Skip to main content

राज ठाकरे यांचा विराट मोर्चा व सभा

लेखक तिमा यांनी मंगळवार, 21/08/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरे यांनी आज एक अभूतपूर्व असा प्रकार करुन दाखवला आहे. त्यांचा मोर्चा व त्यानंतर झालेली सभा ही खरोखरच विराट होती. मोर्चाआधीच, त्याबद्दल शंकाकुशंका काढणार्‍या नतद्रष्ट प्रवृत्तींना, त्यांनी जे भाषण केले त्यांत, खणखणीत उत्तर दिले आहे. ११ ऑगस्टला झालेला प्रकार हा सगळ्याच देशप्रेमी माणसांना अस्वस्थ करुन सोडणारा होता. आणि त्यावर शासनाचा नाकर्तेपणा हा तर, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पोलिसही झाल्या प्रकाराने नाराज झाले होतेच. आजच्या या यशस्वी दणकेबाज उत्तरानंतर शासनाची सुस्ती थोडी उतरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. राज ठाकरे यांच्यावर मी अनेकदा टीका केली आहे. पण आज त्यांचे वर्तन, भाषण अत्यंत संयत होते, एका जबाबदार नेत्यासारखे होते. मोजक्या शब्दांत त्यांनी मुख्य मुद्दे मांडले. जातीय टीका अजिबात केली नाही. सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडला. शिवाय, घरी जाताना सर्वांनी शांतता पाळावी व कुठलेही विचित्र प्रकार करु नयेत हेही सुनावले. माझ्यातर्फे आज राज यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

वाचने 11315
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

मीही आज या कार्यक्रमाविषयी खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया ऐकल्या. राज ठाकरेंनी उत्तम समतोल साधलेला दिसतो. धार्मिक अपीलही घेतलेलं नाही असं ऐकतो. उलट शांतपणे तितक्याच प्रचंड आकाराचा मोर्चा / सभा पार पडू शकते याचं उदाहरण घडवून दाखवलं. यामुळे अनेकांना अनेक संदेश गेले असणार. मीही एका कोण्या पक्षाचा समर्थक नसूनही आजचं राज यांचं वागणं प्रभावी आहे असं दिसतंय.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक वेळेला समीक्षकाच्या भूमिकेत गेलेच पाहिजे का ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रत्येक वेळेला समीक्षकाच्या भूमिकेत गेलेच पाहिजे का ? प्रसंगानुरूप समीक्षकांच्या भूमिकेत प्रत्येकाने जमेल तसं जायला हरकत नसावी. बाकी, पसंद अपनी खयाल अपना. झाल्या घटनेचा निषेध व्हावा म्हणुन विराट मोर्चा निघाला, छान झालं. भाषण तडाखेबंद झालं छान झालं. जिल्ह्या जिल्ह्यातुन मनसे सैनिक मोर्चासाठी आले, छान झालं. एवढ्या मोठ्या विराट मोर्चात ''अरुप पटनाइक राजीनामा द्या , आर आर. पाटील राजीनामा द्या'' अशी गर्जना केली, हेही छान झालं. इतका आनंदी आनंद झाला म्हणजे विराट गर्दीला जमलेले, जमवलेले भविष्यात आपल्या पाठीमागे येतील, असं समजायला अनेकांना हरकत नसावी. अरे हो, गृहमंत्र्याचा आणि पोलिस आयुक्ताच्या राजीनामा मागण्याची जागा आझाद मैदान आहे, हे पाहुन अंमळ गम्मत वाटली. आजचा विराट मोर्चा महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍या माणसाची प्रतिक्रिया होती (ग्रहित धरायला आपलं काय जातं) पण अकरा तारखेला झालेल्या घटनेत 'काहींना' एका पक्षासोबत राहीलं तर पोलिस समोर असुनही आपल्यावर काही कार्यवाही होत नाही, असा एक संदेश दिल्या गेला असं समजु. आणि अकरा तारखेची घटना पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर 'काहींना' आजच्या विराट मोर्चाला आणि त्याच्या नेतृत्त्वाबरोबर गेलंच पाहिजे, या संदेशाशिवाय काही वेगळं लोकशाही मार्गाने होणार असेल तर आजच्या विराट मोर्चाचा आनंद साजरा केला पाहिजे. -दिलीप बिरुटे

