मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेज समर रोल्स

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः राईस पेपर / शीट्स पातळ उभा चिरलेला कोबी पातळ उभं चिरलेलं गाजर पातळ उभी चिरलेली काकडी थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स (तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता) १/२ टीस्पून पांढरी मिरपूड १ टेस्पून टोमॅटो सॉस स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी . पाकृ: प्रथम एका ताटात थोडे पाणी घेऊन राईस पेपर / शीट्स दोन्ही बाजूने १० सेकंद भिजवून घ्या. भिजवलेली राईस पेपर / शीट्स एका कोरड्या ताटात किंवा चॉपींग बोर्डवर अलगदपणे ठेवा. (पाण्यात भिजवल्यामुळे नाजूकपणे हाताळावे) . . त्यावर उकडलेल्या न्युडल्स , गाजर, कोबी व काकडी ठेवा. थोडीशी पांढरी मिरपूड भुरभुरा व थोडासा टोमॅटो सॉस घाला. (जास्त सॉस घालू नका नाहीतर पेपर / शीट्स ओलसरपणामुळे फाटू शकतात) अलगदपणे रोल गुंडाळायला सुरुवात करा, कडा दुमडा व पुन्हा रोल गुंडाळा. असे सर्व रोल तयार करुन घ्या. . हे समर रोल्स तुम्ही स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह करा. . नोटः ह्यात तुम्ही झुक्किनी, लेट्युस, मोडाचे मूग .इ. आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. ह्यात उकडलेल्या अंड्याचे स्लाईस ही घालू शकता. तेल अजिबात नसल्यामुळे आणी फक्त सॅलॅड असल्यामुळे पौष्टीक आहे. स्टार्टर / स्नॅक्स म्हणून सर्व्ह करु शकता. हवे असल्यास ह्याच शीट्स वापरुन तुम्ही स्प्रींग रोल म्हणून तळू शकता. आवडीप्रमाणे वेग-वेगळे सॉस वपरु शकता

वाचने 12793 वाचनखूण प्रतिक्रिया 36

रेवती Fri, 09/07/2012 - 06:55
फारच नाजूक आणि रंगीबेरंगी आहेत. खाण्यापेक्षा बघत रहावेत असे! सगळे फोटू सुंदर आलेत. (फोटूही अलगदपणे काढले असावेत असे वाटत आहे.) पाकृ तशी सोपीही आहे. तुझ्याकडे पाहुणे आल्यावर हा प्रकार करू नकोस. खाण्याऐवजी बघत बसतील नुसते. ;)

कच्ची कैरी Fri, 09/07/2012 - 09:24
आजच मी व्हेज स्प्रिंग रोल बनवायचा विचार करत होते आणि लगेच तुझी एकदम झक्कास !! यम्मी !!! सुपरकूल !! रेसेपी मिळाली :) ह्याच नॉन -व्हेज व्हर्जन करुन बघेन :) धन्यवाद !

इरसाल Fri, 09/07/2012 - 09:41
काय बरे प्रतिसाद द्यावा ? बरं हे तांदळाचे पातळ कागद भारतात मिळतात काय? असल्यास कोणत्या अन्नसाखळीवाल्यांकडे ? स्प्रिंगरोल सारखे मैद्याचे चालावेत असा माझा अंदाज.( किंवा मोमोजसाठी असतात तसे)

मी_आहे_ना Fri, 09/07/2012 - 09:54
नेहमीप्रमाणेच जबरदस्त पेशकश... इथे भारतात उन्हाळ्यात नाही तरी १५ ऑगस्टला बनवायला हरकत नाही, मधे एखादं "ब्लॅक ऑलिव्ह" लावून :)

In reply to by सस्नेह

तो कागद म्हणजे अगदीच कागद नाही ओ (एडिबल आहे तो )...तांदळाच्या पीठाचे पातळ आवरण आहे , पापडासारखे दिसते पण चवीला उकडीसारखे लागते. पाण्यात तो मऊ होण्यासाठीच भिजवायचा तो राईस पेपर काढून खायचा नाही त्याच्यासकट खायचं

हारुन शेख Fri, 09/07/2012 - 11:10
लाजवाब ! तुमच्या स्वयंपाकघराला नक्कीच 'पंचतारांकित' दर्जा मिळालेला असणार.

बाळ सप्रे Fri, 09/07/2012 - 11:28
पुण्यात कर्वे रस्त्याजवळ एक "fine foods" नावाचे दुकान आहे जे फक्त आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.. तिथे प्रयत्न करून बघतो हे तांदळाचे कागद मिळतात का.. बाकी पाकृ एकदम भारी.. या कागदात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरच काही गुंडाळता येईल :-)

वामन देशमुख Fri, 09/07/2012 - 12:24
पाककृती, चित्रीकरण, सादरीकरण, इ. सर्वकाही नेहमीप्रमाणे अजोड आहे. कोणत्या शब्दांत वर्णन करू? राइस पेपर सारख्या कागदांपासून(?) आंध्रात पुत्रेकुलू (पेपर स्वीट) नावाचा गोड पदार्थ बनवतात. अवांतर: मला मैसूरपाकाची पाककृती हवीय. कुणी पाकृ/ दुवा देऊ शकेल काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

वामन देशमुख Fri, 09/07/2012 - 13:53
गुगलून पाहा.
पाहिल्यात आणि खूपश्या मिळाल्यात सुद्धा. पण मिपावरच्या पाकृ करून पाहताना जो आत्मविश्वास वाटतो, तो वाटत नाहीय. मिपावर यापूर्वी कुणी मैसुरपाकाची पाकृ मांडलीय का?

मृत्युन्जय Fri, 09/07/2012 - 14:31
पाकृ नाजुक खरी आणी फटु सुद्धा लाजवाब. पण का ते महित नाही, ही पाकृ टेष्टी मात्र वाटत नाही. करुन किंवा विकत आणुन कधी खाईन असे वाटत नाही. प्रेझेंटेशन साठी मात्र १०० / १०० :)

In reply to by मृत्युन्जय

करुन बघीतल्याशिवाय किंवा खाऊन बघीतल्याशिवाय कसे कळणार टेष्टी आहे का ते :) करुन बघा नाही आवडले तर राहिलं ... धन्यवाद

अर्धवटराव Fri, 09/07/2012 - 22:45
अजीबात मजा नाहि आला... पण याला कारण डवखुर्‍याची बिर्याणी रेसीपी आहे. ति बिर्याणी आडवा हात मारुन पोट फुटेस्तो खायचे मांडे मनात शिकत असताना हि नाजुक साजुक स्टार्टर पाकृ बघितली... बिर्याणीचा रसभंग झाला :( अर्धवटराव