Skip to main content

मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???

लेखक वेताळ यांनी शनिवार, 11/08/2012 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .

वाचने 34448
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

"पाकिस्तानातील अत्याचाराला कंटाळून भारतात स्थलांतर करणा-या हिंदूंना दिलासा देणारा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. या पीडित हिंदू स्थलांतरितांनी नियमानुसार मागणी केल्यास त्यांना दीर्घकालीन व्हिसा देण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानातील धर्मांध मुस्लिमांकडून गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. बंदुकीचा धाक दाखवून तरुण हिंदू मुली व नववधूंच्या अपहरण केले जात आहे. या छळाला कंटाळून अनेक हिंदू कुटुंबे तीर्थयात्रेच्या नावाखाली हिंदुस्थानात धाव घेत आहेत. यातील अनेकांना पाकिस्तानात पुन्हा जायचे नाही. मात्र, त्यांना केवळ महिनाभराचा व्हिसा मिळाला आहे. या व्हिसाची मुदत दीर्घकाळासाठी वाढवून मिळावी, अशी स्थलांतरीतांची मागणी आहे. याबाबत बोलताना केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग म्हणाले, ' दीर्घकालीन व्हिसाची तरतूद भारतात आहे. मात्र, त्यासाठी काही अटी-शर्थींच्या अधीन राहून ठराविक वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. तशी मागणी झाल्यास व्हिसा निश्चितच देण्यात येईल. ' " म.टा मधील बातमी. म्हणजे समजा काही कारणाने एखाद दुसरी अट अर्जकर्त्याला पुर्ण करता आली नाही (जीव मुठीत घेउन पाकिस्तानातून पळून आलेत... सगळीच कागदपत्रे जवळ असतीलच याची ग्यारेंटी नाही... साधे गाडीचे लायसेन काढायला गेलो तर हे घेउन या ,ते घेउन या म्हणून १० वेळा परत पाठवतात... इथे तर व्हिसा द्यायचाय) तर या कुटूंबाना जबरदस्तीने परत पाकिस्तानात पाठवणार का? या हिंदूना निर्वासिताचा दर्जा का नाही मिळणार? भारतात येउन दंगली घडवणार्‍या बांगलादेशी निर्वासीतांना इथे रेशनकार्ड मिळतात आणि या हिंदूना अटी आणि शर्ती पुर्ण करण्याची जबरदस्ती का? शिवाय वर बातमीत म्हणल्या सारखा कुठला छळ या बांगलादेशी मुसलमानांचा त्यांच्या देशात होतो म्हणून त्यांना इकडे निर्वासित व्हावे लागते? इथल्या (सर्वधर्मिय) नागरीकांना त्रास देणार्‍या बांगलादेशीं मुसलमानांना रेशनकार्डे आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूना अटी आणि शर्ती????? भारत देश्/सरकार हिंदूच्या बाबतीत आकसाने वागतोय असे वाटत नाही का? आझादमैदानाच्या धर्तीवर कराचीत्/इस्लामाबाद मधे हजारो हिंदूनी मोर्चा काढून जाळपोळ केली अशी एखादी बातमी कोणी दाखवू शकेल काय?

In reply to by आंबोळी

पाकिस्तानातील हिंदूंनी भारतात येण्या ऐवजी स्विडन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि कॅनडा येथे आश्रय मागितला पाहिजे. या देशांना मायभूमीत जीवाचा असलेल्या लोकांना आश्रय दिलाच पाहिजे अशी तरतूद (जिनिव्हा?) आंतरराष्ट्रिय करारात आहे. या अंतर्गत, त्यांना ऑस्ट्रेलिया येथे आल्यावर काही बेसिक गोष्टी पुरवल्या जातात. इंग्रजीच्या शिक्षणाची सोय केली जाते. नोकरी मिळेपर्यंत जगण्यासाठी असा भत्ता दोन वर्षे दिला जातो. सध्या या तरतुदीचा लाभ घेऊन येथे मोठ्या इराकी, इराण, अफगाणी आले आहेत! अनेक पाकी पण अफगाणी म्हणून घुसले आहेत! आणि येतच आहेत!! त्यात हिंदू मात्र कुठेच नाहीत कारण, त्यांना अशी तरतूद आहे हेच माहिती नाही. तेव्हा कुणाला शक्य असेल तर ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवा. अर्ज कसा कुठे करायचा वगैरे आवश्यक माहिती हवी असल्यास मी काढून देऊ शकेन. व्यनि करावा!