माझ्यातर्फेही आज राज यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तथापि, आज कुछ मजा नहीं आया... राज यांनी फारच घाईत भाषण संपविल्यासारखे वाटले. तरीही, त्यांनी योग्य तो संदेश पोचवलाय असे वाटते. जेव्हा त्याच्यावर कोणतेही संकट येईल तेव्हा अशी मोठी ताकद दिसली पाहिजे. ... पाहूया, यापुढे मनसैनिक काय करतात ते... (अर्थातच, चांगल्या कामांना शुभेच्छा!)

राज ठाकरे बुद्धिमान आहेत आणि त्यांचे एक दणकेबाज भाषण एका पुण्याकडच्या ड्रायवरच्या कृपेने ऐकण्याचा योगही नुकताच आला. बरेचसे मुद्दे संदर्भासहित, आणि अतिशय रेखीव आणि जोमदारपणे मांडू शकणारे राज ठाकरे नेते म्हणून अनेकांना का मान्य झाले याचे एक उत्तर मिळाले. राज यांनी संयत भाषण केले हे उत्तमच झाले, 'शिवाय, घरी जाताना सर्वांनी शांतता पाळावी व कुठलेही विचित्र प्रकार करु नयेत हेही सुनावले", हेही बरे झाले. मात्र एक विचारावेसे वाटते, हा पोलिसांची परवानगी नसलेला मोर्चा कुठल्याही कारणाने (मॉब मेंटॅलिटी म्हणा, भडक माथ्याच्या तरुणांनी इतरांनाही भडकवले म्हणा) हिंसक झाला असता तर काय झाले असते? ह्यात नेत्याची जबाबदारी असते ना? हा मोर्चा हिंसक झाला नाही हे राज यांना उपयुक्त झाले, पण झाला असता तर त्यांच्यावर जी जबाबदारी आली असती त्याचे काय?

In reply to by चित्रा

संयोजकांचीच असायला हवी. आणि म्हणूनच या मोर्चा-संदर्भातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष्य घालून नियोजित केली होती.

राजला आजचं टायमींग छान जमलंय, यात वाद नाही. त्याने हे करुन दाखविलं हे तुलना करताना कौतुकास्पद आहे. म्हंजे हे भाजपला, शिवसेनेला, अन्य कुणाला हे सुचलं नाही. सुचलं असेलही पण पाकिटाला जागणाऱ्या राजकारण्याचे आबांविरोधात काही करायची इच्छा झाली नसेल. पण इतकंच. कारण मग पुढे जाऊन राज एक उत्तम नेता आहे, त्याचाच कडून अपेक्षा आहेत, वगैरे वगैरे काही खरं नाही.. नाशकात तीन आमदार आणि महानगरपालिकेत सत्ता आहे. काही शष्प परिणाम नाहीय. तो ही फक्त निष्ठुर धंदेवाईक आहे, इतकंच सत्य आहे.

