक्यावरून गोल गोल हात फिरवणारा अनुभव वाचून मौज वाटली

In reply to by स्पा

खरय. लोकलमधल्या अनुभवाबद्दल काय बोलायचं? एक अनुभवः एका चिकन्याचुपड्या चेहर्‍याच्या मित्राबरोबर जाताना एक माणूस गर्दीचा फायदा घेउन त्याच्या मागं अगदी चिकटून उभा राहिला. लोकल सुरू झाली तशी तो जोशात आला. हा नक्की काय प्रकार आहे ते कळे पर्यंत त्यानं कार्यभाग साधून घेतला होता. पुढच्या स्टेशनवर तो थँक्स म्हणून उतरलासुद्धा! एव्हढ्या गर्दीत होणारं हे 'वरचेवर' प्रकरण आठवलं तरी किळस येते. आता पब्लीक शहाणं झालं आहे पण ही घटणा २००० मधली आहे.

In reply to by दादा कोंडके

फुल टू माझा अनुभव. विनयभंग झालेला - विनीत.