गोळ्यांसाठी साहित्यः
चणा डाळ १ वाटी
आलं १ इंच
हिरव्या मिरच्या ३-४ नग
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
मीठ चवीनुसार
खायचा सोडा १/२ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
गोळ्यांची कृती:
चणाडाळ ६-७ तास पाण्यात भिजत टाका. नंतर पाणी निथळवून मिक्सरवर, कमीतकमी पाणी वापरून, भरडसर वाटून घ्या. घरात खिम्याचे यंत्र (मिन्सिंग मशीन) असेल तर उत्तम. अजिबात पाणी न घालता त्यातून वाटून घ्या.
आलं + हिरव्या + मिरच्या एकदम बारीक चिरून किंवा खलबत्यात कुटून वाटलेल्या डाळीत घाला.
हळद, मीठ आणि जीरं घालून हाताने मिसळून एकजीव करून घ्या.
गॅस वर इ़डली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवा. इडलीचे साचे घेऊन त्याला तेलाचा हात लावून घ्या. आता वरील डाळीच्या मिश्रणात सोडा टाकून हाताने मिसळून ह्या मिश्रणाचे लिंबापेक्षा किंचित लहान आकाराचे गोळे करून इडली साच्यात एका साच्यात ३ असे ठेवा. हे साचे कुकर मधील पाणी उकळले की त्यात ठेवा. एक सोडून एक असे कुकरमध्ये ठेवले की ते गोळ्यांना चिकटत नाहीत. वरून झाकण ठेऊन गोळे १५ ते १७ मिनिटे उकडून घ्या. असे करून सर्व गोळे उकडून घ्या आणि कुकरमधून काढून थंड करायला ठेवा.
कढी साहित्यः
दही २ डाव
चण्याचे पिठ २ मोठे चमचे (टेबलस्पून)
हळद १ लहान चमचा
आलं २ इंच
हिरव्या मिरच्या ३ नग
मीठ चवीनुसार
साजुक तुप २ मोठे चमचे
जीरं १ मोठा चमचा
कढीलिंब पाने २ डहाळ्या
हिंग १/४ लहान चमचा
कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती:
दही +चण्याचे पिठ + हळद + मीठ एकत्र करून फेटून घ्या. त्यात आलं आणि मिरच्या बारीक चिरून किंवा खलबत्यात ठेचून मिसळा. त्यात पाणी घालून कढी बनवा. आता ही कढी मध्यम आंचेवर उकळायला ठेवा. गॅसवर ठेवल्यावर उकळी येई पर्यंत सतत ढवळत राहा नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.
कढी शिजली की त्यात थंड केलेले गोळे घालून पुन्हा एक उकळी काढा.
आता गॅस बंद करा.
कढल्यात तुप तापवून त्यात जीरं, कढीलिंब आणि हिंग घालून फोडणी करा आणि ती कढीत ओतून लगेच झाकण ठेवा.
वाढायच्या वेळेस कोथिंबीरीने सजवा.
शुभेच्छा....!
वाचने
13942
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम् यम्
ओ काका
हेच विचारतो.. तिथे मी अर्ध्या
In reply to ओ काका by कुंदन
मन१ +१; एक्झॅक्टली!
व्यग्रता!!??
In reply to मन१ +१; एक्झॅक्टली! by बहुगुणी
दिल्लीत काही काळ असताना हा
कढी पकोडे.
In reply to दिल्लीत काही काळ असताना हा by मराठे
काका असे काही पहिले की ने
In reply to कढी पकोडे. by प्रभाकर पेठकर
नॉस्टॅल्जिक!!!
In reply to दिल्लीत काही काळ असताना हा by मराठे
बरोबर
In reply to नॉस्टॅल्जिक!!! by जाई.
मस्तच ..
काका रॉक्स!!
खल्लास!!!!
(No subject)
जबरी
लई भारी पाकृ, धन्यवाद. ते
यम्मी
आवडता पदार्थ.
यात मुळा, कोबी, गाजर इ.इ.
तोंडाला पाणी सुटले....
वा वा !! मस्तच !!
धन्यवाद.
खल्लास!
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
हा प्रकार कधी घरी करुन पाहिला
काका आम्हाला वाचवा!! मेलो!
कढी आवडत नाही
यम्म यम्म...
छान पाकृ
आवडती पाकृ. फोटू फारच भारी!
मस्त
पाककृती आवडली, नारायणगाव
+१ , कढी तीन ठिकाणी उत्तम
In reply to पाककृती आवडली, नारायणगाव by प्राध्यापक
व्वा!
ढासु.........!
मस्त
समयोचित पाकृ.
मस्तं.
In reply to समयोचित पाकृ. by सस्नेह
मस्त फोटो! या शनिवारी नक्की
क्या कहने !!
चला आज रात्रीचा मेन्यु
धन्यवाद.
उत्तम
नक्की चालेल.
In reply to उत्तम by सहज
करून पाहिलेत
खत्रा पाकृ!
गोळे थोडे इडलिंबा एहढे झाले इतकेच
धन्यवाद.
-