स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)
स्त्रियांना नक्की काय हवे असते?
हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. ****
तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.****
****
त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात...
जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते. आणि जर वर्षानंतर त्याच्याकडे उत्तर नसेल तर त्याला फासावर चढवण्यात येणार होते.****
****
प्रश्न होता : स्त्रियांना नक्की काय हवे असते?****
****
अशा प्रश्नाने खरे तर अत्यंत बुद्धिमान माणूसही गोंधळून गेला असता. तरुण आर्थरसाठी तर याचे उत्तर शोधणे अशक्यप्राय होते; पण मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा उत्तर शोधणे जास्त सोयीस्कर होते, म्हणून त्याने राजाचे आव्हान स्वीकारले. तो त्याच्या राज्यात परतला आणि त्याने सर्वांना हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. राजकुमारी, राजगुरू, बुद्धिवंत आणि अगदी दरबारी विदूषकालादेखील त्याने हा प्रश्न विचारला. मात्र, एकाकडेही त्याचे समाधान होईल असे उत्तर नव्हते.****
****
अनेक जणांनी त्याला म्हाता-या चेटकिणीचा सल्ला घेण्याचे सुचवले. आता फक्त तीच याचे उत्तर देऊ शकेल, असे ब-याच जणांचे मत होते. मात्र, चेटकिणीने त्यासाठी खूप मोठी किंमत मागितली असती.****
****
असे होता होता शेवटी वर्षाचा अखेरचा दिवस उजाडला. आता आर्थरकडे चेटकिणीकडे जाऊन तिलाच या प्रश्नाचे उत्तर विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कबूल केले, मात्र, त्या आधी राजाला तिने मागितलेली किंमत चुकवण्याचे कबूल करावे लागणार होते.****
****
त्या म्हाता-या चेटकिणीला सर लॅन्सलोटशी लग्न करायचे होते! सर लॅन्सलोट म्हणजे राजाच्या खास माणसांमधील सर्वात प्रामाणिक व्यक्ती आणि मुख्य म्हणजे राजा आर्थरचा सर्वात जिवलग मित्र! आर्थर नुसत्या कल्पनेनेच शहारला. चेटकीण पाठीला कुबड आलेली आणि सुरकुतलेल्या चेह-याची म्हातारी होती. तिच्या तोंडात एकच दात होता. तिच्या अंगाला असह्य वास येई. तिला चित्रविचित्र आवाज काढण्याचीदेखील सवय होती. आर्थर राजाने त्याच्या उभ्या आयुष्यात असा नमुना पाहिला नव्हता.
त्याने आपल्या जिवलग मित्राच्या गळ्यात अशा चेटकिणीला बांधण्यास नकार दिला आणि जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी दर्शवली.****
****
लॅन्सलोटला जेव्हा ही अट समजली, तेव्हा त्याने तडक राजा आर्थरला गाठले आणि त्याला समजावले की, आर्थरच्या आयुष्यापुढे हा त्याग काहीच नाही व तो चेटकिणीशी लग्न करायला तयार आहे. अखेरीस लग्नाची जाहीरपणे घोषणा केली गेली आणि आर्थरने चेटकिणीला प्रश्न विचारला :****
****
‘तर, स्त्रियांना नेमके काय हवे असते?’****
****
चेटकीण म्हणाली, ‘*स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वत: घ्यायला हवे
असतात.’*****
****
राज्यातल्या प्रत्येकाला जाणवले की, चेटकिणीने खरोखरच खूप समर्पक असे उत्तर दिले आहे आणि आता आपल्या राजाचा जीव वाचणार. तसेच झाले. शेजारच्या राजाने आर्थर राजाला मुक्त केले आणि लॅन्सलोट व चेटकिणीचे लग्न धूमधडाक्यात झाले.****
****
मिलनाची घटिका जसजशी समीप येऊ लागली, तसा लॅन्सलोटने आता पुढे काय वाढून ठेवले आहे, असा विचार करत शयनकक्षात प्रवेश केला; पण शयनकक्षात पाऊल ठेवताच तो विस्मयचकित झाला. पलंगावर सुरकुतलेल्या, खंगलेल्या चेटकिणीच्या जागी एक सुंदर तरुण स्त्री बसली होती.****
