Skip to main content

गोल्डफिश आणि गेस्टाल्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 10/08/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काल या लेखावर गविचा एक सुरेख प्रतिसाद आहे
स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे. आपणही गोल्डफिश आहोत आणि आपल्याला जे भासतं (काळ म्हणा किंवा स्पेस म्हणा किंवा आणि काही मसण म्हणा) ते आपल्याला भासतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जरी गोल्डफिशने हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये..
गोल्डफिश प्रतिसाद अत्यंत प्रातिनिधिक आहे त्या अनुषंगानं `गेस्टाल्ट' काय चीज आहे ते विशद करणारा हा लेख ________________________ पहिली गोष्ट, "आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही. तिथेच आलेल्या निरंजनच्या प्रतिसादातून त्या मान्यतेच नेमकं कारण व्यक्त होतं :
आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे.
प्रश्न आयुष्य क्षणभंगुर आहे किंवा ते इन्व्हॉल्व्ह होऊन जगण्याचा नाहीये, त्यातली सुख-दु:ख, ताण-तणाव वगळून जगण्याचाय! तिथे गविला प्रतिसाद देताना संदीप खरेच्या या अप्रतिम काव्यपंक्ती उधृत केल्यात : मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो ही चौकट लंघून पार निघण्याचं रहस्य एका साध्याशा गोष्टीत लपलंय ती म्हणजे गेस्टाल्ट बदलणं! _______________________ "गेस्टाल्ट" हा गुर्जीएफचा आवडता शब्द! गेस्टाल्टला मराठी प्रतिशब्द नाही; त्याचा अर्थ "दृष्टीचं रूपांतरण" असाये. दृष्टीचं रूपांतरण म्हणजे दृष्टीकोन बदलणं नाही, दृष्टीकोन बदलणं तिच गोष्ट नव्या अ‍ॅंगलनं पाहणंय , तिची अधिक माहिती मिळवणंय, त्यानं ज्ञान वाढेल पण सत्य गवसणार नाही. गेस्टाल्ट चेंज म्हणजे ज्या नजरेनं आपण आतापर्यंत आकार पाहात होतो त्या नजरेनं निराकार पाहणं किंवा जी नजर सदैव समोर रोखलेली होती तिचा रोख वळवून स्वत:ला पाहणंय, जस्ट अ हंड्रेड अ‍ॅंड एटी डिग्री टर्न ऑफ द गेझ! बुद्ध " बात तो आखोंके सामने थी और मैं कहाँ कहाँ ढूंढता फिरा" म्हणतो आणि आपल्याला समोर बघून निराकार दिसत नाही याचं कारण गेस्टाल्ट आहे; दृष्टीला सतत आकार बघण्याची सवय झाल्यामुळे निराकार दिसत नाही. फोटोतलं काचपात्र देह आहे, गोल्डफिश `आपण व्यक्ती आहोत आणि काचपात्रात बंद आहोत' ही आपली धारणाये आणि सतत शरीरातून बाहेरचं जग पाहात असल्यानं ते डिस्टॉर्टेड वाटतय. ही बद्धता `मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी ' असं वाटायला लावतेय आणि `मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो ' असं म्हणायला लावतेय. `तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी' हे आपलं निराकार स्वरुप आहे आणि ज्या क्षणी या धरणेतून आपण मुक्त होतो त्या क्षणी `तो लंघून चौकट पार निघाया बघणारा' बंदी स्वछंद होतो! _______________________ गेस्टाल्ट बदलणं सोपयं: प्रथम ओशो काय म्हणतात ते बघू : ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणार्‍याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुसती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल, तुमच्या आणि वस्तुच्यामधलं "अंतर" जाणवायला लागेल, तुमचे विचार थांबतील, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नजरेला असं बघायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण नुसत्या गेस्टाल्ट चेंजनी मनावरचं दडपण जाऊन हलकं वाटायला लागेल. फक्त ती वस्तू न जाणवता तुमच्या शरीराच्या भोवतालची जागा सुद्धा जाणवू लागेल, हा निराकाराचा