हारूनभाऊ >> कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या *** वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल या आशेने फार दिवसांनंतर मिपावर आलो आणि वरील काही प्रतिसाद वाचून मन पार उद्विग्न होऊन गेलं. माणुसकी जपा एव्हडीच सगळ्यांना विनंती. आता मिपाकरांनाच सांगा माणुसकी जपा म्हणून. दंगल मिपाकरांनी केली होय ? बांगलादेशींचा फार कळवळा असेल तर तुमच्या घरातील २ खोल्या का देत नाहीस त्यांना... --

एका चॅनेलवरील चर्चेत हे ऐकले. ह्या दंग्यामधे अमुक इतक्या महिला पोलिसांना विनयभंगासारख्या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असे वाचायला मिळाले. आता एक प्रश्न असा आहे की महिला पोलिस कशासाठी उपस्थित होत्या? मोर्चे, निदर्शने यात जर बायका उपस्थित असल्यास त्यांचा बंदोबस्त करायला महिला पोलिस असतात. आता ह्या मूळ मोर्चामधे कुणी महिला दिसत नाहीत. निदान कुठल्या व्हिडियोत वा फोटोत तरी कुणी मुस्लिम महिला दिसत नाहीत. मग इतक्या मोठ्या संख्येने महिला पोलिसांना आणायला कुणी सांगितले? धार्मिक मुस्लिम मोर्चामधे मुस्लिम बायकांना स्थान नसते इतकी साधी उघड गोष्ट पोलिसांना ठाऊक नाही? हा काय मूर्खपणा आहे का निष्काळजीपणा आहे? आणि त्याकरता कुणाला दोषी ठरवणार का?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15523829.cms ह्या मोर्चात सामील झालेला आणि जिवावर उदार होऊन पोलिसांची रायफल पळवणारा वीर सलीम चौकिया पोलिसांना सापडला! वा. बहुधा "वरची" कनेक्शन कमी पडली असावीत. बघू या ह्या भाद्दराला शिक्षा होते का पारितोषिक मिळते ते!

बरखाताई म्हणतायत नॉर्थ इस्टची लोकं घरी सुट्टीला चालली आहेत. जोडून सुट्ट्या बिट्ट्या आहेत आणि सणही आहे म्हणूलोक्ते घाबरून निघून जातायेत अशा अफवा पसरवू नयेत. ज्या 'मिसइन्फर्म्ड मिसगाइडेड' वगैरे लोकांची मुखकमले सीसीटिव्ही वा फोटोंत आली आहेत त्यांना पोलिसस्टेशन इतकी सुरक्षित जागा कोणतीच नाही त्यामुळे त्यांच्या वकिलांनी सरेंडर करा असा सल्ला दिलाय पण अशा धर्मप्रिय लोकांना सण तुरूंगात काढायचा नाहीये त्यामुले इद नंतर ते सरेंडर करणार आहेत असं वाचलं

बरखा दत्त ह्या बाई फक्त करिअर माईंडेड आहेत. त्यामुळे त्या फक्त पोलिटीकली करेक्टच बोलतात. त्यांचे बोलणे नेहमी एकाच दिशेचे असते.

गृहराज्यमंत्र्यांनी "मिसळपाव" या मराठी संकेतस्थळावरील "मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???" ही गहन, सडेतोड, रोखठोक चर्चा वाचुन, सदर धाग्यावरील हृदयाला हात घालणार्या प्रतिसादांची मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीने चर्चा करुन सदर धाग्याची लिंक मा.पंतप्रधान यांचेकडे पाठविली आहे. तस्मात आमचा दिल्लीचा वार्ताहर असे कळवतो आहे की........ पंतप्रधानांनी झाल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे. आणी यापुढील प्रत्येक देशव्यापी निर्णय मी मिपावरील चर्चा वाचुनच घेईन हे नमुद केले आहे. दोषींवर कठोर्/ कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. देशातील जनतेचे संरक्षण हे आमचे पहिले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले आहे.त्यासाठी प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येईल. देशातील जनतेने अफवांवर विश्वास ठेवु नये. याव्यतिरिक्त शेवटचा गुन्हेगार जो पर्यन्त गजाआड जात नाही तोपर्यन्त मी आमरण उपोषण करेन इति. रझा अकॅडमी चालक