****
आश्चर्यचकित झालेल्या लॅन्सलोटने तिला घडला प्रकार विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ती एका विद्रूप चेटकिणीच्या रूपात असतानादेखील लॅन्सलोट तिच्याशी आदराने आणि सौजन्याने वागला म्हणून यापुढे ती केवळ अर्धा दिवस विद्रूप चेटकिणीच्या रूपात वावरेल आणि उरलेला अर्धा दिवस सुंदर पत्नीच्या रूपात.****
****
‘तुम्हाला कसे आवडेल?’ तिने विचारले, ‘दिवसा सुंदर असणे की रात्री?’****
****
लॅन्सलोट क्षणभर अडखळला.****
****
दिवसा त्याला एक सुंदर पत्नी मिळाली असती, जिच्यासोबत तो समारंभांमध्ये मिरवू शकला असता; पण घरी परतल्यावर मात्र एका म्हाता-या चेटकिणीसोबत त्याला रात्र काढावी लागली असती.****
****
किंवा****
****
जर ती दिवसभर म्हातारी चेटकीण बनून वावरली असती तर त्याला एका सुंदर स्त्रीसोबत रात्री घालवता येणार होत्या.****
****
(जर तुम्ही पुरुष असाल तर) तुम्ही काय निवडले असते? ****
****
(जर तुम्ही स्त्री असाल तर) तुमच्या पतीने काय निवडले असते? ****
****
****
****
****
****
****
****
लॅन्सलोटने काय निवडले ते खाली दिलेलेच आहे; परंतु प्रथम तुमची निवड ठरवा आणि मग खाली पाहा.****
****
सर लॅन्सलोट हुशार होता. त्याला चेटकिणीने राजा आर्थरला दिलेले उत्तर आठवले.
त्याने उत्तर दिले की, त्या स्त्रीने स्वत:च ठरवावे की तिला कसे राहायचे आहे.**
**
****
हे ऐकल्यावर ती म्हणाली की ती सर्वकाळ सुंदर राहील. कारण लॅन्सलोटने तिला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते.****
****
तर, कथेचे सार काय?****
****
कथेचे सार असे आहे की,****
****
*प्रत्येक स्त्री कितीही सुंदर असली तरीही तिच्यामध्ये एक चेटकीण असते!****
****
*जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.****
****
जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तिच्या पद्धतीने; नाही तर कोणत्याच पद्धतीने नाही! :)****
****
(आधारित स्वैर अनुवाद)
याद्या
23800
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
कथा छान
नक्की *** कोणत्या
+१
In reply to नक्की *** कोणत्या by अन्या दातार
* +१
In reply to नक्की *** कोणत्या by अन्या दातार
आठवत नाही नाव
In reply to * +१ by मी_आहे_ना
कॅन्टरबरी टेल्स
In reply to नक्की *** कोणत्या by अन्या दातार
प्रत्येक स्त्री कितीही सुंदर
+१
In reply to प्रत्येक स्त्री कितीही सुंदर by मदनबाण
त्यांना सगळच हव हव असतं ! पण
In reply to प्रत्येक स्त्री कितीही सुंदर by मदनबाण
-----------------------------
In reply to प्रत्येक स्त्री कितीही सुंदर by मदनबाण
गुर्जी, तुम्हाला कसा काय
In reply to ----------------------------- by अत्रुप्त आत्मा
@तुम्हाला कसा काय अनुभव
In reply to गुर्जी, तुम्हाला कसा काय by सोत्रि
>>>त्यांना सगळच हव हव असतं !
In reply to प्रत्येक स्त्री कितीही सुंदर by मदनबाण
नाही म्हणण्यामागील एक रहस्य....
In reply to >>>त्यांना सगळच हव हव असतं ! by नाना चेंगट
धन्यवाद. होतकरूंना अशा टिपा
In reply to नाही म्हणण्यामागील एक रहस्य.... by चित्रगुप्त
हं, टिपा गोळा करताय... दुसरी
In reply to धन्यवाद. होतकरूंना अशा टिपा by बॅटमॅन
ही ही ही अजून पाणपत लै लांब
In reply to हं, टिपा गोळा करताय... दुसरी by इनिगोय
नाव नोंदवलेस का रे?
In reply to ही ही ही अजून पाणपत लै लांब by बॅटमॅन
वटवाघुळा
In reply to नाव नोंदवलेस का रे? by मोदक
गप रे मादका आपलं मोदका! अमोल
In reply to नाव नोंदवलेस का रे? by मोदक
यावरून
In reply to >>>त्यांना सगळच हव हव असतं ! by नाना चेंगट
मुफ्त माल का ख़याल तो बहुत
In reply to यावरून by शुचि
इस शेर पे ....
In reply to यावरून by शुचि
अननुभवी पण हुश्शार मदनबाणाशी
अनुभवी इजुभौंशी सहमत
कवटीशी हाडं क्रॉस करून सहमत.
