Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हुप्प्या on Sun, 08/19/2012 - 08:28
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms अतिथी देवो भव अर्थात अतिथीला देव मानणारे व्हा अशा अर्थाचा वेदातला एक श्लोक आहे. आपल्या सरकारने त्यात थोडा बदल करुन अतिरेकी देवो भव केला आहे की काय अशी शंका येणारी ही बातमी. ही खोटी असू दे अशी इच्छा. पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे. सामान्य लोकांनाही असले खाणे परवडत नसेल. आणि अन्य कैद्यांनाही असले खायला दिले जात नसेल ते ह्या नररत्नांना कुठल्या कारणाने दिले जाते? आणि हा खर्च कोण करतो? हे अगदी भयानक आहे.
  • Log in or register to post comments
  • 6192 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 08/19/2012 - 08:48

Permalink

रमझानचा पवित्र महिना सुरु

रमझानचा पवित्र महिना सुरु असल्याने आपण "धर्मनिरपेक्ष" कसे आहोत हे कदाचित सरकारला दाखवुन द्यायचे असेल ! इकडे या देशद्रोही पाकड्या अतिरेक्यांची अशी सेवा चालु असताना तिकडे पाकिस्तानात अडकलेल्या सरबजितला मात्र जेवणात विष कालवुन दिले जात आहे. संदर्भ :--- http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-i-am-being-poisoned-sarabjit-singh-3655524-NOR.html पुप्या तुझी युक्ती पाकडे वापरत आहेत रे बघ.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Sun, 08/19/2012 - 11:25

Permalink

नको त्या ठिकाणी

नको त्या ठिकाणी आपण फारच सच्चे, चांगली माणसे आहोत असे दाखवले जाते. आपल्या धर्मशास्त्रात लिहिले आहे की ज्याच्यावर माणूसकी दाखवतो त्याची पात्रता नसताना सुद्धा जेव्हा दाखवणारा दाखवतो ती एक तामसी वृत्तीच आहे. (पात्रता ओळखून, तारतम्य राखून व्यवहार करावेत) शिवाजी सोडून आपल्याला स्टेटक्राफ्ट कधी जमले नाही. त्यात अजून सुद्धा असे आहे की लोकं एक ग्रॅम मलईवर खूप चर्चा करतील - एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका. टायपो पण झाल्या असतील. पण अजमल व अबूला खूप काही छान छान खायला मिळते व तेही निर्लज्ज सरकार देते आहे हे महत्वाचे (आता त्याच्या नावावर 'इतरही' 'लोकं' 'खात' असतील ती गोष्ट वेगळी).
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sun, 08/19/2012 - 09:53

Permalink

चालायचंच.

चालायचंच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/19/2012 - 11:50

In reply to चालायचंच. by अप्पा जोगळेकर

Permalink

+१

चालायचंच. कशा कशाचा लोड घ्यायचा आपण. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 08/19/2012 - 10:46

Permalink

.

मिपावर असे धागे काढण्याची वारंवार संधी दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. (बांगड्या न भरलेल्या मर्दांच्या आशेवर असलेला) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 08/19/2012 - 13:55

In reply to . by नितिन थत्ते

Permalink

कृपया 'शौर्य' हा गुण अधोरेखित

कृपया 'शौर्य' हा गुण अधोरेखित करण्यासाठी इतर कुठलीतरी वचने वापरावीत. वाचताना खटकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 08/20/2012 - 13:53

In reply to . by नितिन थत्ते

Permalink

दोस्ताना

>>>बांगड्या न भरलेल्या मर्दांच्या आशेवर असलेला काय एकेकाची आवड अस्ते नै ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 08/20/2012 - 14:06

In reply to . by नितिन थत्ते

Permalink

काय स्मरणशक्ती आहेय

काय स्मरणशक्ती आहेय ? शब्दच्छल चालू द्या ! --- असो कसाबचा अफजलखान का होत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Sun, 08/19/2012 - 11:09