In reply to by सुधीर मुतालीक

तो ही फक्त निष्ठुर धंदेवाईक आहे, इतकंच सत्य आहे. निष्ठुर धंदेवाईक? हा काय प्रकार असतो बॉ? प्रेमळ धंदेवाईक काय असतो बरे मग? मूळात धंदेवाईक प्रेमळ असतो का? किंवा वरकरणी गिर्‍हाईकाशी गोड गोड बोलणारा वसूलीला आला की कित्ती प्रेमळ आहे हे कळतं. :) धंदेवाईक आहे असे म्हटले तर ठीक. धंदेवाईक तर सगळेच आहेत. आमचा फायदा इतकाच जे आम्हाला आमच्या आजूबाजूला व्हावं असावं असं वाटतं पण तथाकथित राष्ट्रप्रेमामुळे स्वाभिमानी विचाराना राष्ट्रद्रोही ठरवले जाते अशा ठीकाणी राज सारख्या नेत्यामुळे प्रश्न ऐरणीवर येऊन बिनधास्त बोलण्याची सोय होते इतकेच. बाकी सब घोडे बारा टक्के. पुढे जाऊन सत्ताबदल झाला तरी मी काही आशावादी नाही फारसा आपल्या देशातल्या जनतेकडून (होय जनतेकडूनच). जिथे जनताच भ्रष्ट, लाचखाऊ, नितीमत्ताहीन आहे तिथे नेतेही तसेच असणार. फारतर उद्या काँग्रेस जाऊन मनसेवाले सत्तेत येतील असे झाले तरी होणार काय आत्ता जे काँग्रेसमधे आहेत ते काँग्रेस सोडून मनसे मधे जातील. लोक म्हणतील मनसेची ताकद वाढली मनसेचेच सरकार येणार. पण ते सरकार अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस मनोवृत्तीचेच आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

माझेही मत असेच होते की हे ही ईतर राजकान्र्यां प्रमाणे आहेत. पण आज मला त्याच्यातील सच्चेपणा अगदी आतुन जाणवला. राज हेच महाराष्ट्राचे भल करु शकतात याची माझ्या मनाला खात्री वाटते.

राज ठाकरे काय काय म्हणाले.... - आर. आर. पाटील, अरुप पटनाईक हेच आमचे टार्गेट... - भिवंडीतील दंगल रझा अकादमीनेच केली - ११ ऑगस्टला आर. आर. पाटीलांनी शेपूट का घातलं... - अबू आझमी दोन-दोन मतदारसंघातून निवडून येतोच कसा? - अबू आझमीची मदत त्या मुस्लिम मृत तरुणालाच का? आमच्या पोलिसांना का नाही? - बांगलादेशी मुस्लिमांमुळेच मुंबईत हिंसाचार - थोडीशी लाज उरली असेल तर आर. आर. पाटील आणि अरुप पटनाईक यांनी राजीनामा द्यावा - मला एकच धर्म समजतो तो म्हणजे महाराष्ट्रधर्म (छायाचित्र - पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी मोर्चा काढला त्याबद्दल त्यांचे व्यासपीठावर जाऊन गुलाबपुष्प देऊन आभार मानताना महाराष्ट्र पोलिस दलाचे कर्मचारी प्रमोद तावडे)

In reply to by अविनाशकुलकर्णी

पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी मोर्चा काढला त्याबद्दल त्यांचे व्यासपीठावर जाऊन गुलाबपुष्प देऊन आभार मानताना महाराष्ट्र पोलिस दलाचे कर्मचारी प्रमोद तावडे सभेच्या स्थळावर जाऊन गुलाबपुष्प दिले आणि सभास्थळीच महाराष्ट्रात पोलिसांची संघटना असली पाहिजे. इतर राज्यात आहे, महाराष्ट्रात का नको. अशी एक छोटीशी पत्रपरिषद घेतल्यामुळे पोलिसांनी तावडे यांना ताब्यात घेतले आहे. लोक इतके भावनाविवश कसे होतात मला कै कळत नाही. . उद्या मानसिक स्थिती ठीक नाही या किंवा अन्य कारणामुळे त्या पोलिस कर्मचार्‍याला निलंबित केलं, पगार रोखला, तर काय भावात जाईल हे प्रकरण. उद्या मनसे त्यांना सेवेत घ्या म्हणुन आंदोलन करेल काय ? पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करुच नये, केलं तर मनसे आमदारांनी लक्ष घालावं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>लोक इतके भावनाविवश कसे होतात मला कै कळत नाही. . उद्या मानसिक स्थिती ठीक नाही या किंवा अन्य कारणामुळे त्या पोलिस कर्मचार्‍याला निलंबित केलं, पगार रोखला, तर काय भावात जाईल हे प्रकरण. उद्या मनसे त्यांना सेवेत घ्या म्हणुन आंदोलन करेल काय ? पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करुच नये, केलं तर मनसे आमदारांनी लक्ष घालावं. -- त्या पोलीसाची आयुष्यभराची सोय केल्याशिवाय तो मनसेच्या व्यासपीठावर येऊन बोलायची हिम्मत करेलच कसा...