In reply to अनुभवी इजुभौंशी सहमत by कवटी
सुलभ पर्याशी बाडिस.
In reply to कवटीशी हाडं क्रॉस करून सहमत. by परिकथेतील राजकुमार
स्कॉचच्या शेवटच्या
In reply to कवटीशी हाडं क्रॉस करून सहमत. by परिकथेतील राजकुमार
एखादं पुस्तक वाचुन काय ***
मस्त कथा. आवडली
तुम्ही सुंदर स्त्रीला
प्लिज
In reply to तुम्ही सुंदर स्त्रीला by विजुभाऊ
जरा डिटेलवारी लिहा की तुमच्या
In reply to प्लिज by कवटी
तारे मिपा पर!
खी खी
In reply to तारे मिपा पर! by स्मिता.
हेहेहे... (नानांनी सांगितलंय
In reply to खी खी by शुचि
हीहीही .....( त्याच नानानी
In reply to हेहेहे... (नानांनी सांगितलंय by इनिगोय
असेच म्हणते....
In reply to खी खी by शुचि
जर तुम्ही स्त्रीला तिच्या
घ्या भो घ्या
In reply to जर तुम्ही स्त्रीला तिच्या by पियुशा
*जर तुम्ही स्त्रीला तिच्या
गोष्ट म्हणून खूपच छान रंगविली
श्या! एव्हढे खडे असलेला भात !
वास्तव...
गोष्ट
गोष्ट आवडली.*****
हय स्साला
स्वैर अनुवाद आवडला... कथेचे
गोष्ट आवडली.
या प्रश्नाच्या निमित्ताने
In reply to गोष्ट आवडली. by पैसा
चालेल.
In reply to या प्रश्नाच्या निमित्ताने by अन्या दातार
अळीमिळी गुपचिळी.
In reply to चालेल. by पैसा
हाताची घडी तोंडावर बोट.
कोण बोलेल त्याला मिळेल चोप.
In reply to अळीमिळी गुपचिळी. by प्रभाकर पेठकर
मस्तच.
कथा असली तरी लॉजिकनं संपूर्ण मार खाल्लाये
>>> ही एकमेकांची फसवणूक
In reply to कथा असली तरी लॉजिकनं संपूर्ण मार खाल्लाये by संजय क्षीरसागर
संजयजी,
In reply to कथा असली तरी लॉजिकनं संपूर्ण मार खाल्लाये by संजय क्षीरसागर
खरी परिस्थिती अशीये
In reply to कथा असली तरी लॉजिकनं संपूर्ण मार खाल्लाये by संजय क्षीरसागर
गीतेवर अभ्यास न करता निरुपण
In reply to खरी परिस्थिती अशीये by बिपिन कार्यकर्ते
@ बिका > स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण?
In reply to खरी परिस्थिती अशीये by बिपिन कार्यकर्ते
मूळ धागा जो आहे ती एक कथा
In reply to @ बिका > स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? by संजय क्षीरसागर
कथा एका तात्पर्याप्रत येते आणि रोजच्या जगण्यातला मुद्दा मांडते
In reply to मूळ धागा जो आहे ती एक कथा by बिपिन कार्यकर्ते
चुन चुन के मारुंगा चुन चुन
In reply to मूळ धागा जो आहे ती एक कथा by बिपिन कार्यकर्ते
चुना लावून मारणारे का
In reply to चुन चुन के मारुंगा चुन चुन by कवितानागेश
स्त्रीयांना "त्यांना काय हवं
सर्वोत्तम प्रतिसाद
In reply to स्त्रीयांना "त्यांना काय हवं by मराठे
मस्त
In reply to स्त्रीयांना "त्यांना काय हवं by मराठे
एकोळी धागा म्हणून सहज खपला
In reply to स्त्रीयांना "त्यांना काय हवं by मराठे
बोलले!
In reply to एकोळी धागा म्हणून सहज खपला by अन्या दातार
अनुभव कशास हवा ? ते गाणं आहे
In reply to बोलले! by पैसा
अगदी बरोब्बर!
In reply to स्त्रीयांना "त्यांना काय हवं by मराठे
+१
In reply to अगदी बरोब्बर! by स्मिता.
अगदी अगदी
In reply to स्त्रीयांना "त्यांना काय हवं by मराठे
राइट्ट्ट्ट
उलळ पाण्याला़ ़खळखळाट फार...
स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्याला आपोपाप कळावं" हे हवं
स्त्रीयांना "त्यांना काय हवं
अस बघा ...
स्त्री असो वा पुरुष, निर्णय
अगं बाई...अरेच्चा ........
जे..
?
डल्ला