Permalink

भूक

पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे
संशयित्/गुन्हेगारांकडून माहिती मिळवण्यासाठी हे केले जाते. उ.दा. अंडरवर्ल्डमधल्या लोकांना पोलिस बराच वेळ भुकेले ठेवतात मग जिलब्या(खर्‍या जिलब्या,मिपावरच्या नव्हेत!) वा तत्सम आवडते पदार्थ समोर ठेवतात. बर्‍यापैकी मार खावून झाल्यावर खायच्या आशेने संशयित मग माहिती पुरवतात. येथेही हाच प्रकार असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Sun, 08/19/2012 - 11:27

In reply to भूक by चिरोटा

Permalink

चिरोटा साहेब

अजमल कडून काय माहिती मिळवायची ती अजून इतक्या वर्षांनी सुद्धा अजून राहिलीच असेल तर मग आता तर मुळीच मिळणार नाही. ती वेळ निघून गेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 08/19/2012 - 12:16

Permalink

बिर्याणी सीन आठवला

  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Sun, 08/19/2012 - 12:31

In reply to बिर्याणी सीन आठवला by दादा कोंडके

Permalink

एकदम सही

सौ सोनार की एक लोहार की! असा रोखठोक व्यवहार समजावायला नानाच हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sun, 08/19/2012 - 17:41

In reply to एकदम सही by हुप्प्या

Permalink

+१

सही सीन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/19/2012 - 12:42

In reply to बिर्याणी सीन आठवला by दादा कोंडके

Permalink

:)

मस्त. व्हेरी व्हेरी स्पेशल निवृत्त झाला आता सचिन कधी निवृत्त होणार. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Sun, 08/19/2012 - 23:34

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

असेच म्हणतो....

प्रतिभा ताई निवृत्त झाल्या , आपले साहेब कधी निवृत्त होणार.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 08/19/2012 - 23:29

In reply to बिर्याणी सीन आठवला by दादा कोंडके

Permalink

मस्त शोलिड सीन आहे

मस्त शोलिड सीन आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 08/19/2012 - 23:47

Permalink

मुंबईत जे काय झाले आहे,

पोलीसांना मारहाण झाली, महीला पोलीसांचा विनयभंग केला, मिडीयाला टारगेट करून मारहाण आणि जाळपोळ केली, बसेसवर दगडफेक केली आणि सर्वावर कडी म्हणजे अमर जवान स्मारक तोडले यांच्यावर काहिही कारवाई जे सरकार करीत नाही त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवता.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 08/20/2012 - 11:02

Permalink

-

गणपतीला आमच्या कैद्यांना हेच पोलीस मोदक पुरवणार का ? ;) अमोल
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 08/20/2012 - 11:25

Permalink

-जेलमधे कोणाला कायकाय आणि

-जेलमधे कोणाला कायकाय आणि किती ग्रॅम खायला दिलं जातं याच्या तपशिलाच्या बातम्या बाहेर कशा येतात? -काही अज्ञात जेल कर्मचार्‍यांनी "नाव न सांगण्याच्या बोलीवर लीक केलेल्या" बातम्यांना कितपत खरे मानावे? -जुंदाल कसाबादि लोकांना देण्यासाठी बिर्याणी, मलई आदि नाही मागवली तर कर्मचार्‍यांना ती फुकट खायला कशी मिळणार? याचा विचार झाला आहे का? -अशा प्रकारे नुसता तर्काने विचार केला तर ते जुंदाल किंवा कसाबला अतएव दहशतवादाला पाठिंबा देणं आहे किंवा लांगूलचालन आहे किंवा देशद्रोह आहे असं मानता येईल का? ही बातमी खरी असू शकेलही पण .. नसेलही.. यावर माझं एकच म्हणणं आहे की अशा बातम्यांनी हिंदूंच्या मनात असलेली रास्त तिडिक अजूनच तीव्र होत असते. अशा वेळी जेलच्या ऑथॉरिटीजनी पुढे येऊन काय ते खरं सांगावं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 08/20/2012 - 14:09