In reply to by अर्धवटराव

>>-- त्या पोलीसाची आयुष्यभराची सोय केल्याशिवाय तो मनसेच्या व्यासपीठावर येऊन बोलायची हिम्मत करेलच कसा +१, असेच मत आहे आणि तसे असावे अशी अपेक्षा करतो. बाकी आत्ताच टिव्हीवर तावडेंची सो कॉल्ड मिनी-पत्रकार परिषद पाहिली, गंमत वाटली. अशा लेव्हलच्या तक्रारी करण्याची ही जागा नव्हे हे त्यांनी समजुन घ्यायला हवे होते. व्यासपिठावर जाऊन राजला गुलाबाचे फुल देणे ही भावनेच्या भरात घडलेली सामान्य घटना म्हणुन घेता येईल किन्तु त्यानंतरचे मिनी भाषण वगैरे गरजेचे नव्हते असे वाटते. - छोटा डॉन

रझा अकॅडमीने लावलेल्या तंदूर भट्टीत, समाजवादी मूर्गी आणि सेना-भाजपवादी रोटी एकाचवेळी भाजण्याची केवढी तरी संधी होती!! तशी ती नेहेमीच असते. कारण ह्या दोहोंचेही मतदार पूर्णतः विभक्त असल्यामुळे, असे हातात हात घालून जाणे त्यांना नेहेमीच सोईचे जाते! एका अतिशय शांत, संयत मोर्चा आणि सभेचे आयोजन करून राज यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत!!

In reply to by सुनील

मग रझा आकादमीची भट्टीच बंद केली पाहजे, नाही का? कमीत कमी त्याचे इंधन तरी. पण प्रेमळ सोनियांच्या आणि करड्या अबांच्या राज्यात भट्टीही लागते आणि इंधनही लाभते.

मी राजीनामा देणार नाही.‘ विनापरवाना मोर्चा काढल्याविरोधात मनसेवर कारवाई करणार... इति:- आबा पाटील...

मला राज ठाकर्यांचे भाषण फारसे आवडले नाही. नेहमीचा आवेश, मुद्देसूदपणा, मार्मिक टिप्पणी नव्हती. काही भाग तर पटलाही नाही. निव्वळ परप्रांतीय मुसलमानांनीच गेल्या आठवड्यात आझाद मैदान परिसरात धुडगूस घातला हे मला आजिबात खरे वाटत नाही. स्थानिक पिल्लावळही त्यात सामील होती. उदा. तो रायफल चोरणारा महाभाग. त्याचे मुंबईत इलेक्ट्रिक दुरुस्तीचे दुकान आहे. म्हणजे चांगला मुंबईत स्थिरावलेला माणूस. बाकी डोकी भडकवणारी भाषणे करणारे मुल्ला मौलवी हे खास उप्र मधून आयात केले होते असे मला वाटत नाही. तेही इथले स्थानिकच. ह्याला परप्रांतीयांचे कारस्थान असे स्वरुप द्यायचे कारण नाही. धर्मांध मुस्लिम लोकांचा धिंगाणा असे ह्याचे स्वरुप होते. ह्यात विविध पार्श्वभूमीचे मुस्लिम युवक सामील झाले होते. कदाचित आपल्या राजकीय ध्येय धोरणांचा विचार करुन ह्याला परप्रांतीय रंग दिला असेल असे वाटते. निदान आबा आणि पटनाईक यांना मोठी किंमत मोजावी लागेल अशी आशा. आणि मोर्चानंतर वा आधी कुठला गैरप्रकार झाला नाही ह्याचे श्रेयही मनसे आणि राजसाहेबांनाच.

