राष्ट्रपतींचा दयाळूपणा -
लेखनप्रकार
.
नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही.
जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले.
आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही.
खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय-
ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ?
असे असतांना,
केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात-
हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते !
मा. राष्ट्रपतींची समोर आलेल्या फायलींचा फडशा पाडण्यात काही चूक होते..
का....
सर्व पुरावे समोर आल्यावर, फाशीचे फर्मान काढण्यात न्यायमूर्ती चुकतात ?
माझ्यासारख्या सामान्य माणसाचे, दोघांच्या निर्णयाबाबत कुतूहल वाढते..
तुमचे ?
.
वाचने
3599
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
जरा विस्ताराने लिहायचं ! कोणाच्या शिक्षा रद्द केल्यात ?
शंकर दयाळ शर्मांबद्दल बोलताय का ?
धागाकर्त्याचा जो टोन वाटतो आहे तक्रारीचा , तसाचा माझाच वैतागाचाही आहे.
लोकसत्तेच्या पुरवणीत तो यथार्थ मांडला आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाच्या अधिकाराचा वापर करत काही बलात्काऱ्यांना जीवदान दिल्याबद्दल त्यांचा निषेधही साऱ्या जनतेनं एकत्र येऊन करायला हवा. प्रतिभा पाटील यांनी वकिली केली नाही तरी त्या कायद्याच्या पदवीधर आहेत, बलात्कार आणि त्यानंतर केला जाणारा त्या मुलीचा खून या गुन्ह्य़ांचं गांभीर्य त्यांना कळत नसेल असं कसं म्हणावं? आणि तरीही आपल्या राष्ट्रपतीपदाच्या अधिकारात त्यांनी एकूण पस्तीस गुन्हेगारांना त्यांची मृत्युदंडाची शिक्षा माफ करून त्यांना जीवदान दिलेलं आहे.
२ जून २०१२ला प्रतिभा पाटील यांनी ज्या पस्तीस गुन्हेगारांना दयेच्या नावाखाली जीवदान दिलं त्यात निम्म्याहून अधिक बलात्कारी आहेत. कर्नाटकातल्या बंडू तिडकेनं सोळा वर्षांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार केलं, उत्तर प्रदेशातल्या बंटूनं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेतला, मध्य प्रदेशातल्या तुरुंगाधिकाऱ्याच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून मोलाईराम आणि संतोष यादव या दोघांनी तिला ठार केलं.
पाच आणि दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर त्यांना ठार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द करणाऱ्या प्रतिभा पाटील एक स्त्री आहेत. एक माणूस म्हणून सोडाच, निदान एक स्त्री म्हणून तरी या मुलींवर ओढवलेल्या भयंकर दुखाची कळ त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती. गुन्हेगारांना कायद्यानं शिक्षा व्हावी म्हणून त्या मुलींच्या आईवडिलांनी जिवाचा किती आटापिटा केला असेल, आपण आपल्या मुलींना वाचवू शकलो नाही पण पसा, वेळ आणि आपली मुलगी गमावून सात-सात र्वष ही केस लढवत गुन्हेगारांना अखेर मृत्युदंडाची शिक्षा देववली, आपल्या मुलींना मरणोत्तर न्याय मिळाला म्हणून त्यांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल, तर तेवढय़ात प्रतिभा पाटील यांनी त्यांच्यावर दया दाखवून त्यांना जणू परत तसेच गुन्हे करायला मोकळं सोडून त्या मुलींच्या आईवडिलांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
.
एकूण पस्तीस लोकांना माफी मिळत असेल आणि उरलेल्या केसेस प्रलंबित असतील, तर भारतात तशीही फाशी कुणाला होत नाहीच हे स्पष्टच आहे.
