पावभाजी साठी साहित्यः
१. बटाटे,फुलगोबी,हिरवे वाटाणे,फरसबी,सिमला मिर्ची,
(एकुण इन्ग्रेडीएंट्स मध्ये बटाटे साधारण ४०%,फुलगोबी ३०%,हिरवे वटाणे १०%,फरसबी १०%, सिमला मिर्ची १०%)
२. १ मोठा कांदा,
३. १ मोठा टोमॅटो,
४. ४-५ लसुण पाकळ्या,१/२ इंच आले,
५. २ मोठे चमचे तेल,
६. १ मोठा चमचा रेडीमेड पावभाजी मसाला,
७. हळद (१/४ टीस्पुन),
८. तिखट,मीठ (चवीनुसार),
९. बटर,
१०. पाव,
११. कोथींबीर
पावभाजी ची कृती:
१. फुलगोबी,फरसबी,सिमला मिर्ची चिरुन घ्या. हिरवे वाटाणे सोलुन घ्या. बटाटे सोलुन चिरुन घ्या.
२. या सगळ्या चिरलेल्या भाज्या कुकर ला लाऊन शिजवुन घ्या (साधारण ४ शिट्ट्या - मध्यम आचेवर).
३. कांदा, टोमॅटो चिरुन घ्या. आले-लसुण पेस्ट करुन घ्या. माझ्याकडे मिक्सर नसल्याने मी आलं-लसुण किसुन घेतलंय.
४. एका कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकुन तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता.
५. त्यात आलं-लसुण पेस्ट टाकुन पेस्ट हलकी ब्राउन होईपर्यंत परता.
६. टोमॅटो टाकुन परता.
७. थोडे तेल सुटायला लागले की हळद्,तिखट्,मीठ,पावभाजी मसाला टाकुन परता.
८. कुकर मध्ये शिजवलेल्या भाज्या रवी वापरुन स्मॅश करुन घ्या.
९. कढईतल्या मसाल्यांना तेल सुटायला लागले की त्यात स्मॅश केलेल्या भाज्या टाकुन चांगले परतुन घ्या.
१०. भाजी पाचेक मिनीटे शिजली की कोथींबीर आणि १ टीस्पुन बटर टाकुन आणखी २ मिनीटे शिजवा आणि भाजी तयार!
११. आता एक पॅन थोडा गरम करुन घ्या. पावाला मधुन चाकुने कापुन,दोन्ही बाजुंनी बटर लाऊन पॅनमध्ये मस्त खरपुस भाजुन घ्या.
१२. गरम गरम पावभाजी थोडं बटर टाकुन,बारीक चिरलेला कांदा,लिंबु आणी पावांसोबत पेश करा :)
(कोथींबीर संपल्यामुळे ती 'सजावटी' मध्ये मिसींग आहे :-( )
आईस्क्रीम लस्सी साठी साहित्यः
१. घट्ट दही-१ मोठे चमचे,
२. साखर -४ टीस्पुन, मीठ - चिमुटभर,
३. वॅनिला आईस्क्रीम
कृती:
१. दही,साखर,मीठ ब्लेंडर मध्ये पाचेक मिनीटे घुसळुन घ्या.
२. सर्व्ह करताना एका ग्लास मध्ये लस्सी ओतुन वरुन वॅनिला आईस्क्रीम टाका.
शुभेछा :)
वाचने
9007
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख मस्त!!! खूप आवडली पाकृ
काय अत्याचार चाललेत राव पहाटे
पावभाजी पाहून जिव्हा चाळवली...रविवारची सोय झाली!
नो ऑफेन्स
एक सांगायचं राहिलं
अशी पावभाजी आयती करून मिळाली
छान...
पावभाजी पेक्षा लस्सी हिट आहे
और भी आने दो.
सुपर्ब
(No subject)
धन्यवाद :)
मस्त!
:)
दोन्ही पाककृती
दोन्ही (की तिनही) पाकृ छान
मिपावर स्वागत. लस्सी जास्त
हं........
भुक भडकवली..
लस्सी
छान !!!
ऑल
मस्त आहे पाककृती
मस्त पाकृ.