In reply to by हुप्प्या

ह्याला परप्रांतीयांचे कारस्थान असे स्वरुप द्यायचे कारण नाही. >>>>>> याला राज नि दिलेले उत्तर इथे पहा !

In reply to by हुप्प्या

ह्याला परप्रांतीयांचे कारस्थान असे स्वरुप द्यायचे कारण नाही. धर्मांध मुस्लिम लोकांचा धिंगाणा असे ह्याचे स्वरुप होते. ह्यात विविध पार्श्वभूमीचे मुस्लिम युवक सामील झाले होते. प्रचंड सहमत!!! आणि मुंबैत दंगा केला की जास्त पब्लिसिटी मिळते त्यामुळे मुंबैत... शिवाय तो रझावाल्यांनी काढलेला मोर्चा मराठी विरुद्ध नव्हताच... तिथे इतर राज्यातले पोलिस असते तरी त्याना ह्या लोकांनी मारले असते.... बाकी राजने स्वतःच्या मोर्चाला कुठेही हिंदुत्ववादी होउन दिले नाही ही जमेची बाजू समजावी का?

In reply to by कवटी

हिंदू हा शब्द निघाला की काही हिंदु बांधवाच्या अंगावर शहारे कां येतात किंवा ते कां बिचकतात हे कोडे मला अजुनही सुटले नाही. या कारणामुळेच ८० टक्के असुनही १५ टक्के असणारे आपल्या एकजुटीमुळे हव ते पदरात पाडुन घेतात व ८० टक्के केवळ चर्चेवर समाधान मानतात. हिंदु समाज हा कधीच एकजुट झाला नाही आणी त्यामुळे त्यांचे अपरिमीत नुकसान झाले हे ईतिहास सांगत असुनही आपण एक कां होत नाही हा खरा प्रश्न आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना व भाजपा या पक्षांनी सौम्य भुमीका घेतली हे त्यातल्या त्यात एक समाधानाचे लक्षण आहे असे म्हणायला हरकत नाही. एकजुटीकडे जाणारा तो एक संकेत ठरावा.

च्यायला, आपल्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात. मराठी माणसाला मराठी माणुस नावावर, भारत देश प्रेम नावावर, हिंदु प्रेम नावावर, घुसखोर अमुक अमुकांना हाकलुन दिलं पाहिजे या नावावर, आपली अस्मिता धोक्यात आली आहे, या नावावर, पक्षीय मतदारांच्या साटलोटं या नावावर सालं उत्तम राजकारण करता येतं आणि राजकारणासारखा उत्तम धंदा नै साला. च्यायला, माझ्यात स्कील असतं ना तर याच धंद्यात पडलो असतो. महाराष्ट्रात तर एक नीट नै की ज्याच्या खांद्यावर सामान्य माणसानं विश्वासानं मान टाकावी. आम्ही भाषणं ऐकुन खुश होतो. हुट..... :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, माझ्यात स्कील असतं ना तर याच धंद्यात पडलो असतो. रिक्वायर्ड स्कील सेट:--- १) कमालीचा पाताळयंत्रीपणा २) उच्च कोटीचा निर्लज्यपणा ३)प्रचंड मेहनत घेउन कमावली गेंडा कातडी ४)लांडी-लबाडी करण्याचे अभिजात कौशल्य ५)काहीही झालं तरी थोबाडावरच हास्य कायम ठेवण्याची कला ६)लाचारी,लाळघोटेपणा,दांभिकपणा,कांगावा या सर्व अवगुणांमधे कमालीचे नैपुण्य सध्या तरी इतकेच आठवत आहेत... हे अवगुण ज्याच्यांत आहेत ते सर्व स्वतःची उन्नती करण्याच्या (देशाची कोणाला पडलीय ?) राजकारणात यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. ;)