In reply to -जेलमधे कोणाला कायकाय आणि by गवि

Permalink

तेच ना चायला. बाकी सगळं सोडून

तेच ना चायला. बाकी सगळं सोडून कसाबने आज इतक्या कोंबड्या चापल्या आणि इतकी मलई खाल्ली याचे तपशील या रिकामचोटांना कसे मिळतात काय माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 08/20/2012 - 13:02

Permalink

मा. बल्लवाचार्य श्रीयुक्त गणपा शेठ ह्याना

भेजा फ्राय ह्या पदार्थाची पाकृ लवकरात लवकर मिपावर टाकुन ,ते नेमके काय असते हे आम्हाला दाखवुन द्यावे. ही नम्र विनंती. बाकी आपले चालु द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 08/30/2012 - 16:05

Permalink

आभारी आहे!

मटाने माझे शीर्षक वापरले. हे पहा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15995223.cms मटाचा मिपावर वावर असतो तर!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 08/30/2012 - 18:42

In reply to आभारी आहे! by हुप्प्या

Permalink

+१

सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 08/31/2012 - 19:08

Permalink

अरुण गवळी

म्हणे अरूण गवळीला अशी शिक्षा दिली आहे, कसाब वा गुरुपैकी ज्याला शेवटी फाशी दिली जाईल तोपर्यंत सक्त मजुरी! हे ऐकल्यावर तो दगडी माणूसही ढसढसा रडू लागला. आता आपण जिवंत सुटणार नाही असे कळून चुकले त्याला!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 08/31/2012 - 19:29

In reply to अरुण गवळी by हुप्प्या

Permalink

योगायोग

अरूण गवळीस शिक्षा देणार्‍या मोक्का कोर्टाच्या न्यायमुर्तींचे नाव पृथ्वीराज चव्हाण आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 09/03/2012 - 07:49

Permalink

हे पण

हे पण अतिरेकी मानले जाऊ शकतात का? सरळ सरळ चिथावणी ऐकू येते. "ए माचीस ला! माचीस! ए जला ए जला... इस्की माकी भेंचोद. ए जला जला न्युज वाले को जला भेंचोद!" दुवा: http://youtu.be/08gud4_bS-o
  • Log in or register to post comments

Submitted by daredevils99 on Mon, 09/03/2012 - 09:20

In reply to हे पण by निनाद

Permalink

अतिरेकी

Image removed. ह्या पण अतिरेकी मानल्या जाऊ शकतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 09/03/2012 - 09:48

In reply to अतिरेकी by daredevils99

Permalink

पोलिस??

बाप्रे! पोलिसांनाच अतिरेकी म्हंटले तर मग अतिरेक्यांना काय म्हणता तुम्ही? पोलिस??
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 09/03/2012 - 10:27

In reply to अतिरेकी by daredevils99

Permalink

हॅ हॅ हॅ

बाकी ह्या बाईंनी बोलघेवड्यांची पंचाईत करून ठेवली आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 09/03/2012 - 17:21

In reply to अतिरेकी by daredevils99

Permalink

नाही. त्यांना दंगेखोर किंवा

नाही. त्यांना दंगेखोर किंवा चिथावणीखोर असे संबोधता येईल. अतिरेकी ही वेगळी संज्ञा आहे त्या संज्ञेमधे त्या बसु शकत नाहीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात मिपावर अनेक अत्यंत विद्वान, हुशार आणि फक्त तारतम्याने वागणारे विचारवंत आहेत त्यांच्यानुसार सदर बाई ह्या अतिरेकी असू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 09/03/2012 - 17:25

In reply to नाही. त्यांना दंगेखोर किंवा by नाना चेंगट

Permalink

त्याच

या तिस्ता सेटलवाड आहेत ना? त्यांना २८ वर्षांची शिक्षा झाली त्या...
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 09/03/2012 - 17:35

