'भारतीय' एक पहावा असा चित्रपट
एक शहरातला तरूण खेड्यात जातो. तिथे तो काही बदल घडवू इच्छितो.
इथले लोक इतके सुस्त कसे ? आपल्या प्रगतीसाठी ते काहीच हालचाल का करत नाहीत ?
असे प्रश्न त्याला पडतात. विजेचा भरोसा नाही , पिण्याच्या पाण्याचेही हालच.
गावात एका तरुणीने शाळा स्वरूपाचे काही कार्य चालू केले आहे.
सगळी 'स्वदेश' ची आठवण यावी अशी परिस्थिती.
यात भर म्हणजे चित्रविचित्र दाढी वाढलेला असंबद्ध वाटावं असं बोलणारा असा एक साधु बैरागीही यामधे आहे.
त्यात देशपांडे होता यात मकरंदच पण अनासपुरे आहे.
--
अलिकडच्या काळात ग्रामीण मराठी चित्रपट म्हटलं की जे शहरी लोक काम करतात त्यांच्यापैकी
एक म्हणजे मोहन आगाशे. पण समोर आहे कुलदीप पवार.
निदान ग्रामीण बाबतीत पवार सरस.
--
शहरातून आलेला तरुण सुबोध भावे. तरुणी मिता सावरकर.
नटसम्राट जितेंद्र जोशी पाटलाचा पोर. तो नेहमीप्रमाणे गळत गळत डायलॉग बोलत राहतो.
काही माफक बालवाडी जोक तो करतो, त्याला त्याचे चाहते दादही देतात.
'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं म्हटल्यावर
मग मी भारतातल्या कुनाबरूबर लगीन कसं करू असे महान प्रश्न त्याला पडतात.
लीडरोल त्याला दिला नाही हे आपलं भाग्य.
--
सगळं बरं चाललेलं असताना गळे काढून म्हटलेली गाणी बकाल वाटतात.
अशा गाण्यांना भीक देखील घालावाशी नाही वाटत.
त्यापेक्षा रेल्वे स्टेशनवरचे 'शोधीसी मानवा' कितीतरी बरे वाटते.
--
सुरुवातीला चित्रपट पकड घेत नाही. पण पुढे मात्र सारा प्रेक्षक गुंतत जातो.
सध्याची भारतातली परिस्थितीही त्याला कारण आहे. त्यामुळे सार्या भारतीयांना हा आपला चित्रपट वाटतो.
स्टोरीचे वेगळेपण सुबोध, कुलदीपचा अभिनय आणि संजय पवार यांचे खटकेबाज डायलॉग हे चित्राचे वैशिष्ट्य.
असल्या स्टोरीचे चित्रपट केवळ मराठीत न निघता हिंदीतही निघावेत,
म्हणजे बॉलिवूडमधे निर्माण झालेली प्रचंड पोकळी
काही प्रमाणात भरून निघेल.
शब्दाने केवळ शब्दच पोचवता येतो. त्यामुळे आपली उत्कंठा टिकेल इतपतच लिहावे म्हणतो.
याद्या
4314
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
स्वदेस पेक्षा वेगळा कसा ?
खरं तर स्वदेश हाही अजून
जन्या मन्या तुक्या ..
एका उत्तम कथेचा बट्याबोळ
स्वदेश ची कॉपी आहे काय?
शाहरुख भंकस आहे हे कोणीच
In reply to स्वदेश ची कॉपी आहे काय? by अर्धवटराव
निखालस भंकस !!
In reply to शाहरुख भंकस आहे हे कोणीच by बॅटमॅन
कुठल्या दुनीयेत जगताय राव !!!
In reply to शाहरुख भंकस आहे हे कोणीच by बॅटमॅन
इंटर्व्हलनंतर चित्रपटावरची
पर्या , पिच्चर पायला नायका
कात्रज
हा चित्रपट 'स्वदेस' ची कॉपी
परिक्शन काही पटले नाही. एक
<<<जे काही बालवाडी जोक करतो
In reply to परिक्शन काही पटले नाही. एक by सोत्रि
हे परिक्षण
हे परीक्षण नाहीएका सामान्य
अत्यंत भिकार दिग्दर्शन,