In reply to by मदनबाण

रिक्वायर्ड स्कील सेट:--- १) कमालीचा पाताळयंत्रीपणा .... ६)लाचारी,लाळघोटेपणा,दांभिकपणा,कांगावा या सर्व अवगुणांमधे कमालीचे नैपुण्य इतके नसले तर किमान गेला बाजार संपादक म्हणून अनुभव असावा. ;) ( आता पळतो! )

In reply to by विकास

इतके नसले तर किमान गेला बाजार संपादक म्हणून अनुभव असावा. हाहाहा अगं माय गं. मेलो. :)))) -दिलीप बिरुटे

In reply to by विकास

>>किमान गेला बाजार संपादक म्हणून अनुभव आता संपादक म्हटलं की १ ते ६ ऑपॉप असणारच ना? (आय्डी ब्यान होणार बहुतेक) ;)

In reply to by मदनबाण

१) कमालीचा पाताळयंत्रीपणा............... आमच्यात नाहि २) उच्च कोटीचा निर्लज्यपणा............... आमच्यात नाहि ३)प्रचंड मेहनत घेउन कमावली गेंडा कातडी ............... आमच्यात नाहि ४)लांडी-लबाडी करण्याचे अभिजात कौशल्य .............. आमच्यात नाहि ५)काहीही झालं तरी थोबाडावरच हास्य कायम ठेवण्याची कला..... आमच्यात नाहि ६)लाचारी,लाळघोटेपणा,दांभिकपणा,कांगावा या सर्व अवगुणांमधे कमालीचे नैपुण्य ..... आमच्यात नाहि...................

आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार, समाजवादी पक्षाचे नेते आणि भिवंडीचे लाडके आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे की, "मुंबईत ११ ऑगस्ट रोजी झालेली दंगल ही ड्रग्ज माफियांनी केली आहे, मुसलमानांनी नव्हे . मुंबईत आणि महाराष्ट्रात नायजेरीयन ड्रग्ज माफियांचे जाळे वाढत चालले आहे . दंगलीमागेही तेच लोक असण्याची शक्यता आहे. " अर्थातच त्यामुळे आधी इतर विरोधीपक्षांनी (त्यात मनसे पण आली) केलेली आगपखड, सामान्यांपासून ते माध्यमांपर्यत अनेकांनी काढलेली छायचित्रे, चलतचित्रे, कशी चुकीची होती हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता आधी नायजेरीयन्सना देशाबाहेर काढणे महत्वाचे आहे, बांग्लादेशींना नाही. :-)

In reply to by इरसाल

पोलिस आयुक्तांनी चुक केलेली नाही. उलट अबक यांच्या आदेशानुसार जी बघ्याची भूमिका उत्तमरित्या पार पाडली त्याचं त्यांना फळ मिळणारचं होतं. अंगलट आलं तर कायदा व सुव्यवस्थेचा ठपका ठेवून या विभागातुन त्या विभागात बदली करणे, तात्त्पुर्त्या चौकशीसाठी निलंबित करणे, आता निलंबित केलं तर मनसेचा आंदोलनामुळे आयुक्तांना निलंबित केलं असा संदेश जाईल. त्याऐवजी नव्या पदाची निर्मिती करायची, बढती द्यायची आणि पदावरुन उचलबांगडीही करायची. च्यायला, काय हुशार लोक असतात राव हे राजकारणी. व्वा मान गये उस्ताद. या नाट्यात अजुन खुप काही बघायला मिळणार आहे, आत्ता आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे. एक म्हणतो हिंसाचार करणारे बांग्लादेशी होते, एक म्हणतो एक तरी बांग्लादेशी दाखवा दोन कोटी मिळवा. हिंसाचार करणारे ’नायजेरीयन ड्रग्ज माफिया होते’ पकडले गेलेले लोकलचे होते त्याबद्दल कोणीच बोलत नाही. हाहाहा. चालु द्या लोक हो चालु द्या. आम्ही येडपट पब्लिक जोपर्यंत तुमच्या सोबत आहे ना तो पर्यंत तुम्हाला फिकीर नाही. लगे रहो. -दिलीप बिरुटे

