Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Sat, 08/18/2012 - 21:01
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
ए घंट्या..आवर लौकर. ते टेबल कुणी साफ करायचं तुझा बाप येणार आहे कारे? अन ए चिरकुट साल्या त्या कोपर्‍यातल्या टेबलावर अंडाफ्राय कोण देणार? मगासपासून कश्टमर बोंबलुन राहिलाय ना. आवर आवर चल लवकर. कश्टमरला मेनुकार्ड दे. काय साहेब का झालं.काय करीत झुरळ आलं? सॉरी सॉरी साहेब मिश्टेक चुकून चायनीज करी तुमाला आले बहुतेक. ए वाग्या सुक्कळीच्या हिकडे बग. साहेबाना एक फस्क्लास काजू करी दे. आन ही प्लेट घेवुन जा. अन ए तो तिकडे टेबलावर तीन नंबरला तो कश्टमर टेबलावर झोपलाय का बघ उठव उठव त्याला. टेबल जेवाय साठी आहे झोपायसाठी नाय. आत्ता बेल्लारीची गाडी येइल बीदर ,उस्मानाबाद,गदग येतील. उठव उठव त्याला. जागा कमी पडेल ए भैताड उठव बे ऐकतोयेस रात्रीचे दोन वाजले होते धर्माण्णा च्या धाब्यावर दिवस सुरु होता, रात्रीच्या गाड्या आल्या की त्याच्या धाब्यावर दिवाळी सुरू व्हायची. मसाला चहा, गरम दूध , हाड न सावर सूप , चिंगळी मसाला , चिकण मसाला गावरन कोंबडी हंडी , आलू मसाला बैगन मसाला बैदा मसाला डाल फराय . लसणी डाल , तडका डाल रोटी जीरा राईस काजू करी मटन हंडी चपाती , अंडा करी . बुर्जी पाव हे त्याच्या कडचे होट फेवरीत पदार्थ. रात्री कधिही या तयारच असायचे. धर्माण्णाच्या धाब्यावर संध्याकाळी सात वाजता दिवस सुरु व्हायचा तो रात्री साडे तीन पर्यन्त. त्यानंतर धाब्यावर सामसून व्हायची. एकदा का या गाड्या गेल्या की मग तशी शाम्तता असायची. तशाही या रूटवर प्रायवेट गाड्या फार नसायच्या. पण ज्या काही होत्या त्या सगळ्याना धर्माण्णा चा धाबाफार्च सोयीस्कर होता. अर्धा एक तास विश्रांती झाली की गाड्या चालू पडायच्या. लगबग थांबायची. त्यानंतर्हाटेलातील पोरांची जेवणं व्हायची अन धर्माण्णा सहीत सगळे तिथेच एखादे बाकडे टेबल शोधून आडवे व्हायचे. आज या गाड्या गेल्या प्रवासी गेले . कोपर्‍यावरच्या टेबलावरचा प्रवासी मात्र टेबलावर झोपला होता. कधी कधी असे व्हायचे. एखादा प्रवासी गाडी विसरून जायचा. सकाळी उठून चालू पडायचा. पण असा प्रवासी गाडी निघुन गेली का विचारायचा. आज मात्र तसे झाले नव्हते. हा माणूस मात्र कधी आला होता कोण जाणे. पण बराच वेळ झाला तरी बाकड्यावरच बसून होता. टेबलावर डोके ठेवून झोपला होता. धर्माणाला काहितरी वेगळे वाटले ए रज्जाक बग रे त्याला ऊठव. विचार काय झालय? ओ साहेब उटा उटा रज्ज्याक ने कश्टमर हाक मारली. त्या माणसाची काहीच हालचाल झाली नाही. आण्णा तुमीच देको...... मैने इतनी हाका मारी फिरबी उटता नै. तुमीच देको. आता मात्र धर्माण्णाला गल्ल्यावरुन उठणे क्रमप्राप्त होते. त्याने गिर्‍हाईकाला खांद्याला धरुन हलवायचा प्रयत्न केला. थोडासा म्हणून त्यागिर्‍हाईकाच्या खंड्याला हात लावला. थोडासा हलवला. धडकन आवाज आला. धर्माण्णाची बोबडी वळाली. गिर्‍हाईकाचे डोके तुटून खांद्यावरुन खाली पडले होते ( क्रमशः)
  • Log in or register to post comments
  • 6833 views
  • एक्कावन्न( २)