बोध आहे. कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे बघा ( ओशोंचे बघा) ते स्थिर दिसतात, ही स्थिरता नजरेचा गेस्टाल्ट बदलल्यामुळे आलेली आहे... ती नजर एकाच वेळी आकार आणि निराकार दोन्ही पाहातेय. नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाचे डोळे कधी पाहिलेत? ते अनाहूतपणे निराकाराशी संपर्क ठेवून असतात, आपण म्हणतो मुलाची नजर अजून स्थिर झाली नाही. हळूहळू मुलाला फोकसिंग शिकवलं जातं (आणि कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी ते अनिवार्यपणे करायला लागतं), मग त्याचा निराकाराशी संपर्क तुटतो. __________________________ गेस्टाल्ट बदलल्यामुळे जीवनात अनेक परिवर्तनं घडून येतातः कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं, सगळा रियाज फक्त या एका गोष्टीसाठी चालू असतो, बाकी कौशल्य, स्वतःची स्टाइल वगैरे नंतर येतं. गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला आपण शरीरापासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, शरीरात एक हलकेपणा जाणवू लागेल. तुम्ही जीवनाकडे आणि कोणत्याही प्रश्नाकडे त्याच्या समग्रतेनं बघू लागाल, निष्कारण डिटेल्समध्ये शिरणं आणि गुंतून पडणं कमी होईल. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल, एखादी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत कळू लागेल. आकारात अडकलोय असं वाटल्यानं निराकाराची सुटका दिसत नाही, ती कळू लागेल, "आता सर्व पर्याय संपले" असं वाटत असताना अचानक नवा पर्याय उपलब्द्ध होइल. ______________________________ सारखे आकार बघायची सवय आणि नजरेनं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संवेदना ग्रहण असल्यानं सर्वात जास्त ताण आपल्या डोळ्यांवर आहे (पण आता त्याची इतकी सवय झाली आहे की तो जाणवत नाही); गेस्टाल्ट बदलल्यानं तुमच्या नजरेवरचा आणि पर्यायानी मनावरचा ताण कमी व्हायला लागेल. एकदा तुमचा नजरेचा गेस्टाल्ट बदलला की इतर संवेदनांचे गेस्टाल्ट पण बदलू लागतील, एकण्याचा गेस्टाल्ट हळूहळू बदलायला लागेल; आवाजा बरोबर तुम्हाला शांतता देखील ऐकू यायला लागेल. गाण्याचा किंवा वादनाचा सगळा रियाज कलाकाराला शांतता ऐकू आली नाही तर व्यर्थ होतो; कारण प्रत्येकाचा आवाज जरी वेगळा असला तरी ज्या पडद्यावर सूर उमटातायत ती शांतता एक आहे आणि जो पर्यंत शांततेचा फिल येत नाही तो पर्यंत स्वराला गोडवा नाही; मजा म्हणजे तुम्हाला स्वतःचा आवज गोड वाटायला लागेल! "स्पर्शाचा गेस्टाल्ट बदलणं" अध्यात्मातलं बहुदा सर्वात महत्त्वाचं परिमाण आहे. तुम्ही संवेदनेकडून ज्याला संवेदना होते आहे त्याच्याकडे (म्हणजे स्वतःकडे) वळता. तुम्हाला कळतं की भोग जरी कोणताही असला तरी भोगणारा एकच आहे आणि तो एकदा स्थिर झाला की सगळे भोग सारखे आहेत. ज्ञानी संभोगाचं सुख उपभोगतो असं म्हणतात पण ते तसं नाहीये, त्याला सगळे भोग सारखा आनंद देऊ लागतात, ते `सम' होतात कारण त्याचा गेस्टाल्ट बदललेला असतो. ______________________ `स्वस्मरण' हा गुर्जीएफचा दुसरा आवडता शब्द! ज्या क्षणी तुम्हाला दु:ख, निराशा, ताण-तणाव घेरेल, तुमचा मूड जाईल त्या क्षणी स्वतःला सावरा कारण आपण गोल्डफिश आहोत असं तुम्हाला पुन्हा वाटायला लागलय इतकाच त्याचा अर्थये. समग्रतेनं फक्त समोर पाहा, तुमचा गेस्टाल्ट बदलेल, तुम्ही काचपात्रातून बाहेर पडलेले असाल!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30894
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

मग गोल्डफिशला (तुमच्या व्यक्तीमत्त्वाला) काय निखार येतो ते पाहा.