म्यानमारी मुस्लिमांसाठी धर्मांधांनी अमर जवान फोडला बांग्लादेशी मुस्लिमांसाठी शिकले सवरलेले धर्मपरायण गळे काढत आहेत पाकमधले हिंदू विस्थापित होत आहेत पुण्यातल्य अन बंगलोरमधल्या ईशान्य भारतीय हिंदूना पळून जावे लागत आहे. विवेकाची भाषा कोणाला कळत नसेल तर पुरोगामित्वाचे कुंकू पुसून उघड्या बोडक्याने मैदानात यावेच लागेल

लाज वाटते काल पुण्यातून २००० इशान्य भारतीय पळून गेले. आज १००० पळून गेले. इतकी वर्षे त्याना चिंकी - चिंकी म्हणून आमच्याच लोकानी हिणवले. आज दीड दमडीचे भिकार मुस्लिम गुंड त्याना धमक्या देत आहेत. त्या ईशान्येतल्या हिंदूना जिवाची भिती वाटली आणी पुण्याचे तथाकथित देशभक्त इतक्या वर्षात त्यांच्या मनात रक्षणाचा विश्वास निर्माण करू शकले नाहीत. ६५ वर्ष झाली देश स्वतंत्र होउन. अजुनही दीड दमडीच्या भिकार गुंडामुळे भारतीय नागरीकांना स्थलांतर करावे लागते. मान खाली गेली. लाज वाटली स्वत:चीच राज ठाकरेंचे आंदोलन मिडियाने चघळ चघळ चावले. त्यात १० लोक सुद्धा विस्तापित झाले न्हवते. राजना फॅसिस्ट हिटलर वगैरे ठरवले... फिरररर उगला जहर .. बर ठीक आहे.. मग ह्या हजारो लोकाना विस्थापित करणार्‍या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ?

In reply to by राजघराणं

मग ह्या हजारो लोकाना विस्थापित करणार्‍या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ? धर्मनिरपेक्ष लोकांचा हिंदु दहशतवादाविरुद्ध लढा.