Book traversal links for एक्कावन्न

  • एक्कावन्न( २) ›

प्रतिक्रिया

Submitted by तिमा on Sat, 08/18/2012 - 21:10

Permalink

सुरवात

सुरवात तर झकास झालीये. पण खालील वाक्य वाचून आमची पण बोबडी वळली. त्या गिर्‍हाईकाच्या खंड्याला हात लावला. थोडासा हलवला.
  • Log in or register to post comments

Submitted by राजा राव on Sun, 08/19/2012 - 16:17

In reply to सुरवात by तिमा

Permalink

खुप मस्त आहे.

खुप छान झालि आहे कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 08/18/2012 - 21:16

Permalink

रहस्यमय मृत्यू.

आँ...हाटेलातच कोणी कापले की काय? धडावेगळे झालेले शिर घेऊन कोणी हाटेलात येऊ शकणार नाही. आणि हाटेलात कापले म्हणावे तर एवढ्या वर्दळीच्या हाटेलात कुणालाच कळले नाही? सॉल्लीड सस्पेन्स आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 08/18/2012 - 21:19

Permalink

छान सुरवात

पुढचा भाग येउद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 08/18/2012 - 21:42

Permalink

खल्लास!!!!

खल्लास!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 08/18/2012 - 21:56

Permalink

एक्का-वन् न

एक्का-वन् न ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 08/18/2012 - 23:13

Permalink

पुढचा भाग लवकर अन मोठा येउ

पुढचा भाग लवकर अन मोठा येउ द्या विजुभौ.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 08/18/2012 - 23:33

Permalink

सॉल्लिड सस्पेन्स!

लिहा पटापट पुढे!
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Sun, 08/19/2012 - 13:55

Permalink

आईशप्पथ ! उत्खनन सोडून चक्क

आईशप्पथ ! उत्खनन सोडून चक्क लेख?? चोक्कस
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 08/19/2012 - 14:29

Permalink

वाचतोय...

काय तरी गौडबंगाल दिसतय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/19/2012 - 18:21

Permalink

वाचतोय.

विजुभौ, लिहा लवकर पुढचा भाग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 08/20/2012 - 10:06

Permalink

जबरा

पुढचा भाग कधी ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 08/20/2012 - 10:15

Permalink

थ्रिलर झकास,, वाचतोय.. जरा

थ्रिलर झकास,, वाचतोय.. जरा मोठे भाग लिवा विजुभाव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 08/20/2012 - 10:50

Permalink

पुढचा भाग?

पुढचा भाग?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 08/20/2012 - 11:33

Permalink

झक्कास सुरुवात. कश्टमरच्या

झक्कास सुरुवात. कश्टमरच्या खंड्याला हात घालणारा धर्माण्णा आवडला ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 08/20/2012 - 11:40

In reply to झक्कास सुरुवात. कश्टमरच्या by मृत्युन्जय

Permalink

=))

कश्टमरच्या खंड्याला हात घालणारा धर्माण्णा आवडला
हा हा हा, हेच बोल्तो :D - (फक्त खंड्या पक्षी माहिती असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 08/20/2012 - 12:12

Permalink

वाचतोय

:) पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 08/21/2012 - 09:55

Permalink

सुरूवात छान झाली आहे. क्रमशः

सुरूवात छान झाली आहे. क्रमशः अत्यंत उत्कंठावर्धक जागी पडलेलं आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com