एक्कावन्न
ए घंट्या..आवर लौकर. ते टेबल कुणी साफ करायचं तुझा बाप येणार आहे कारे?
अन ए चिरकुट साल्या त्या कोपर्यातल्या टेबलावर अंडाफ्राय कोण देणार? मगासपासून कश्टमर बोंबलुन राहिलाय ना. आवर आवर चल लवकर. कश्टमरला मेनुकार्ड दे.
काय साहेब का झालं.काय करीत झुरळ आलं?
सॉरी सॉरी साहेब मिश्टेक चुकून चायनीज करी तुमाला आले बहुतेक. ए वाग्या सुक्कळीच्या हिकडे बग. साहेबाना एक फस्क्लास काजू करी दे. आन ही प्लेट घेवुन जा.
अन ए तो तिकडे टेबलावर तीन नंबरला तो कश्टमर टेबलावर झोपलाय का बघ उठव उठव त्याला.
टेबल जेवाय साठी आहे झोपायसाठी नाय. आत्ता बेल्लारीची गाडी येइल बीदर ,उस्मानाबाद,गदग येतील. उठव उठव त्याला. जागा कमी पडेल
ए भैताड उठव बे ऐकतोयेस
रात्रीचे दोन वाजले होते धर्माण्णा च्या धाब्यावर दिवस सुरु होता, रात्रीच्या गाड्या आल्या की त्याच्या धाब्यावर दिवाळी सुरू व्हायची. मसाला चहा, गरम दूध , हाड न सावर सूप , चिंगळी मसाला , चिकण मसाला गावरन कोंबडी हंडी , आलू मसाला बैगन मसाला बैदा मसाला डाल फराय . लसणी डाल , तडका डाल रोटी जीरा राईस काजू करी मटन हंडी चपाती , अंडा करी . बुर्जी पाव हे त्याच्या कडचे होट फेवरीत पदार्थ. रात्री कधिही या तयारच असायचे.
धर्माण्णाच्या धाब्यावर संध्याकाळी सात वाजता दिवस सुरु व्हायचा तो रात्री साडे तीन पर्यन्त.
त्यानंतर धाब्यावर सामसून व्हायची. एकदा का या गाड्या गेल्या की मग तशी शाम्तता असायची. तशाही या रूटवर प्रायवेट गाड्या फार नसायच्या. पण ज्या काही होत्या त्या सगळ्याना धर्माण्णा चा धाबाफार्च सोयीस्कर होता. अर्धा एक तास विश्रांती झाली की गाड्या चालू पडायच्या.
लगबग थांबायची. त्यानंतर्हाटेलातील पोरांची जेवणं व्हायची अन धर्माण्णा सहीत सगळे तिथेच एखादे बाकडे टेबल शोधून आडवे व्हायचे.
आज या गाड्या गेल्या प्रवासी गेले . कोपर्यावरच्या टेबलावरचा प्रवासी मात्र टेबलावर झोपला होता.
कधी कधी असे व्हायचे. एखादा प्रवासी गाडी विसरून जायचा. सकाळी उठून चालू पडायचा.
पण असा प्रवासी गाडी निघुन गेली का विचारायचा. आज मात्र तसे झाले नव्हते. हा माणूस मात्र कधी आला होता कोण जाणे. पण बराच वेळ झाला तरी बाकड्यावरच बसून होता. टेबलावर डोके ठेवून झोपला होता.
धर्माणाला काहितरी वेगळे वाटले
ए रज्जाक बग रे त्याला ऊठव. विचार काय झालय?
ओ साहेब उटा उटा रज्ज्याक ने कश्टमर हाक मारली. त्या माणसाची काहीच हालचाल झाली नाही.
आण्णा तुमीच देको...... मैने इतनी हाका मारी फिरबी उटता नै. तुमीच देको.
आता मात्र धर्माण्णाला गल्ल्यावरुन उठणे क्रमप्राप्त होते.
त्याने गिर्हाईकाला खांद्याला धरुन हलवायचा प्रयत्न केला.
थोडासा म्हणून त्यागिर्हाईकाच्या खंड्याला हात लावला. थोडासा हलवला.
धडकन आवाज आला. धर्माण्णाची बोबडी वळाली.
गिर्हाईकाचे डोके तुटून खांद्यावरुन खाली पडले होते
( क्रमशः)
Book traversal links for एक्कावन्न
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरवात
खुप मस्त आहे.
रहस्यमय मृत्यू.
छान सुरवात
खल्लास!!!!
एक्का-वन् न
पुढचा भाग लवकर अन मोठा येउ
सॉल्लिड सस्पेन्स!
आईशप्पथ ! उत्खनन सोडून चक्क
वाचतोय...
वाचतोय.
जबरा
थ्रिलर झकास,, वाचतोय.. जरा
पुढचा भाग?
झक्कास सुरुवात. कश्टमरच्या
=))
वाचतोय
सुरूवात छान झाली आहे. क्रमशः