खास मिपाकर मोदकाची कॉपीराईट असलेली पाककृती इथे देत आहे ती पण त्याच्या परवानगीनेच हो ;)
साहित्यः
१ वाटी उडदाची डाळ
३ वाट्या तांदूळ + १ छोटा चमचा मेथीदाणे
वरील साहित्य वेग-वेगळे रात्रभर भिजवणे. सकाळी मिक्सरला वाटून एकत्र करावे.
उबेच्या जागी ५-६ तास पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी ठेवावे.
मसाला साहित्यः (मटार उसळ माझ्या पद्धतीची देतेय, मोदकाच्या आदेशावरून , तो आदेशच देतो विनंती करत नाही काय ;) , तसेच जर मटार उसळ उरली असेल तरीही हे आप्पे करता येतील )
दीड वाट्या मटार
१ कांदा उभा चिरलेला
१ टोमॅटो बारीक चिरलेला
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
२-३ टेस्पून सुके खोबरे
कढीपत्ता
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हींग
दीड टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जीरेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
दीड टीस्पून गोडा मसाला
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये तेल गरम करावे व त्यात बारीक चिरलेले आले +लसूण चांगले परतून घ्यावे.
त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो ही चांगला परतून घ्यावा.
त्यात सुके खोबरे घालून ते ब्राऊन होईपर्यंत परतावे.
मिश्रण गार झाले की थोडे पाणी घालून मिक्सरवर बारीक पेस्ट वाटून घ्यावी.
एका कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे, कढीपत्ता व हींगाची फोडणी करून घ्यावी.
त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊसर होईपर्यंत परतावा.
त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जीरेपूड, बडीशेप पावडर व गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
मटारचे दाणे घालून मिक्स करावे.
लागेल तसे पाणी घालून, झाकून उसळ शिजु द्यावी.
आप्पे करण्याची पाकृ:
तयार पीठात थोडे मीठ घालावे.
तयार मटार उसळ
आप्पेपात्रात थोडे तेल सोडावे व चमच्याने पीठ घालावे.
त्यावर मटार उसळ घालावी व पुन्हा चमच्याने पीठ घालून, झाकून शिजवावे. (घाई-गडबडीत पुन्हा पीठ घालण्याचा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमा असावी)
आवडत असल्या मटार उसळीवर कीसलेले चीज घालावे .
अशा पध्दतीने सगळे आप्पे तयार करून घ्यावे.
गरमा-गरम मसाला आप्पे एक वेगळा प्रकार म्हणून नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. सर्व्ह करते वेळी मी मधून कापून दोन भाग केले आहेत आतील उसळीचा थर दिसावा म्हणून.
मी हे आप्पे नारळाच्य्या चटणी बरोबर सर्व्ह केले.
ह्या पाकृसाठी मोदकाचे खास आभार :)

वाचने
14744
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ..
+१
In reply to मस्त .. by कौशी
मला पण. घरी सांगितले पाहिजे
In reply to मस्त .. by कौशी
मस्त ..
खल्लास!!!
मस्तच................ दोनच
वेगळी पाकृ, एकदम भारी! इडली
मोदक/आप्पे अवडले...
मस्त!
आप्पे लई भारी !!!
In reply to मस्त! by पैसा
तोंपासू.
अरे वा, मोदक वाद्/अनुवाद
@निदान त्यानं या रविवारी घरी
In reply to अरे वा, मोदक वाद्/अनुवाद by ५० फक्त
लई येळा बाडिस.
In reply to अरे वा, मोदक वाद्/अनुवाद by ५० फक्त
मोदका कडक रे!!
या दोन मिपा
हलके-फुलके आप्पे... बाकी
तोंपासू
मोदकाला आप्पे येतात हे वाचून
:-)
In reply to मोदकाला आप्पे येतात हे वाचून by सूड
तू कौशल्याला शरण जा नाहीतर
In reply to :-) by मोदक
अभ्यास वाढवा...
In reply to तू कौशल्याला शरण जा नाहीतर by सूड
तुमच्या एस्केलेशन मोडला योग्य
In reply to अभ्यास वाढवा... by मोदक
@(मेहुणे)>>> मेलो...मेलो...
In reply to तुमच्या एस्केलेशन मोडला योग्य by सूड
काही कळले नाही रे. कुणाचे
In reply to @(मेहुणे)>>> मेलो...मेलो... by अत्रुप्त आत्मा
काय हे विमेकाका. उगिच
In reply to काही कळले नाही रे. कुणाचे by विश्वनाथ मेहेंदळे
बास की लेको.. किती अवांतर कराल..?
In reply to काय हे विमेकाका. उगिच by बॅटमॅन
भारी बे मोदका एक
In reply to बास की लेको.. किती अवांतर कराल..? by मोदक
मस्त झालेले दिसताहेत आप्पे
ऑं.
In reply to मस्त झालेले दिसताहेत आप्पे by पियुशा
शाकाहारी लोकांना आनंद झाला आहे.
कॉलीग परा
हाय क्लास.
जय हो !
मादक आप्पे आवडले पाककृती,
ऑ!!
In reply to मादक आप्पे आवडले पाककृती, by सुहास झेले
भन्नाट सादरीकरण.
बेक्कार आवडले आहेत हे
हुच्च!!
सुंदर!!! तुमच्याकडून
असेच म्हणते....
In reply to सुंदर!!! तुमच्याकडून by हसरी
मला फोटो नाही दिसले, पण
मला फोटो नाही दिसले, सुदैवी
In reply to मला फोटो नाही दिसले, पण by स्पंदना
सानिकातै म्हंजे माष्टर हैती
मस्तच idea आहे गं.... करुन
१००+
सँडविच अप्पे !
अति ब्येक्कार...!
करुन पाहते. मस्त आहे पाकृ.