भारतात मलावाटतं शेवटची फाशी होउन आठ दहा वर्षे होउन गेलीत.धनंजय नावाच्या नराधमाला फाशी दिल्याचं ते प्रकरण होतं. त्यानं हेतल नावाच्या तेरा-चौदा वर्षाच्या मुलीचा बलात्कार करुन खून केल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर अपिलात वगैरे आणि शेवटी दयायाचना प्रलंबित अशा स्टेटसमध्ये त्याने चौदा वर्षे जेलमध्ये काढले. फायनली अब्दुअल कलामांनी त्याला फाशी व्हावी ह्यावर स्वाक्षरी केली. आणि लोकांचा एकच गजहब सुरु झाला. "बिचार्याने आधीच चौदा वर्षे म्हणजे जन्मठेपेइतकी वर्षे जेलमधे काढलेली आहेत. आता वर पुन्हा फाशी म्हणजे कोण अन्याय वगैरे आहे" असली बोंब ठोकली. त्या महात्माच्या आधी पप्पानं आणि मग आख्ख्या फ्यामिलीनं "खबरदार ह्याला फाशी द्याल तर. आम्ही सगळे विष घेउन जीव देउ. जेलसमोर उपोषण करु." वगैरे बाता सुरु केल्या. सुदैवानं त्याला फाशी झाली. माझ्यासारख्या निराशावादी माणसाला light at the end of tunnel आहे असं वाटून आशेचा किरण दिसला.
.
त्याच वेळी खरी दया कुणाला दाखवायची ह्याचीही ह्या दळभद्री , भडव्या सिटिमला अक्कल नाही.
भारतात ७०-८० टक्क्याच्यावर कैदी कच्चे कैदी आहेत! मारहाण, शिवीगाळ ,दारिद्र्यापोटी केलेली भुरटी चोरी अशा तुलनेने लहान गुन्ह्यात ते आहेत. बहुतांशांचा जामीन दोनेक दिवसात सहज होउ शकतो. आणि ते पाच- पाच , सात्-सात वर्षे जेलम्ध्येच आहेत, असा खुद्द एका मानवतावादी निवृत्त पोलिस अधिक्षक की तुरुंगाधिकारी ह्यांचा रिपोर्ट वाचला होता. कित्येकांना मॅजिस्टेटसमोर उभेही केलेले नाही. क्षमतेच्या तिप्पट चौपट(३०० - ४००% अधिक) कैदी एका ठिकाणी कोंबले जातात. अर्थात त्यांचे हे हाल होतात, ह्याचे वाईट वाटून घेण्याचे कारण नाहीच. बाय डिफॉल्ट ज्यांनी जिवंतपणी नरक भोगणं अपेक्षित आहे, अशा दरिद्री परिस्थितीतील हे असतात. ह्यांना कुनी वालीही नाही. हे धड सुशिक्षितही नाहीत्.त्यामुळे कायदा काय आहे , त्यान्सुआर अधिकार काय हेही त्यांना ठाउक नाही.
व्यवस्थेच्या वाढीच्या, प्रगतीच्या दणदणाटात असे लाखो किडे चिरडले जाइनात का.
.
नको त्या लोकांना दया आणि नको त्या लोकांना शिक्षा असा हा कारभार आहे.
.
कधीकधी अत्यंत उद्वेगाने वाटू लागते की भाकरी किम्वा औषध चोरले म्हणून शिक्षा खरे तर असताच कामा नये . वाट्टेल ते अराजक फैलावले तरे चालेल असे वाटू लागते.
.
बरेच जण फाशीची शिक्षाच रद्द करा असं म्हणताना दिसतात.भारत देशात काही हजार जण तरी नक्कीच असे आहेत ज्यांना फाशी होउन ते मरेस्तोवर मी फाशीचा विरोध करणार नाही. ते मेल्यावर पुढचे बघू.
पण अर्थातच ह्या सुजलाम सुफलाम देशात ते नैसर्गिक मृत्युने मरतात, तोवर अधिक फाशीयोग्य नीच नव्याने मोकाट फिरताना दिसतात.
माझ्या फाशीच्या पाठिंब्याला नि मागणीला मग अशी perpetual मुदतवाढ मिळत राहते.
In reply to विस्तार... by मन१
सविस्तर प्रतिसाद आवडला. मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्वतःच्या लहरीनुसार ढवळाढवळ करण्याची परवानगी कायद्यानुसार आणि घटनेनुसार एका व्यक्तीला असणे हे विचित्रच वाटते.
वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळी कोड बिल्स , रेप केलेल्या व्यक्तीला फक्त सात वर्षांची शिक्षा, जन्मठेपेचा कालावधी फक्त १४ वर्षे , आर्थिक गुन्हे केलेल्यांसाठी वेगळे न्यायालय अशा असंख्य गोष्टी विचित्रच वाटतात.
तरीसुद्धा आम्ही बी.आर. आंबेडकरांना 'ग्रेटेस्ट इंडियन' म्हणून डोक्यावर घेउन का नाचायचे हा प्रश्न पडत राहतोच.