वरील प्रतिक्रियांचा सारांश असा आहे की - पुण्यातून हजारो चिंकींचे पलायन पुण्यातले सो कॉल्ड चिंकी - मिंकी जिव मुठीत धरून आसामात पळाले आहेत. रजा अकेडमी ने मुबईत पुकारलेल्या मोर्चानंतर दंगल झाली. पुढे दिवसाढवळ्या पुण्यात धमकीसत्र झाले. त्याचेच हे परिणाम. ही दंगल का झाली? मुस्लिमांचा मुंबईतला ह्रुदयसम्राट अबू आझमी म्हणतो की - म्यानमार नावच्या परदेशात झालेली दंगलीतली मुस्लिमांची हानी भारतीय मिडियाने दाखवली नाही ..... म्हणून ही दंगल झाली. शाब्बास रे मर्दा.... मुस्लिम मूलतत्ववाद्यांचा तद्दन खोटा प्रचार - म्यानमारचे अत्याचाराचे जे सपशेल खोटे फोटो सोशल मीडीयावरून दाखवले जातात ते तर नैसर्गिक आपत्तींचे फोटो आहेत.प्रेममय बौद्ध भिक्कूनी चीनच्या भूकंपात खूप सेवाभव दाखवला होता आणी भूकंपात मेलेल्या प्रेतांच्या राशिसमोर उभ्या असलेल्या सेवाभावी बौद्ध भिक्कूचे फोटोचा दुरुपयोग या धर्मांधांनी चालवला आहे. जणू याच भिक्कूनी मुस्लिमांची कत्तल केली अन मुस्लिमांच्या प्रेतांच्या राशीवर बौद्ध भिक्कू उभे आहेत- आणी हा फोटो म्यानमार मधल्या बौद्ध भिक्कूंचा आहे असा सगळाच तद्दन खोटा प्रचार अतिरेक्यांनी चालवला आहे. त्यांचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. हे मी म्हणत नाही. विचारजंत सुमार केतकरानेच त्याच्या दिव्य मराठीत १३ ऑगस्टच्या अग्रलेखात हे लिहिलेले आहे. जो एक स्वःताला पेटवुन घेतलेल्या तरुणाचा फोटो तर ....तिबेट्टीयन तरुणाने चीन राष्ट्राध्यक्षाच्या भारतभेटीच्या वेळचा फोटो आहे. त्या फोटोंचा आणी मुस्लिमांचा अक्षरशः काहीही संबंध नाही. समजुन न घेता अशिक्षित मुस्लिम भारताची सुरक्षा वेठिस धरत आहेत्.किंवा धर्मांध कावेबाज तसे घडवून आणत आहेत. पण प्रश्न असा आहे की कुठल्यातरी परदेशातल्या ,,, कुठल्यातरी तद्दन खोट्या फोटोंवरून इथे दंगल का? तीही एकट्या दुकट्याने न्हवे तर पन्नास हजार माथेफिरूंच्या जमावाने ? अजून एक खोटा फोटो - म्यानमारी सरकारने त्यांच्या देशातील निर्वासित रोहिंग्यों मुस्लिमाना परत बांग्लादेशात पाठवायला सुरुवात केल्यावर्, हात झटकले बांग्लादेश सरकारने; त्याना लगेच बोटीतुन बसवुन समुद्रात अल्लाच्या भरोश्यावर सोडुन दिले आहे. त्या बोटीत उपासमारी ने मरणार्‍या रोहिंग्यों मुस्लिमानाचे हात जोडलेले फोटो बघितल्यावर भडकणारे इस्लामचे बंदे तुम्ही ,त्या बोटी खुदाच्या भरोश्यावर सोडणार्‍या बांग्लादेशावर गरळ का ओकत नाही? त्यांना जर रमजान महिन्यात त्यांच्याच लोकाना उपाशी मारायला लाज वाटत नसेल तर इतरानी काय म्हणून सहिष्णू रहावे? आसाममधे तर स्थानिक बोडो लोकाना बांग्लादेशी मुस्लिम मारत असल्यावर ते तरी कसे गप्प बसतील? लोकसभेत गरळ ओकणार्‍या ओवेशीला निवडुन देणारे मुस्लिमच आहेत ना?आसामचा मुस्लिम खासदार दंगे करण्याची भाषा करतो त्याला निवडुन कोण देते? मग हिंदुंबद्दल बोलणार्‍या भाजप-शिवसेनेला निवडुन देण्यार्‍या देशी मतदारांवर तुमचा राग का? प्रथमपासून भारतीय असलेले नागरिक आणि बेकायदेशीरपणे घुसलेले बांगलादेशी नागरिक (उपरे) यांच्यातली तेढच आसाममधील अशांतता आणि त्यातून झालेली हिंसा यांच्या मुळाशी आहे. याला हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप कुणीही देता कामा नये. बिल्कुल देता कामा नये. आणी हाय रे दुर्दैवा !! मुस्लिमातले धर्मांध नेमके हेच करत आहेत. आणी भारतातले पुरोगमी विचारजंत; जणू काही घडलेच नाही अशा थाटात खाका खाजवत आहेत. पण......