"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्याचे अन् साखरभाताचेच!"
धन्य ते स्वर भास्कर!!
तुम्ही बहुशृतता छान समजावून सांगितली आहे. लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा ! अगदी रंगुन गेलो लेख वाचतांना, उदाहरणे-प्रसंग छान
गाणे कसे शिकतात/शिकले जाते ते समजले.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
सुंदर...
भिमसेनजींची विनम्रता खरंच भावली. आणि माझी खात्री आहे की ही भावना त्यांच्यात खरंच आतपासून असणार. उगाच ४ लोकात बोलायला नव्हे.
अवांतर: निवृत्तिबुवा आमच्या गोरेगावचे, त्यांचा नातू माझ्या वर्गात. ते बहुतेक कलकत्त्याला असायचे. कधी कधी मुंबईला घरी यायचे. आम्हाला काय कळतंय कोण निवृत्तिबुवा आणि त्यांची योग्यता. वयाने तसे बरेच थकलेले होते ते. इतके साधे पणाने राहत असत. त्यांच्या घरी कधी गेलो तर त्यांचं अस्तित्व जाणवत सुद्धा नसे. कोपर्यातला एक तंबोरा मात्र जाणवून द्यायचा की इथे कोणालातरी गाण्याची आवड असावी. बास एवढेच. आमचा मित्र पण थोर. फक्त असं सांगायचा, 'हे माझे आजोबा, कलकत्त्याला असतात, गाणं शिकवतात' :)
नंतर पुढे गाण्यात थोडीफार आवड निर्माण झाल्यावर कळलं की आपण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ जाऊ शकलो असतो. :(
बिपिन.
काय तात्या?
ह्या खेपेला मिपावरील गढूळ वातावरण निवळायला एखादे व्यक्तिचित्र टाकणार नाही ह्याची खात्री होती.. ;-)
चला ह्याखेपेला अभिजात संगीताचे दळणच सही!...
ह.घ्या बरंका?
लेख आवडला हे सांनल!
-नंदा प्रधान
शीर्षकावरुन आधी वाटले 'जोहार मायबाप जोहार' ह्या नाट्यगीतावरच लेख आहे की काय?
(अवांतर - सौ. आशाताई खाडिलकरांनी म्हटलेलं नाट्यगीत (भैरवी?) मी फार वर्षांपूर्वी नगरला ऐकल्याचे स्मरते त्यावेळी आर्त स्वरांनी डोळ्यातून पाणी आलेले आठवते! मला जालावर हे गाणे मिळाले नाही कुणाला मिळाले तर जरुर इथे दुवा द्या! पुन्हा ऐकावेसे वाटते आहे.)
चतुरंग
भारतीय संगीत हे मुख्यतः ऐकुनच त्यात वेगळेवेगळे प्रयोग करत सम्पन्न झालेले आहे.
पास्चात्य संगीतासारखे त्यात लेखी नोट्स वगैरे प्रयो अगदी अलीकडचे. बहुतेक गवयी त्यांच्यावर बहुश्रुततेमुळे मोठे झाले.
कुमार आणि वसन्तराव ही अशीच दोन उदाहरणे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
तात्या ...
गाण्याबद्दल तुझा लेख असला की अधाशासारखा आधी वाचून काढतो :)
अजून एका सुरेल लेखाबद्दल धन्यवाद :)
------
ता. क. आज तर पापलेटचा फोटो चढवून तू नजरही तृप्त केलीस -- त्याचे धन्यवाद वेगळेच :)
तात्या, उत्तम लेख!
गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.
अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं. जेंव्हा आपल्या आईच्या हाताखाली मराठी स्वयंपाक शिकणारी मुलगी जेंव्हा नंतर सुगरण होऊन पंजाबी आणि बंगाली पाककृती (ज्या खुद्द आईलाही येत नव्हत्या!) यशस्वीपणे करू लागते तेंव्हा त्या आईलाही धन्यता वाटतेच!
"शिष्यादिच्छेत पराजयम्" यासारखं दुसरं सुख कोणतं!
गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.
अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं
असेच माझ्याही मनात आले,सुलेशबाबूंसारखेच.
लेख आवडला हे वेसांनल.
स्वाती
"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्याचे अन् साखरभाताचेच!"
क्या बात है !
असे कण वेचणे म्हणजे परप्रकाशित असण्याचे लक्षण नाही, हे आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे.
हेच आपण उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
सुंदर !
- (खरा) सर्किट
"एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!"
---आपल्या गुरुसमान असणार्या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे!
अगदी योग्य !!
भारतीय संगीतातील अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ..त्यावर नेमके भाष्य केले आहे. खुप छान लिहिले आहे..
(बहुश्रुतता ह शब्द बहुशृतता असा लिहायला पाहिजे असे मला वाटते)
कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!
अगदी अगदी!!!
अर्थात हा अनुभव मला रागदारीच्या मैफिलीत (कधी न गेल्याने) आलेला नसला, तरी गुलाम अलींची ही खास सवय आहे. ती ठाऊक आहे :) एकेक शेर असा असा घोळवतात....सुभान्नल्लाह!
....आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्याचे अन् साखरभाताचेच!"
ग्रेट! साक्षात स्वरभास्कराने असं म्हणावं? ज्याच्याकडे पाहुन ही दुनिया शिकते त्यांनी इतकं विनम्र असावं? क्या बात है!
तात्या हा ही लेख आवडलाच, हे वे.सा.न.ल. :)
खरं सांगायचं तर आता अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. (|: सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले. #o
प्रामाणिक मत, राग नसावा..
सोम्या.
प्रतिक्रिया
सुंदर विवेचन..
सहमत
असेच
उष्टं !
हेच म्हणते
सुंदर...भिम
तात्या
लेख आवडला!
लेख आवडला!
लेख आवडला
तात्या, सुंदर लेख!
भारतीय संगीत
छान
ये ब्बात है...
+१
उत्तम लेख
असेच..
लेख आवडला
+१
+१
असेच म्हणतो
सुरेख लेख
वा !!!!!!!
लेख आवडला !
खुप सुंदर लेख.
सुंदर लेख
हेच!
खूप छान
लेख आवडला.
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
राजहंस
क्लास !!!
फारच सुंदर
असा लेख वर्तमानपत्रात हवा.
आभार...
टेक अ ब्रेक