Skip to main content

दगडूचे अभिनंदन!

लेखक चंबू गबाळे यांनी शुक्रवार, 15/08/2008 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्‍यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते. नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते. अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे. आता काही लोक यावर आपल्या मताची पिंक टाकणारच.(हे ईश्वरा! त्या अज्ञानी पामरांना क्षमा कर, त्यांना कळत नाही ते काय करत आहेत. आमेन!) आमच्या दगडूवर आमचा जेवढा विश्वास आहे तेवढाच इथल्या लोकशाहीवर ही आहे. दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! Dagadu-My own Nandi दगडूची विजयी भावमुद्रा (दगडूभक्त) - चंद्रकांत बूधाजी गबाळे उर्फ चंबू गबाळे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7308
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणार्‍या भोलानाथ उर्फ दगडूचे आणि दगडू भक्ताचेही अभिनंदन! आपणा दोघांना आणि समस्त मिपा परिवाराला ६२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

वरच्या शुभेच्छांमध्ये '६२व्या' वरचे ते निळे अशोकचक्र बाकी 'मिपा परिवाराला' वर हवे होते ... पांढर्‍या रंगाच्या बरोब्बर मध्यभागी :) .. येथे हिरव्याला चिकटून आल्याने देश हिरव्याच्या अधिक जवळ, भगव्यापासून लांब वगैरे भलत्या शंकाकुशंका काढणार्‍यांच्या हाती कोलीत दिल्यागतच होईल :) (धर्मनिरपेक्ष)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

हा छिद्रान्वेषी पणा आवडला बर का.... आम्ही आपले सरळ सोट विचार करणारे - सर्किट

In reply to by सखाराम बाइंडर

इथले खरे आणि तोतये सर्किट, चोराचे आणि देवाचे सर्किट, शॉर्ट सर्किट सगळेच नीट ओळखू शकतो! (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

हे तर लक्षातच आले नाही बेला ! झेंडा समीक्षण समितीचाही सदस्य आहेस की काय ? - सर्किट (स्वगतः तसेही हल्लीचे सरकार हिरव्यांच्याच अधिक जवळचे आहे, असे भगवे म्हणतात.)

In reply to by सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला)

केशवटुकारांनी समीक्षक म्हणून पहिल्या वर्गात बसवल्यावर तीच भूमिका यत्र तत्र सर्वत्र निभावत असतो (समीक्षक)बेसनलाडू

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (आद्य) सर्किट

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (सद्य) सर्किट

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना! माझीही प्रार्थना ! - (खरा) सर्किट

सखाराम गटणे हाच पावसाची परी नावाने वावरत असतो सहज म्हणुन सांगितले - सर्किट

In reply to by सखाराम बाइंडर

आनंद यात्री हाच सर्किट व बाळिशा व मिसळप्रेमी नावाने वावरतो सहज म्हणुन सांगितले - खरा सर्किट

In reply to by सखाराम बाइंडर

ठ्ठो ! करून हसलो ! वा ! विषयांतर हवे, तर हे असले ! - (आद्य) सर्किट

काल भेंडीच्या भाजीत पाणी जास्त झाले म्हणुन भरलेले वांगे खाल्ले - (खरा) सर्किट

In reply to by खरा सर्किट

मला वांगे खुप आवडतात पण तात्या म्हणतात वांगे खावुन खुप वारा सरतो म्हणुन मी खात नाहि भेंडी मी नुसती खातो -सर्किट

सर्किट हाच सर्किट ली म्हणून वावरतो. =)) सहज म्हणून सांगितले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

In reply to by चंबू गबाळे

सर्किट सरकीट सर्कीट सर्किट ली यांच्यातिल फरक कळला नाहि तर स्वतःच्या बुद्धिची कींव करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे, शांती करणे जरुरी आहे (सर्व शांति करणारा) खरा सर्किट

In reply to by चंबू गबाळे

कोण रे तु? आम्हा सर्किट लोकांच्या गप्पांमध्ये मधे मधे लुडबुड करणारा? "चंबु गबाळे" आवरायचे का रे तुला इथुन? (सभासद)समस्त सर्किट भाइ लोग.

अरे केवढे हे सर्किट, वाचून सरकटले. सर्किट सहस्त्रनामाचा जप करायला हवा सर्वांनी.

मला तर इथेच जास्त सुरस आणि चमत्कारिक वाटायला लागले आहे.... ~X( सर(क)लेला बिपिन.

वा वा वा समस्येने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जे विविध लोक पुढे येत आहेत ते पाहुन बरे वाटले असेच गावोगाव भटकत राहुन लोकरजना बरोबर लोकशिक्षण करण्याचे जे व्रत आपण अंगिकारले आहे हे पाहुन बरे वाटले आपणास शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

आभारी आहोत नाना! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

दगडुचे हार्दिक अभिनंदन! ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!! चंबु शेठ, फोटु जब-या आलाय. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!! आता हे काम तर आपला नानाच करु शकतो बॉ! त्यालाच सांगा तुम्ही. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D