In reply to त्याच by निनाद

Permalink

नाही

या तिस्ता सेटलवाड आहेत ना? त्यांना २८ वर्षांची शिक्षा झाली त्या...
नाही हो. या मायाबेन कोडनानी आहेत. भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकेकाळच्या जवळच्या सहकारी. (ही सलगी अंगाशी येणार हे लक्षात येताच त्यांनी हे सहकारीपण नाकारले ती गोष्ट वेगळी).
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 09/03/2012 - 17:35

In reply to नाही. त्यांना दंगेखोर किंवा by नाना चेंगट

Permalink

चालू द्या

नाही. त्यांना दंगेखोर किंवा चिथावणीखोर असे संबोधता येईल. अतिरेकी ही वेगळी संज्ञा आहे त्या संज्ञेमधे त्या बसु शकत नाहीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
हे बरे आहे. तुमचा असला तर अतिरेकी आणि आमचा असला तर केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर. या बाईंचा ९०-१०० लोकांना जाळून मारायच्या अत्यंत घृणास्पद घटनेत हात होता हे कोर्टानेही मान्य केले आहे.तरीही त्या केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर. मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना जाळून मारणारे (तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे) पण केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर का? एकूणच काय की बहुसंख्यांकांच्या जातीयवादाला राष्ट्रवादाचा मुलामा देता येतो पण अल्पसंख्यांकांचा जातीयवाद हा नुसता जातीयवाद न राहता देशद्रोहही ठरतो. चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 09/03/2012 - 18:25

In reply to चालू द्या by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना

मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना जाळून मारणारे (तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे) पण केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर का? होय. जर ते भारतीय असतील (आणि स्वतःला तसे समजत असतील) तर त्यांना दंगेखोर अथवा चिथावणीखोर असेच संबोधले जावे. पण त्यात कुणी अभारतीय असेल तर त्याला अतिरेकी म्हणण्यास मला गैर वाटणार नाही. आणि माझ्या माहितीनुसार सर्वत्र गोध्रा दंगल, गुजरात दंगल असाच शब्दप्रयोग करण्यात आला आहे. गोध्र्याला अतिरेकी हल्ला किंवा गुजरातेत अतिरेकी हल्ला असा प्रयोग करण्यात आलेला नाही. कुणी केला असल्यास ती चूक आहे. बाकी राष्ट्रद्रोह अथवा जातीयवाद यावर आमची तुमच्याहून भिन्न मते आहेत एवढे सध्या पुरे.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Mon, 09/03/2012 - 18:52

In reply to मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना by नाना चेंगट

Permalink

काय सांगता

जर ते भारतीय असतील (आणि स्वतःला तसे समजत असतील) तर त्यांना दंगेखोर अथवा चिथावणीखोर असेच संबोधले जावे. पण त्यात कुणी अभारतीय असेल तर त्याला अतिरेकी म्हणण्यास मला गैर वाटणार नाही.
म्हणजे भारतीय अतिरेकी नसतात तर.हे नवीनच कळत आहे.अतिरेकी असण्या/नसण्याचा भारतीय (किंवा अन्य कोणत्याही देशाचा) असायचा/नसायचा काय संबंध हे कळले नाही.
गोध्र्याला अतिरेकी हल्ला किंवा गुजरातेत अतिरेकी हल्ला असा प्रयोग करण्यात आलेला नाही. कुणी केला असल्यास ती चूक आहे.
गोध्रा कांडात पाकिस्तानच्या आय.एस.आय चा हात असायची शक्यता आहे असे पोलिसांनीच म्हटले आहे. संघ परिवाराशी संबंधित विश्व संवाद केंद्र पण तेच म्हणत आहे . आता आय.एस.आय म्हणजे दहशतवाद आलाच. आणि त्या प्रकारात केवळ आय.एस.आय ही पाकिस्तानी दहशतवादी संस्थाच सामील होती आणि कोणीच भारतीय नव्हते हे असंभवनीय आहे (कोर्टानेही काही भारतीयांनाच त्याबद्दल शिक्षा केली आहे). तेव्हा काही भारतीयही दहशतवादी कृत्यात सामील होतेच. १९९३ च्या स्फोटांच्या वेळी दाऊद इब्राहिम भारतीय पासपोर्ट धारक भारतीय नागरिकच होता.तेव्हा भारतीय दहशतवादात सामील नसतात असे अजिबात नाही. किंबहुना दहशतवादी असण्या/नसण्यामागे कोणत्या एका देशाच्या नागरिकत्वाचा (किंवा अमुक एका धर्माचे असण्याचा/नसण्याचा) संबंधच नाही. माझ्यासारख्यांचा आक्षेप कशाला आहे? गोध्रा म्हणजे दहशतवादी निंदनीय घटना मानणारेच गोध्राइतक्याच निंदनीय दंगलींचे एका अर्थी समर्थन करतात. म्हणूनच म्हटले-- तुमचा असेल तो दहशतवादी आणि आमचा असेल तर केवळ चिथावणीखोर.
बाकी राष्ट्रद्रोह अथवा जातीयवाद यावर आमची तुमच्याहून भिन्न मते आहेत एवढे सध्या पुरे.
वाचून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 09/03/2012 - 18:58

