Skip to main content

तांडव..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 16/08/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार नित्य होती वार जैसे घुमे तलवार.. वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार 'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. - प्राजु
लेखनविषय:

वाचने 3284
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. कविता आवडली कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अतिशय सुरेख कविता... सगळ्या कल्पना खूप सुंदर आहेत... वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार -- ही कल्पना तर क्लासच! रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार या ओळी सर्वात जास्त आवडल्या... अभिनंदन प्राजू, जियो..! तात्या. अवांतर - 'कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार' ह्या ओळीत मेघ 'चित्कार' करतात ही कल्पना तेवढी पटली नाही...

प्राजुताई, रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार .... हे विशेष आवडले! :) आणि हो, "वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार" करितेचा २ वेळा करायचा वापर एकदाच करूनही योग्य परिणाम साधलाय. सुंदर! शुभेच्छा!! राघव

रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार हे लैच मस्त !!

In reply to by आनंदयात्री

रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार मस्तच.

छान आहे कविता... वेगळी.

जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
घुमला ओंकार... एकदम मंत्रमुग्ध केले. कवीता आवडली.

आहे कविता मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. सुंदर...

जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. हे फार आवडले.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सर्व कल्पनाचित्रे छानच.