या शांततापूर्ण मोर्चामुळे राजला "खळ्ळ खटॅक"पद्धतीने मिळतो त्यापेक्षा जास्त पाठिंबा मिळालेला दिसतोय. चांगली गोष्ट आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15615062.cms हे बघा मटावालेपण झोपेत असल्यासारखे बातम्या देतात. एक प्रश्न : आपले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार न पाडलेल्या अधिकार्‍याला शासन न करता उलट बढती देवुन दुसरीकडे पाठवणे यातुन जो संदेश जात आहे तो योग्य आहे काय ? यामुळे काही निवडक लोकांना हुरुप आला तर त्यात वावगे असे काही मानता येणार नाही. उलट कामचुकारपणा केला तर फायदा होतो हे अधोरेखीत होईल. बाकी सध्या मुगाचा सीजन जोरात चालु आहे असे वाटत आहे.

पटनायक व पाटील ह्यांचा राजीनामा हे मूळ समस्येवर उत्तर आहे का ? बांगलादेशी घुसखोर भारतात घुसविण्यासाठी भारताच्या सीमेवर चौक्या व कुंपण घालणे. व पोलिसांचे एक राष्ट्रस्तरीय दल स्थापन करून भारतातील सर्व अनधिकृत विदेशी नागरिकांचा शोध घेणे. असे काही अक्सीर उपाय योजना करणे गरजेचे आहे. आजही ह्या मोर्च्यामुळे बांगला देशी व इतर अनधिकृत नागरिकांचे भारतातील बस्तान अजिबात डळमळीत झाले नाही आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

>>>>> पटनायक व पाटील ह्यांचा राजीनामा हे मूळ समस्येवर उत्तर आहे का ? सर्व पक्षीय आमदारांनी बांग्लादेशींना रोखण्यासाठी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं पाहिजे. मोर्चांना परवानगी देतांना संघटनेचा इतिहास-भूगोल तपासून मोर्चांना परवानगी दिली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मोर्चात हिंसाचार घडवून आणला. त्या त्या सर्वांना पोलिसांचा असा प्रसाद मिळाला पाहिजे की आयुष्यात कधी पोलिसांच्या अंगाला हात लावण्याची हिंमत होऊ नये. द्वेष पसरविण्या-या संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या संघटनाचा उद्देश तपासला पाहिजे आणि सरतेशेवटी इथे गुण्यागोविंदानं राह्यचं असेल तर कोणीही माजून जाऊ नये, यासाठी शासकीय पातळीवर निर्णय घेतलेले गेले पाहिजेत तसे निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. रस्त्यावर येऊन शक्तीप्रदर्शन आणि सामान्य माणसाच्या भावनेला हाक घालणारे उद्योग बंद व्हावेत तशी इच्छाशक्ती सर्वच पक्षांनी दाखवली पाहिजे असेही वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by निनाद मुक्काम …

