जिंक्स यांचा "अतर्क्य" हा अनुभवात्मक लेख आत्ताच वाचला. खरोखर विचीत्र म्हणावा असा अनुभव आहे.
माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते - मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली. मी पर्सवरचा हात काढून डोक्यावर हात नेला की तो हात एकदम जायचा. असे १० मिनीटे चालले. मी मागे वळून तुसड्यासारखी म्हणाले "हात मत लगाओ" , ती बाई म्हणाली "मै नही लगा रही हूं" परत तिला म्हटले "एक बार बोला ना हाथ मत लगाओ" ती बाई परत म्हणाली "अरे बहन मै नही लगा रही हुं". मी पर्सवरचा हात चटकन डोक्यावर नेऊन तो हात पकडायचा प्रयत्न अनेकदा केला पण तो हात बरोब्बर "इन निक ऑफ टाईम" निघून जायचा त्यामुळे माझ्या काही तो हात पकडीत आला नाही.
१० मिनिटात मला काही गोष्टी जाणवल्या - (१) स्पर्श हळूवार होता , स्त्रीचा होता(२) हाताची बोटे लहानसर (लांबसडक नाही) पण निमुळती होती . (३) टाळूवरुन हात क्लॉकवाईज फिरत होता.
बरं मागील कोणाही स्त्रियांना काही दिसत असल्याचे जाणवत नव्हते. त्या गप्पांमध्ये मग्न होत्या.
मी ना पर्सवरचा हात सोडायला तयार होते ना बारवरचा. कारण बारवरचा हात सोडला असता तर १००% बाहेर फेकले गेले असते.
तब्बल १० मिनिटांनी हात फिरणे थांबले व मी त्या दिवशी गर्दीमुळे मुलुंडऐवजी ठाण्याला उतरून परत मुलुंडला आले. मुलुंडला माझा फ्रेन्च भाषेचा वर्ग होता (शिकत होते) तो करून घरी आले ती पहील्यांदा आंघोळ केली व देवळात गेले.
पुढे काही वर्षांनंतर माझी एक "व्याधी" डायग्नोस झाली जी मेंदूशी संबंधीत होती.
आजपर्यंत हे कळले नाही की तो हात का डोक्यावरुन फिरत होता. कोणी चोरट्या बायकांना माझी पर्स लांबवायची होती? चोरट्या बायकांची टोळी असावी ज्यांची "मोडस ऑपरंडी" असावी - लक्ष विचलीत करून पर्स पळविणे.
पण डोक्यावर हात फिरवला तर अन्य बायकांच्या लक्षात येईलसे वाटते त्यामुळे या विचारास तितकीशी पुष्टी मिळत नाही.
असे असेल का? तो स्पर्श वाईट होता की चांगला? कारण ही व्याधी डायग्नोस होणे ही माझ्याबरोबर घडलेली "सर्वात मोठी चांगली" गोष्ट होती.
वाचने
8381
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>कारण ही व्याधी डायग्नोस
व्याधी होणे नाही हो "डायग्नोस
In reply to >>>कारण ही व्याधी डायग्नोस by उगा काहितरीच
व्याधी होउन डायग्नोस
In reply to व्याधी होणे नाही हो "डायग्नोस by शुचि
अग्ग्ग्गायायाय! असं काही
हो ना गं
In reply to अग्ग्ग्गायायाय! असं काही by रेवती
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये
हो हा हातही गोल गोलच फिरत
In reply to मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये by सुहास झेले
हा लेख विडंबन आहे का??? आणि
असले विडंबन?
In reply to हा लेख विडंबन आहे का??? आणि by टवाळ कार्टा
बापरे!
शुचि, म्हणजे तुला असं
मलाही अगदी अस्साच अनुभव आला
??
In reply to मलाही अगदी अस्साच अनुभव आला by गवि
हे राम.
In reply to ?? by निनाद
अं?
In reply to हे राम. by गवि
हे राम?? बाप्रे!! हे वाक्य
In reply to हे राम. by गवि
शुची ,काहिच कळलं नाहि गं
पूजा काय कळलं नाही? तो अनुभव
In reply to शुची ,काहिच कळलं नाहि गं by जेनी...
खरोखरच अतर्क्य अनुभव
बहुतेक कोणीतरी तुम्हाला
क्लॉकवाईज.
In reply to बहुतेक कोणीतरी तुम्हाला by कवटी
सांकेतिक
@गवि - ताबडतोब व्यनि केला
तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला
लोकल मधले एक से एक अतर्क्य
हा हा...
In reply to लोकल मधले एक से एक अतर्क्य by स्पा
:(
In reply to हा हा... by दादा कोंडके
लोकलमध्ये/गर्दीमध्ये पुरुष
झाकली मुठ
In reply to लोकलमध्ये/गर्दीमध्ये पुरुष by रेवती