लष्कर ए तोयबा - उच्चशिक्षित दहशतवादी
देशामधे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
आजवर अडाणी, गरीब जनता यामधे सहभागी असेल असा समज होता.
पण
पुणे स्फोट आणि मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंगलोर, हैद्राबाद येथे पोलिसांनी कारवाई केली.
त्यात अटक झालेल्यांमधे अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे. हे अतिशय धक्कादायक आहे.
एक पत्रकार, एक डॉक्टर आणि डी आर डी ओ मधील एक शास्त्रज्ञ यामधे सामील आहेत.
त्यांच्याकडे विदेशी रायफलही मिळाली आहे.
अटक करण्यात आलेला डॉक्टर लष्कर-ए-तय्यबा सारख्या संघटनांना माणसे पुरविण्याचे,
तरुणांची भरती करण्याचे काम करीत असे.
लष्कर-ए-तय्यबा आणि तत्सम संघटनांना आजवर पाकमधून बळ मिळत होते.
पण आता त्यांना सौदीमधूनदेखील आर्थिक पाठबळ मिळते असे आढळले आहे.
मराठवाड्यात पकडलेल्या २ अतिरेक्यांना तर सौदीमधे आश्रयही मिळाला होता.
एका बाजूला भारताचे मित्र म्हणवणारे देश दुसर्या बाजूला काय कारनामे करताहेत, हे विचार करण्याजोगे आहे
२० वर्षापूर्वी काश्मीरमधेही या अशाच प्रकारांना सुरुवात झाली होती.
या सगळ्या घटना पाहता एक अजून आठवण होते.
९३ च्या बॉम्बस्फोटात सामील असणारा मेमन हादेखील सी ए होता.
बंगलोरमधे पकडलेल्यांना कैगा अणुऊर्जा प्रकल्प, कारवारातील सीबर्ड हा नाविक तळ
यावर हल्ला करावायचा होता
इतर हल्ल्यांपेक्षा हा हल्ला फार अवघड आहे. याला मोठी आर्थिक आणि लष्करी तयारी हवी.
या सगळ्याच मुळे दूरवर आणि खोलवर गेली असण्याची शक्यता आहे.
--
असे म्हटले जाते की देशभक्ती ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. ती शिकवावी लागत नाही.
मग प्रश्न पडतो
शिकलेली माणसेच अशी का वागतात ?
इथेच खायचं, इथेच राहायचं, इथेच जन्मायचं आणि शेवटी याच मातीत मिसळून जायचं.
मग आयुष्यभर या देशाशी वैर का करायचं.
कळत नाही काही माणसं
जिथे खातात तिथेच का **** ?
.
प्रतिक्रिया
काहि माणसं...
<strong>पण आता त्यांना
वाचत आहे
वाट पाहत आहोत
पाकिस्तानी अण्वस्त्रे धोक्याच्या छायेत
उच्च्शिक्षित अतिरेकी...!!!!!
देशभक्ती ही अतिशय नैसर्गिक
देशभक्त की देशद्रोही?
स्वदेशाशी गद्दारी