माझेच मी....
माझेच मी.....
*
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो
*
असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो
*
काढले विकाया माझेच सर्वस्व मी
दुकानात या, भाव माझेच मी विचारतो
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो
*
जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो
*
-अशोक
कविता आवडली.
धन्यवाद!
छान
धन्यवाद !!
धन्यवाद !!
छान!
ही गझल नाही !!
माझेच मी विचारतो याने थोडं
धन्यवाद! ही गझल नाही !!
विचार अगदी मननीय आहे...पण
धन्यवाद!
छान.
कविता छानच उतरली आहे. फक्त