पटनायक व पाटील ह्यांचा राजीनामा हे मूळ समस्येवर उत्तर आहे का ?
प्रत्येक घटनेच्या संदर्भात आपण 'मूळ समस्ये'पर्यंत जायचे ठरवले, तर आपणास थेट मुगलांचे आक्रमण, त्यांना वेळोवेळी मदत करणारे हिंदू राजे वगैरेंपर्यंत पोहोचावे लागेल! इथे प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा होता. कुणी संघटना मोर्चा काढते आहे, त्यानिमीत्ताने सार्वजनिक तसेच काही वैयक्तिक मालमत्तेची जाळपोळ - मोडतोड होत आहे, पोलिसांवर बेलगाम हल्ला होत आहे, इतकेच नव्हे तर स्त्री पोलिसांवर हात टाकण्यात येत आहेत. हे ह्या थरावर गेले ह्याचा अर्थ intelligence failure झाले. ते मान्य करणे दूर राहोच, पण संबंधितांना पकडण्याची हालचालही तात्काळ केली जात नाही, व ह्याचे कारण मुस्लिमांचा तेव्हा सुरू असलेला सण, हे दिले जाते. ह्या तर्‍हेच्या वक्तव्यात, खरे तर समस्त भारतीय मुस्लिमांचा अपमान आहे. पण अति लघुदृष्टीच्या राजकारण्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. ही 'न भूतो' स्वरूपाची नाचक्की आहे, पोलिस खात्याची तसेच राज्याच्या गृहमंत्र्याची. पोलिस प्रमुखांविषयी मला काही म्हणायचे नाही, कदाचित वरून आलेल्या आदेशाचे ते पालन करत असण्याची शक्यता आहे. ह्यावेळी गृहमत्रीपदावर असलेल्या व्यक्तिने राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे होता. पण नोव्हें ११ च्या घटनेच्या वेळी 'शहरों मे ऐसी छोटीमोटी घटनाएं होतीही रहती है' असे उद्गार काढणार्‍या राजकीय नेत्याकढून अपेक्षाच करणे चुकिचे आहे, असे आता वाटू लागले आहे. वरील घटनेचे दूरवर पडसाद उमटत राहतील. तसे ते, त्यानंतर झालेल्या आसामी व इतर ईशान्येच्या जनतेचे, पुणे, बंगळूर इत्यादी ठिकाणांहून झालेल्या पळापळीच्या वेळी तात्काळ उमटलेच. सरकारने कितीही विनवण्या केल्या तरी, समाजकंटकांपासून जनतेचे रक्षण करण्याच्या कार्यात, त्याच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाही, हेच ह्यातून अधोरेखित झाले.

दंगलखोर रझा अकादमी वर कारवाई का होत नाही ? त्यांची वेबसाईट ब्लॉक का होत नाही ? रझा अकादमी च्या मोर्चांना दंगलीचा इतिहास असून त्यांना आझाद मैदानात दंगलीला मोर्चाला परवानगी कशी मिळाली ? आझाद मैदानात झालेल्या दंगलीत लाठीमार / गोळीबार का झाला नाही ? रझा अकादमी च्या मोर्चात महिला कधीच नसतात तरी महिला पोलिसांना त्यांचा विनयभंग व्हावा म्हणून तेथे तैनात का केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील फोटो पाहून लक्षात येतील 11 ऑगस्टला ला मुंबई ला झालेल्या दंगलीचे आयोजक 'रझा अकादमी' चे प्रमुख मौलाना मोईन मिया यांच्यासमवेत मंत्री नसीम खान, मंत्री आर आर पाटील, मंत्री सचिन अहिर आणि सोबत 'महाराष्ट्र धर्माचे' अनुयायी असलेल्या 'मनसे' चे उपाध्यक्ष हाजी अराफात सुद्धा दिसत आहेत सदरचा फोटो दंगलीच्या 5 दिवस आधीचा आहे.जणू काय दंगलीचे नियाजनाच्या बैठकीचाच फोटो आहे. धर्माचे राजकारण कोणते पक्ष करतात ध्यानात आलेच असेल. नुसते मोठे मोर्चे काढून काय होणार??/ आपला कुणीच वाली नाही..व सारे राजकारणी एकाच माळ्याचे मणी असे वाटू लागले आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

सदरचा फोटो दंगलीच्या 5 दिवस आधीचा आहे.जणू काय दंगलीचे नियाजनाच्या बैठकीचाच फोटो आहे. शक्यता नाकारता येत नाही.

आपला कुणीच वाली नाही..व सारे राजकारणी एकाच माळ्याचे मणी असे वाटू लागले आहे. >> असं कसं म्हणता? अश्याने तुम्ही अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांचे समर्थक ठरणार, सरसकट सगळ्याच राजकारण्यांवर टिका करणार्‍यांमध्ये तुमचा समावेश होणार आणि तसे झाले तर या देशातील लोकशाही संकटात येणार आणि तुम्ही लोकशाहीचे विरोधक म्हणून ठरणार :)