Skip to main content

मसाला आप्पे

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 22/08/2012 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
खास मिपाकर मोदकाची कॉपीराईट असलेली पाककृती इथे देत आहे ती पण त्याच्या परवानगीनेच हो ;) साहित्यः १ वाटी उडदाची डाळ ३ वाट्या तांदूळ + १ छोटा चमचा मेथीदाणे वरील साहित्य वेग-वेगळे रात्रभर भिजवणे. सकाळी मिक्सरला वाटून एकत्र करावे. उबेच्या जागी ५-६ तास पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी ठेवावे. मसाला साहित्यः (मटार उसळ माझ्या पद्धतीची देतेय, मोदकाच्या आदेशावरून , तो आदेशच देतो विनंती करत नाही काय ;) , तसेच जर मटार उसळ उरली असेल तरीही हे आप्पे करता येतील ) दीड वाट्या मटार १ कांदा उभा चिरलेला १ टोमॅटो बारीक चिरलेला १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण १ टेस्पून बारीक चिरलेले आले २-३ टेस्पून सुके खोबरे कढीपत्ता १ टीस्पून मोहरी १ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हींग दीड टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जीरेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर दीड टीस्पून गोडा मसाला मीठ चवीनुसार तेल . पाकृ: एका पॅनमध्ये तेल गरम करावे व त्यात बारीक चिरलेले आले +लसूण चांगले परतून घ्यावे. त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो ही चांगला परतून घ्यावा. त्यात सुके खोबरे घालून ते ब्राऊन होईपर्यंत परतावे. मिश्रण गार झाले की थोडे पाणी घालून मिक्सरवर बारीक पेस्ट वाटून घ्यावी. . एका कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे, कढीपत्ता व हींगाची फोडणी करून घ्यावी. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊसर होईपर्यंत परतावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जीरेपूड, बडीशेप पावडर व गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मटारचे दाणे घालून मिक्स करावे. लागेल तसे पाणी घालून, झाकून उसळ शिजु द्यावी. . आप्पे करण्याची पाकृ: तयार पीठात थोडे मीठ घालावे. तयार मटार उसळ आप्पेपात्रात थोडे तेल सोडावे व चमच्याने पीठ घालावे. त्यावर मटार उसळ घालावी व पुन्हा चमच्याने पीठ घालून, झाकून शिजवावे. (घाई-गडबडीत पुन्हा पीठ घालण्याचा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमा असावी) आवडत असल्या मटार उसळीवर कीसलेले चीज घालावे . अशा पध्दतीने सगळे आप्पे तयार करून घ्यावे. . गरमा-गरम मसाला आप्पे एक वेगळा प्रकार म्हणून नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. सर्व्ह करते वेळी मी मधून कापून दोन भाग केले आहेत आतील उसळीचा थर दिसावा म्हणून. मी हे आप्पे नारळाच्य्या चटणी बरोबर सर्व्ह केले. . ह्या पाकृसाठी मोदकाचे खास आभार :)

वाचने 14744
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

मस्तच................ दोनच फोटो दिसत आहेत, तयार आप्पे कुठे आहेत?

वेगळी पाकृ, एकदम भारी! इडली अशी करतात हे ऐकून होते, पण आप्पेही? शेवटचा फोटू हा नेहमीप्रमाणेच झकास! ही पाकृ करण्यासाठी मोदकाचा आदेश (काहीजण प्रेरणाही म्हणतात.) होता हे भलतेच! ;) मोदकाने आप्प्यांना 'वोट' करण्यासारखे झाले. असो.

अरे वा, मोदक वाद्/अनुवाद सोडुन बरंच काही करु शकतो, म्हणजे आदेश / प्रेरणा वगैरे हे प्रथमच कळाले. तसा आहेच तो मल्टिटॅलेंटेड, त्याच्या आवडत्या एक्सेलसारखा, दिसायला नुसत्या उभ्या आडव्या रेषा पण एकदा मॅक्रो दिसायला लागले मी भल्या भल्यांना गोत्यात घेतं ते. अर्थात तो असे आप्पे करतो यावर विश्वास ठेवणं जरा जड जातंय, निदान त्यानं या रविवारी घरी बोलावुन खाउ घालेपर्यंत तरी. धन्यवाद दोघांनाही.