In reply to सविस्तर प्रतिसाद आवडला. by अप्पा जोगळेकर
आंबेडकर आणि त्यांचा गौरव हा थोडा वेगळा मुद्दा झाला. घटना उत्तम प्रतीची नसेलही असे क्षनभर मानू.
पण मुळात घटना कुणीही कितीही चांगली लिहिली तरी त्याची अंमल्बजावणी होत नसेल तर ती आख्खी घटना व्यर्थ ठरते.
सध्याच्या घटनेतच ज्या शिक्षा वगैरे दिल्यात त्यांची अंमलबजावणी होत नाही हीच तर बोंब आहे. आणि हे फार मोठ्या प्रमाणावर आहे.
ह्या सर्व गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्ह्यांच्या तीव्रतेच्या प्रमाणात 'पेट्या', 'खोके' प्रतिभाताईच्या नवर्यापर्यंत पोहोचविले असतील अशी दाट शंका येते आहे.
भारतीय संसदिय लोकशाही प्रणालीत ज्या काही मोठ्या आणि ठळक चुका (कमतरता) आहेत त्या पैकी
एक मोठी कमतरता ही आहे की देशातील काही मोठ्या प्रशासकीय/राजकीय पदांवर नेमणूका करताना फक्त आणि फक्त योग्यता, अनुभव, देशनिष्ठा न बघता राजकीय/पक्षीय निष्ठा सुद्धा बघितल्या जातात आणि काहि वेळेस फक्त याच एका गुणाला महत्त्व दिल्या जातं.
एनी वे "एन्जॉय" .. आणि हो अश्या प्रकारचे प्रश्न मनात निर्माण होउ देउ नका, कुतूहूल मनात निर्माण होउ देउ नका अन्यथा लोकशाही संकटात येईल, अराजकता निर्माण होईल, धर्मनिरपेक्षतेला तडा जाईल.
बलात्काराच्या गुन्ह्याला नुसत्याचं फाशीऐवजी तडफवडुन मारलं जावं.
अर्थात मानवतावादवाले मेणबत्त्या घेउन येतीलंच !
बलात्कार्याला, त्याचे लिंग कापून टाकणे , ही एकमेव योग्य शिक्षा आहे. ती त्याला फाशीपेक्षाही भयंकर वाटेल.
चला बाईंनी "थोर" कार्य केल तर !
भारतासाठी जगभर त्या वरावरा फिरल्या त्याचे लोकांना काहीच कसे वाटत नाही?बलात्कारी लोंकासाठी बाई देव होत्या.
दयेच्या अर्जावर गृहमंत्रालय शिफारस करते आणि राष्ट्रपती शिक्कामोर्तब करतात.याचा अर्थ राष्ट्रपतींचे दायित्व कमी होते अथवा नाही हा मुद्दा नाही. पण वर दिलेल्या विकृत गुन्ह्यांच्या बाबतीत गृहमंत्रालयाने दयेसाठीची शिफारस कशी केली हा मुद्दा देखील मला महत्वाचा वाटतो.
"मानवता व स्त्री मुक्ती " वाल्या "मुक्त स्त्री संघटना " (थोर तिस्ता ताई ई.) .
आपल्या "प्रतिभा" ताईंना दयेचा अर्ज फेटाळण्याचा अधिकार नाहीय का? मि.पा.धुरिण कायदेतज्ञ यावर प्रकाश टाकतिल च.( एक स्त्रीच स्त्री ला मरणोपरांत न्याय देऊ शकत नाही तर या "पुरुष प्रधान" संस्क्रुती विरुद्ध गळे का काढावेत ? (यात मी पुरुष प्रधान संस्क्रुतिचे समर्थन वा पुरस्कार करत नाही हे लक्शात घ्या)
कधी कधी प्रश्न पडतो.
ह्या भिकारड्या, भ्रष्टाचारी, कमकुवत, बोटचेप्या, एकाच धर्माची दाढी कुरवाळणार्या देशाला तुम्ही लोकं सोडून का जात नाही ?
In reply to मला ना by परिकथेतील राजकुमार
हाच विचार म्हणजे मग्रूरी आणि निगरगट्टपणा...
आम्ही आप्ल्या घराची वाताहत करु; गटारगंगा करु, नंगानाच घालू असा टोन.