या घुसखोरांनी आसामी लोकांच्या नोकर्‍या पटकावणे, कांहींही नागरी हक्क नसताना दादागिरी करणे वगैरे गोष्टी करून तेढ निर्माण केलेली आहे. याच्या मुळाशी कॉंग्रेसच पक्षाचे १९४७ सालापासूनचे "गठ्ठा-मतपेटी"चे धोरण आहेच. अलीकडे या धोरणामुळे काँग्रेसला झालेला फायदा पाहून "हम किसीसे 'कॉम' नहीं" म्हणत ममता, लालू, मुलायम यांचे आणि असेच इतर पक्षही हे "गठ्ठा-मतपेट्यां"चे राजकारण करू लागले आहेत हे भारताचे दुर्दैवच. यावेळी मुलायम 'उत्तर प्रदेशा'त सत्तेवरही आले. देशाची पर्वा कुणाला आहे? मुस्लिमांच्या मतांवर सत्तेवर आलेल्या टोणग्या समाजवाद्यांनी भारतत्न डॉ बाबासाहेब अंबेडकरांचा, महाराष्ट्राचे छत्रपती शाहू महाराजांचा उघड अपमान केला. उत्तर प्रदेशातल्या जिल्ह्यांची नावे बदलायची नव समाजवादी मस्ती दाखवली. देशाची पर्वा कुणाला आहे? लादेन मारला गेल्यावर दु:खी होणारे लोक या देशात आहेत सद्दाम हुसेन ला फासावर लटकवल्यावर लखनौमधे निषेध मोर्चा काढणारेही आहेत बांगलादेशींना फटकवल्यावर आसू ढाळणारेही इथे आहेत या वृत्ती वेळीच नियंत्रणात आणायला हव्यात काश्मिरमधल्या भारतीयांवरच्या हिंसाचाराविरोधात रझा आकादामीने एक ब्र तरी काढला आहे का? निदान सच्चरचे नियम लावून इथल्या स्थानिक भारतीय मुस्लिमांचे भले करा म्हणून छोटासा तरी मोर्चा या नव रझाकरांनी काढला आहे का ? नसेल तर म्यानमारमधले मुस्लीम गेले तेल लावत, आणि आसाममधले सगळे गुंड हे बांगला देशातून घुसून पुन्हा तिथे अत्याचार करत आहेत म्हणून.... आणी म्हणूनच ... बोडोंनी त्यांना धुतले. तरीही घुसखोरांशी निष्ठा सांगायची असेल तर स्वत:ला भारतीयही म्हणवून घेऊ नये. सरळ चालते व्हावे माझ्या देशातून. आपली ओळख कोणती? निष्ठा कुठे आहेत? आणि हा चौदा ऑगस्टच्या पाकी स्वातंत्र्यदिनाच्या मस्तीचा जल्लोष आहे का? नेभळट्ट सरकार आणि माध्यमांनी स्वातंत्र्यदिनाला समोर ठेऊन रझा आकादमी आणि तिच्या समर्थकांना हे प्रश्न खडसावून विचारण्याची गरज आहे. देशाच्या ६५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या आसपास - कोणत्याही धार्मिक आधारावरचे पागलखाने सहन करण्याचा भारतीयांचा संयम आता संपलाय. देशाचा कायदा हातात घेण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही धार्मिक गटाला नाही.. अजिबात नाही.. हे बडग्यासहित सांगितले . ..शेपूट पिरगाळून सांगितले ... तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे यापुढे देशाच्या नेतृत्वाने शेपटी कुठेतरी आत घालून ...बुझगावण्यासारखे वागू नये एवढीच वाजवी अपेक्षा ...तुम्हीआम्ही ठेवू शकतो.... ज्याकडे आतातरी कान देऊन ऐकण्याची आणि कृती करण्याची धमक सरकारने दाखवावी. ह्या दंग्यामधे अमुक इतक्या महिला पोलिसांना विनयभंगासारख्या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असे वाचायला मिळाले. आता एक प्रश्न असा आहे की महिला पोलिस कशासाठी उपस्थित होत्या? मोर्चे, निदर्शने यात जर बायका उपस्थित असल्यास त्यांचा बंदोबस्त करायला महिला पोलिस असतात. आता ह्या रझाकरांच्या मूळ मोर्चामधे कुणी महिला दिसत नाहीत. निदान कुठल्या व्हिडियोत वा फोटोत तरी कुणी मुस्लिम महिला दिसत नाहीत. मग इतक्या मोठ्या संख्येने आमच्या महिला पोलिसांना आणायला कुणी सांगितले तुम्हाला? धार्मिक मुस्लिम मोर्चामधे मुस्लिम बायकांना स्थान नसते इतकी साधी उघड गोष्ट पोलिसांना ठाऊक नाही? नमाज पढायला मशिदितही मुस्लिम स्त्रियांना इस्लाम धर्मानुसारच प्रवेश नसतो. हे ही पोलिसांना माहित नाही ??? हा काय मूर्खपणा आहे का निष्काळजीपणा आहे? मुंबई पोलिस दलातील स्त्रियांना धर्माधांनी बदडले. काय अब्रू राहिली आमच्या पोलिस दलाची ??? लाज वाटली पाहिजे पोलिस कमिशनराना अन शेपूट पिर - गाळू नेत्याना! रजा अ‍ॅकेडमी चा ह्या मोर्च्यात पुढाकार होता. काहि वर्षापूर्वी भिवंडीत जगताप आणी गांगुर्डे नावाच्या दोन पोलिस शिपायाना दगडांनी ठेचून - ठेचून मारणारी हीच ती भिवंडीतली नीच धर्मांध रजा एकेडमी. मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्याना बांग्लादेशी घुस्खोरांच्या बाजूने दगडफेक करण्यास प्रव्रुत्त करणार्‍या रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ? सरकारपेक्षाही खरा कळवळा वाटतो तो हिंदूतल्या विचारी अन पुरोगामी महामानवांबद्दलच .. अरे पुरोगाम्या - बांगलादेशींचा फार कळवळा असेल तर तुमच्या घरातील २ खोल्या का देत नाहीस त्यांना... असा कुठला बर छळ या बांगलादेशी मुसलमानांचा - त्यांच्या देशात होतो म्हणून - त्यांना इकडे निर्वासित व्हावे लागते? हे तरी कळू द्या ना ? ते गरीबीमुळे इथे येत असतील तर ...