साहित्यः
राईस पेपर / शीट्स
पातळ उभा चिरलेला कोबी
पातळ उभं चिरलेलं गाजर
पातळ उभी चिरलेली काकडी
थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स
(तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता)
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
१ टेस्पून टोमॅटो सॉस
स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी
पाकृ:
प्रथम एका ताटात थोडे पाणी घेऊन राईस पेपर / शीट्स दोन्ही बाजूने १० सेकंद भिजवून घ्या.
भिजवलेली राईस पेपर / शीट्स एका कोरड्या ताटात किंवा चॉपींग बोर्डवर अलगदपणे ठेवा.
(पाण्यात भिजवल्यामुळे नाजूकपणे हाताळावे)

त्यावर उकडलेल्या न्युडल्स , गाजर, कोबी व काकडी ठेवा.
थोडीशी पांढरी मिरपूड भुरभुरा व थोडासा टोमॅटो सॉस घाला.
(जास्त सॉस घालू नका नाहीतर पेपर / शीट्स ओलसरपणामुळे फाटू शकतात)
अलगदपणे रोल गुंडाळायला सुरुवात करा, कडा दुमडा व पुन्हा रोल गुंडाळा.
असे सर्व रोल तयार करुन घ्या.

हे समर रोल्स तुम्ही स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.
नोटः
ह्यात तुम्ही झुक्किनी, लेट्युस, मोडाचे मूग .इ. आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता.
ह्यात उकडलेल्या अंड्याचे स्लाईस ही घालू शकता.
तेल अजिबात नसल्यामुळे आणी फक्त सॅलॅड असल्यामुळे पौष्टीक आहे.
स्टार्टर / स्नॅक्स म्हणून सर्व्ह करु शकता.
हवे असल्यास ह्याच शीट्स वापरुन तुम्ही स्प्रींग रोल म्हणून तळू शकता.
आवडीप्रमाणे वेग-वेगळे सॉस वपरु शकता
आहा! किती नाजुक
+१.. याला पाकृ म्हणण्यापेक्षा
In reply to आहा! किती नाजुक by स्पंदना
फारच नाजूक आणि रंगीबेरंगी
लाजव्वाब दिख रहा है
काय खतरा झालीय पाकृ.
मस्त !!!
हुम्म्म्म्म
सही
राईस पेपर..
छानच दिसताहेत, शिवाय पौष्टीक
हो, हीच शंका विचारायची आहे,
In reply to छानच दिसताहेत, शिवाय पौष्टीक by शिल्पा ब
अहो तो कागद , कागद नाय काय
In reply to हो, हीच शंका विचारायची आहे, by सस्नेह
तो कागद म्हणजे
In reply to हो, हीच शंका विचारायची आहे, by सस्नेह
सानिकाताई, राईस शीट ही तांदूळ
In reply to तो कागद म्हणजे by सानिकास्वप्निल
हो का...
In reply to सानिकाताई, राईस शीट ही तांदूळ by पिंगू
लाजवाब !
तुम्हाला मिशिलिन स्टार
In reply to लाजवाब ! by हारुन शेख
मिशिलिन स्टार
In reply to तुम्हाला मिशिलिन स्टार by ५० फक्त
पुण्यात कर्वे रस्त्याजवळ एक
अवर्णनीय!
आंतरजाल....
In reply to अवर्णनीय! by वामन देशमुख
मिपावरच्या पाकृ
In reply to आंतरजाल.... by प्रभाकर पेठकर
अतिशय सुंदर.
क्या बात है |
पाकृ नाजुक खरी आणी फटु
करुन बघीतल्याशिवाय
In reply to पाकृ नाजुक खरी आणी फटु by मृत्युन्जय
देखणे दिसतायत रोल्स!
बघत बसावं अशी पाकृ !!
अं हं ...
अर्ध्या तु वाईच उशिरा आलास
In reply to अं हं ... by अर्धवटराव
ह्म्म्म... बघा
In reply to अर्ध्या तु वाईच उशिरा आलास by गणपा
देखणे!
मस्तच. मि पा वर प्रथमच
मस्त ! (चायनीज स्प्रींग
य भारी....!
पाककृती दिसत नाहीत