वरून पुन्हा "इतका त्रास होत असला तर देश सोडून जा" हे ऐकायचं.
अजब न्याय.
घर तुझं आहे; तसच माझंही आहे. कुणी गटार बनवून ठेवत असेल तर बोंबही मारु नये का.
In reply to हाच... by मन१
हाच विचार म्हणजे मग्रूरी आणि निगरगट्टपणा...शाट काही समजले नाही. हा विचार म्हणजे मग्रुरी अणि निगरगट्टपणा कसा आहे ते समजून सांगावे. उलट येवढा त्रास सहन करण्यापेक्षा माणसाने दुसरी सुखाची जागा शोधावी असा चांगूलपणाचा विचार त्यात आहे.
आम्ही आप्ल्या घराची वाताहत करु; गटारगंगा करु, नंगानाच घालू असा टोन.अरेच्या ! आम्ही असे सगळे करू असे मी कधी म्हणालो ? रादर दुसरेच कोणी हे करते आहे म्हणून त्यांच्या नावाने इथे धागे निघतात ना ? आजवर 'पर्यामुळे अतिरेकी मोकाट', 'पर्याच्या परदेशवार्यांचे सुरस किस्से', 'पर्या कसाबला बिर्याणी पुरवणार' असे धागे आपल्या तरी बघण्यात नाहीत बॉ.
वरून पुन्हा "इतका त्रास होत असला तर देश सोडून जा" हे ऐकायचं.निट वाचा की साहेब. :( आम्ही 'जात का नाहीत ? का बरे ह्या इतक्या पुण्याईने मिळवलेल्या नरदेहाचे असे हाल करून घेतात? असे विचारत आहोत. तिथे स्पष्ट शब्दात 'मला प्रश्न पडतो' असे लिहिलेले आहे. कुठेही उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला नाही.
अजब न्याय.आता अशा देशात अजून काय अपेक्षा करणार ?
घर तुझं आहे; तसच माझंही आहे. कुणी गटार बनवून ठेवत असेल तर बोंबही मारु नये का.जरुर मारावी की राजे. पण हातात खराटा घेऊन मारलीत तर तिला काहितरी किंमत मिळेल असे वाटत नाही का? :) काय होते ना, असे धागे बघितले की उगाचच गोणपाट, उंदिर मारायचा विभाग इ. इ. आठवते.
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
सद्य स्थितीचा त्रास आहे. मी माझे काम करीत आहे. ज्यांनी जे करायला हवे ते तसे करीत नाहीत. अशा न-कर्त्यांची संख्या अफाट आहे. त्यांच्या कर्तव्यपराङ मुखतेची किंमत सामान्यांना नि निर्दोषींना द्यावी लागते. पण म्हणून हरेक निर्दोष व्यक्ती हरेक कर्तव्यपरान्मुख व्यक्तीचे हरेक कर्तव्य करायची जिम्मेदारी डोक्यावर घेउ शकत नाही. हे अशक्य आहे. आणी तसेही ते त्याने करणे अपेक्षित नाही.
हाटेलात मोजून योग्य ती रक्कम दिली तर योग्य ती सर्विस मिलणे अपेक्षित आहे. हा काहीसा तसाच न्याय आहे.
तिथे हाटेलात टेबलावर भलतेच काही सांडलेले वगैरे असेल तर त्याची स्वच्छता व्यवस्थापनाने करावी. दरवेळी ग्राहकालाच "स्वच्छतेचा इतका सोस असेल तर स्वतः का नाही साफ करत" असे विचारणे उचित नाही.
उद्या पोलिस त्यांचे काम करत नसतील तर त्यांनी त्यांचे काम करावे असे म्हणत आम्ही आंदोलन करणे(वैधानि रित्या बोंब मारणे) योग्य की पोलिसांचे काम स्वतः करणे (कायदा हातात घेणे ) योग्य?
शिवाय ते आम्ही का करावे हाही सवाल आहेच.
शिवाय ते व्यवहार्य आहे का हा अजून एक सवाल.
विचारायला गेलो तर साधारणतः हे सर्व प्रश्न डोक्यात आले. फारसा आवेशात न येता प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला आहे.
In reply to सद्य... by मन१
+१
समर्पक उत्तर!
ह्या बाईंचे आजुन काय काय कर्तुत्व एकायला मिळणार आहे काय माहित?
जरा विस्ताराने लिहायचं !