In reply to by ५० फक्त

@निदान त्यानं या रविवारी घरी बोलावुन खाउ घालेपर्यंत तरी >>> +१+१+१+१+१+१+१+१ = मटार आप्पे ;)

पाकधुरीणींनी जामच छळ मांडला आहे. या दोघींना तात्काळ प्रभावाने मिपापाककृती विभागात बंदी घालावी. हो नं प्रत्येक ठिकाणी काय प्रतिक्रिया द्यायची ????????

हलके-फुलके आप्पे... :) बाकी आप्प्याला मोदक्याने कॉपीराईट करुन ठेवला आहे हे माहित नव्हते ! ;) (आप्पे प्रेमी):)

In reply to by सूड

>>>मोदकाला आप्पे येतात हे वाचून अंमळ मौज वाटली. बाजार उठवतो का बे..? :-p ये एकदा घरी... >>>पाकृच्या सादरीकरणाला तोड नाही. या कौशल्याला मी खूप आधी शरण गेलो आहे. __/\__

In reply to by सूड

अभ्यास वाढवा. ती कौसल्या.. कौशल्या नव्हे. एस्केलेशन मोड ऑन> आमच्या आदरणीय शरणस्थाना बद्दल अवांतर प्रश्न विचारल्याने तुम्हाला समज का दिली जावू नये..? ;-) एस्केलेशन मोड ऑफ> :-D

In reply to by बॅटमॅन

बास की लेको.. किती अवांतर कराल..? बाकी बॅटमॅना.. तुझ्या हातात अवांतराची कला आहे! ....अमोल खरे. ________________________________________________ स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला । स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥ ओ ऽ ऽ ऽ देवरूखकर.. (सुधांशूच! लगेच माऊस फिरवायची गरज नाहीये!) :-D काय हे..?

In reply to by मोदक

भारी बे मोदका एक नंबर!! ट्रू-आयडी ब्यान असतां कंडुअतिशमनार्थ कंडी पिकवावी | तेही नसतां डु-आयडीतुनी मत पिंका टाकुनि खव भरोन टाकावी || ;)

बाकी नेहमीप्रमाणेच. XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX फक्त एक बारीकशी गोष्ट राहिली आणि तिची प्रांजळ कबुली दिली. खरे तर त्याची जरूरी नव्हती. फक्त "परफेक्षनीस्ट"सुद्धा थोडे चुकू शकतो हे कळले. :)

पाकृबद्दलच्या प्रतिक्रीयेसाठी आणि .................................

सानिकातैचा विजय असो !!! सानिकातैचे घर असावे शेजारी...

अतिशय हुच्च पाकृ आहे. फोटू बघून खल्लास झालेय. आता हे कौतुक सानिका आणि मोदकाने आपसात वाटून घ्यावे.

सुंदर!!! तुमच्याकडून पाककृतींसोबत फोटोग्राफीच्याही टीपा घ्यायला हव्यात :-)

मला फोटो नाही दिसले, पण वर्णनावरुन नक्की काय प्रकार असावा ते कळल. करुन, खाउन पोच देण्यात येइल.

सानिकातै म्हंजे माष्टर हैती पाकृ आणि सादरीकरणाच्या. बाकी मादक आप्पे पाहून खपल्या गेलो आहे. शिवाय फक्त मटार उसळ असल्याने अर्धीच चैन झाली. क्षीरतरण कदलीखंड असते तर पूर्ण चैन झाली असती ;)

सँडविच अप्पे हे नाव पर्फेक्ट वाटत नाही ? अप्पे नेहमी करते. पण चटणी करायचा आळस ! हा पर्याय मस्त वाटला. भाजी पण त्यातच. चवही छान लागेल अन चटणीची यातायात नको.