In reply to काय सांगता by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

खिक

>>>>माझ्यासारख्यांचा आक्षेप कशाला आहे? गोध्रा म्हणजे दहशतवादी निंदनीय घटना मानणारेच गोध्राइतक्याच निंदनीय दंगलींचे एका अर्थी समर्थन करतात. म्हणूनच म्हटले-- तुमचा असेल तो दहशतवादी आणि आमचा असेल तर केवळ चिथावणीखोर. :) तुमचा आणि आमचा करुन तुम्ही "तुमचा" ह्या शब्दात मला गोवत असाल तर माझा आक्षेप आहे. तुमचे भांडण ज्यांच्याशी आहे त्यांच्याशी चालू ठेवा. >>>वाचून आनंद वाटला. तुम्हाला आनंद वाटला म्हणून मला पण आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 09/03/2012 - 13:04

Permalink

च्याआयला मी.पा. पण काँग्रेस

च्याआयला मी.पा. पण काँग्रेस सारखे धर्मनीरपेक्ष आहे वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/03/2012 - 14:55

Permalink

खुनशी लेखन

एखाद्या धार्मीक माणसाने दुसर्‍या धार्मीक माणसाचा आणि त्याचा भावनांचा, धर्माचा आदर करावा इतपतच क्रिया भारताने केली आहे. त्यात भयानकपणा वगैरे आढळला नाही. पण अनाहूतपणे देशाचा, जनतेचा आणि तमाम अन्य कैद्यांचा मक्ता घेतलेले काही लेखक इतके खुनशी लेखन करताना बघून गंमत वाटली. बहुधा कंपनीचे फुकट मिळणारे नेट वापरून असे फुकटचे विचार बनले असावेत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 09/03/2012 - 22:47

Permalink

शतकी आणि सूतकी

नरोडा हत्यांकांड प्रकरणी न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो भाजपाच्या मंत्री/बजरंग दल यांच्याऐवजी सिमी (वा तत्सम) दहशतवादी संघटनेविरुद्ध असता तर, मिपावर एव्हाना शतकी धाग्याचा महापूर लोटला असता (त्यात गैर काहीही नाही) पण आता शतकी सोडाच पण साधा सूतकी धागादेखिल नाही!!! ;) अळीमिळी गुपचिळी!!! बाकी ही बसलेली दातखीळदेखिल बरेच काही सांगून जाते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 09/04/2012 - 00:06

In reply to शतकी आणि सूतकी by सुनील

Permalink

तुम्ही का नाही काढलात ?

तुम्ही का नाही काढलात ? लोकांनी दिले असते प्रतिसाद. अजूनही काढा, भरघोस प्रतिसाद देऊ आम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 09/04/2012 - 00:02

Permalink

स्मित हास्य.

स्मित हास्य
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com