त्या देशाचा धर्मांधपणा हेच गरीबीचे कारणमात्र आहे हे नागडे सत्य तरी जनतेला कळू द्यात. इथल्या (सर्वधर्मिय) नागरीकांना त्रास देणार्‍या बांगलादेशीं मुसलमानांना रेशनकार्डे देते हे कोंगी सरकार. आणि पाकिस्तानातून मुस्लिम धर्मांधाना घाबरून , बलात्कार, अपहरण आणी सक्तीच्या धर्मांतराला टरकून, जीव मुठीत धरून , भारतात पळून आलेल्या हिंदूना अटी आणि शर्ती ? व्हीसाची मुदत ? भारत सरकार हिंदूच्या बाबतीत आकसाने वागतेय असे वाटत नाही का? आझाद मैदानाच्या धर्तीवर ... त्या तिथे पाकिस्तानात - कराचीत् / इस्लामाबाद मधे हजारो अल्पसंख्यांक हिंदूनी मोर्चा काढून जाळपोळ केली अशी एखादी बातमी कोणी दाखवू शकेल काय? अन समजा तसे झालेच तर त्याचा परिणाम पाकिस्तानात काय होईल ? मी काही वर्षापासुन शिवसेना आणी हिंदुत्व सोडून कपाळावर पुरोगामी टिळा लवला आहे. हिदुत्ववाद्यात फक्त सनातनी हलकटांचा , प्रतिगामी अंद्धश्रद्धाळूंचा , जातीवादी उच्चवर्णीयांचा आणी संधीसाधू लबाड राजकारण्यांचा भरणा आहे असे लक्षात आल्यामुळे मी असे केले होते.. पण परवा टीव्हीवर दंगा बघितल्या नंतर मुंबईला शिवसेनेची किती गरज आहे हे लक्षात आले. आपण किती ही समजुतदार असलो तरी ज्यावेळी अशी हिंस्त्र दंगल आपल्या दाराशी येते तेव्हा शहाणपणा आपोआप फोल ठरतो.फाळणीच्या काळात घडलेल्या दंगलीत सापडलेल्या लोकाची हालात किती वाईट झाली असेल्? आणी अशा दंगली माझ्या घरात येईपर्यंत. पुरोगामित्वाचा टिळा लावून मानवतेच्या माळा जपत बसायला मी मतिमंद नाही. म्यानमारी मुस्लिमांसाठी धर्मांधांनी भारतातले अमर जवान चे स्मारक फोडले बांग्लादेशी मुस्लिमांसाठी शिकले सवरलेले धर्मपरायण मुसलमान मंत्री (दलवाई) टीव्हीवर गळे काढत आहेत पाकमधले हिंदू विस्थापित होत आहेत पुण्यातल्या अन बंगलोरमधल्या ईशान्य भारतीय हिंदूना (चिंकीना) पळून जावे लागत आहे. पकिस्तानातही धर्मांधाना घाबरून हिंदूनीच पलायन करायच... आणी भारतात पण ... काय म्हणून ? शांतीची - विवेकाची भाषा कोणाला कळत नसेल तर पुरोगामित्वाचे कुंकू पुसून उघड्या बोडक्याने मैदानात उतरावेच लागेल. आज मात्र मला लाज वाटते आहे. काल पुण्यातून २००० इशान्य भारतीय पळून गेले. आज १००० पळून गेले. इतकी वर्षे त्याना चिंकी - चिंकी म्हणून आमच्याच लोकानी हिणवले. जातीपातीचा आणी चेहेरेपट्टीचा उल्लेख करत आपणच त्याना एलियन ठरवले. आज पी ए इनामदारच्या कॉलेजातले - दीड दमडीचे भिकार मुस्लिम गुंड त्याना धमक्या देत आहेत. त्या ईशान्येतल्या हिंदूना जिवाची भिती वाटली आणी पुण्याचे तथाकथित सदाशिवपेठी भट देशभक्त इतक्या वर्षात त्यांच्या मनात रक्षणाचा साधा विश्वास निर्माण करू शकले नाहीत. ब्रिगेडी मावळे अन पुरोगामी कावळे देखिल त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकले नाहीत हेही सत्यच. मनसेच्या स्थनिकीय अतिरेकामुळे तुटातुटीला बळ मिळाले हे कोण नाकरेल ? ६५ वर्ष झाली देश स्वतंत्र होउन. अजुनही दीड दमडीच्या भिकार गुंडामुळे भारतीय नागरीकांना आपल्याच देशात स्थलांतर करावे लागते. मान खाली गेली. लाज वाटली स्वत:चीच राज ठाकरेंचे आंदोलन मिडियाने चघळ चघळ चावले. त्यात १० लोक सुद्धा प्रत्यक्षात विस्थापित झाले नसतील. राजना फॅसिस्ट हिटलर वगैरे ठरवले... फिरररर उगला जहर ..राजच आंदोलन राजकीय फायद्यासाठी होतं. बर ठीक आहे.. मग ह्या हजारो निरपराध चींकी लोकाना विस्थापित करून पुण्याबाहेर ढकलणार्‍या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ? धर्मनिरपेक्ष लोकांचा हिंदु दहशतवादाविरुद्ध लढा ??????????????????? आणी खरा प्रश्न असा आहे की चींकीं हिंदूं नंतर कोण - कोण हिंदू , कुठून - कुठून , कुठे- कुठे , कसे - कसे पळणार आहेत ? पुढचा नंबर कोणाचा ?? छे - छे - छे - छे हे महत्वाचे नाहिच - आपली तथाकथित जात,आपला तथाकथित इतिहास , आपली संस्क्रुती , भाषा, आमची राजकीय महत्वाकांक्षा ; पैसे मिळवणाच्या संधी हेच खरे महत्वाचे विषय आहेत. नाही का ?

In reply to by राजघराणं

अरे आपल्या देशात उद्या दुष्काळ पडला तर याच सरकारचे अन्न खाणार ना! का देणारेत का ते बांग्लादेशी ,पाकीस्तानी,, सौदीतले मुसलमान.

परत एकदा.काय ते समजुन घ्या.

http://www.youtube.com/watch?v=VnmNMEvTb7I ह्या दंगली चालू असताना काही पोलिस (ज्यात हे दुर्भागी डीसीपीही होते), आपल्या परीने गुंडाना पकडायचा प्रयत्न करत होते. पण ह्या चित्रफितीत दिसते की खुद्द कमिशनर त्या डीसीपीवर गुरकावले आणि त्याने पकडलेल्या गुंडाला सोडून द्यायचा आदेश दिला. जर परत असा वागलास तर सस्पेण्ड करीन अशी उर्मट धमकीही दिली. मी कमिशनर आहे आणि मी सांगेन तसेच झाले पाहिजे असा दम दिला. योग्य जागी अधिकार दाखवणे ठीक पण इथे त्याचे प्रयोजन काय? पोलिसांना त्यांच्या लायनीपरमाने जाऊ न देण्यामागे काय कारण ? वरुन प्रेशर आले होते का पटनाईकांना दंगलीची भीती होती? इतकी भीती होती तर ह्या मोर्चाला परवानगी का दिली? एकदा परवानगी दिली की कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. मग संयम वगैरे गप्पा फालतू वाटतात.

फेसबूक, सोशल मिडियावरून पुन्हा धुमाकूळ चालू आहे. ईट का जवाब पत्थर से. घेता मिटवून की देवू पेटवून अशी हिंदू दमबाजी चालू झालेली आहे. धार्मिक दंगलीतून काहिच साध्य होत नाही. उद्याचा मोर्चा शांततेत पार पडायला हवा. तोडफोड , दगडफेक, हाणामारी आणी जाळापोळ न करताही विरोध करता येतोच.

In reply to by राजघराणं

उद्या राज ठाकरे कसा आक्रमक पवित्रा घेतात ते पहायचे आहे ! आर ठाकरेंसाठी ही मोठी संधी आहे,त्याचा ते कसा उपयोग करतात ते कळेलच उद्या.

In reply to by राजघराणं

तोडफोड , दगडफेक, हाणामारी आणी जाळापोळ न करताही विरोध करता येतोच. अगंबै ! खरं की काय ?

In reply to by राजघराणं

शिवसेना आता कायम राज च्या दोन स्टेप मागेच राहाणार असं दिसतय.... पण "ईट का जवाब पत्थरसे" ची ताकत अजुन राज मध्ये आलेली नाहिए. त्याला सेनाच पाहिजे. अर्धवटराव

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15578973.cms उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी आझाद मैदानात झालेल्या मुस्लिम लोकांनी घडवून आणलेल्या दंगलींविरुध्द आणि ती आटोक्यात न आणणार्‍या पोलिस व गृहखात्याविरुद्ध जोरदार टीका केली तर ह्याचा अर्थ आता ह्या दोघांत साटेलोटे आहे वगैरे. म्हणजे मूळ मुद्याकडे दुर्लक्ष. आता कुठलाही विरोधी पक्ष ह्या सरकारी षंढ, निष्क्रियपणावर तुटून पडेलच. खरे तर काँग्रेस व राष्ट्रवादीतील लोकांनीही ह्या घटनेचा निषेध करायला हवा होता. कडक कारवाई करुन दाखवायला हवी होती. पण ते होत नाही. गुजराथेतील खर्‍या खोट्या दंगली, अण्णा हजारे, त्यांची टीम, मग त्यातल्या किरण बेदीने जास्त हवाई भाडे घेतले का? घेतल्यास तो किती मोठा गुन्हा? वगैरे बाबतीत चर्चांचे गुर्‍हाळ अनेक महिने चालू ठेवणारी चॅनेल्स ह्या बाबतीत अळीमिळीगुपचिळीचे धोरण स्वीकारतात की काय असे वाटते. तुलनेने अगदीच थोडे कार्यक्रम दिसले ज्यात ह्या घटनेवर चर्चा झाली. सरकारचे प्रतिनिधी, आमदार, मंत्री वगैरे कुणाला त्यांची बाजू मांडायला बोलावले नाही. एकाच कार्यक्रमात आबा पाटील येऊन (तेही फोनवर) थोडावेळ जुजबी बोलून त्यांनी फोन कट केला. हे काय जाणून बुजून हा प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रकार आहे का? कदाचित असे कव्हरेज कमी ठेवण्याकरता वरुन प्रेशर येत असावे. बघू राजसाहेबांच्या मोर्चातून काय निष्पन्न होते ते.

मोर्चा शांततेत पार पडला. हुश्श. बर झाल. राज ठाकरेंच भाषण मुद्दे आणी वक्तृत्व केवळ बिनतोड. राज नी शिवसेनेला धोबिपछाड तर मारलीच. पण बराच राजकीय फायदा मिळवला... तेही कुठेही धार्मिक भावनेला हात न घालता. लई भारी.

राज यांची मागणी अर्धी मान्य झाली तरी मूळ मुद्दा शिल्लक राहतोच. कायद्याच्या रक्षकांचे हात बांधलेले असतील तर दहशतवादाचा सामना कसा करणार ?