-- इतर जैवसृष्टी नात्याशिवाय जगतेय कि निर्वीवादपणे नाते स्विकारते म्हणुन जगते? मधमाश्या एकाच राणि करता काम करतात. वाघीण आपल्या पिल्लांच्या जवळपास कोणाला फटकु देत नाहि. प्राण्यांचा "सिंबोयसीस" तर प्रचंड अनुकरणीय आहे. जीवन साखळीत प्रत्येक कडी स्वतंत्रपणे काम करु शकते कारण ति इतर कड्यांशी घट्ट जोडली आहे... मानव आपल्या कुठल्या कड्यांना किती महत्व देतो हाच काय तो फरक. पण नाते संबंधाशिवाय सृष्टीचक्र अशक्य आहे
नातं माणसाची कल्पना आहे ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे `नातेसंबंधाशिवाय सृष्टीचक्र अशक्य आहे ' हे तर्कविसंगत आहे. लग्न नाही केलं तरी जोडप्याला मूल होईल. त्याचं पुढे काय होईल हा विचार सोडा. अस्तित्वात सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे पण तो नातेसंबंध नाही. ते जाणीवेचं काम आहे.
जाणीव हा अस्तित्वाच्या एकसंधतेचा कॉमन फॅक्टर आहे. एकदम पटेश.
मग तेच तर पहिल्यापासनं सांगतोय.
जाणीव हे सर्वात प्रगल्भ नातं नसावं काय? आणि जाणीव जर सर्वत्र सारखी आहे तर दगडात निद्रीस्त आणि मनुष्यात प्रगल्भ कशी? असला कुठला फॅक्टर आहे जो जाणिवेच्या अथोरिटीला चॅलेंज करतो? एकवेळ मनुष्य आपल्या विचारशक्तीच्या जोरावर जाणिवेचं एकसंघत्व जाणुन तरी घेईल... दगडाला तर ऑप्शनच नाहि...
म्हणून तर माणसाचा जन्म सत्य समजण्यासाठी अनिवार्य मानलाय. देवाची मूर्ती दगडाची असते हे प्रतिकात्मक आहे. दगड जाणीवेला जाणू शकत नाही पण माणूस दगडात जाणीव आहे हे जाणू शकतो.
>>सगळं सिनेमासारखं वाटतं त्यामुळे मजा येते. -- हि मजा तर तात्पुरती असेल... मग वारंवार एका नंतर एक शो बघणं आलं... सिनेमातील पात्रांशी /कथेशी इन्व्होल्व होणं काय किंवा त्याची दुरुन मजा बघणं काय, सिनेमाची चटक तर लागलीच... माणुस त्यात अडकलाच.
जीवन हा सर्वात मोठा सिनेमा आहे. त्यात एकसोएक पात्र आणि एकसोएक प्रसंग आहेत. त्याचं स्क्रिप्ट कुणीही लिहिलेलं नाही. तरीही स्मृतीतनं बघणं सोडलं तर आजवर एकही प्रसंग पुन्हा कधीही रिपीट झालेला नाही . तुम्ही स्वतःला सिनेमातलं पात्र समजलात तर अडकलात कारण तुम्ही पुन्हा गोल्डफिश झालेले असता. गेस्टाल्ट बदललेला प्रेक्षक व्हा मग गोल्डफिशला (तुमच्या व्यक्तीमत्त्वाला) काय निखार येतो ते पाहा. साला, सॉलिड मजा येते!

In reply to by संजय क्षीरसागर

जोडप्याला मुल होणं हे सिनेमा बघितल्यासारखं "ओब्सेर्व्हींग टॉवर" वर बसुन बघितलं तर त्यात जीवंतपणा जाणवत नाहि... क्षणभर तशी कल्पना केली तरी एकदम नीरस वाटायला लागतं... श्वास कोंडल्यासारखं. त्यापेक्षा एका पिढीतुन दुसरी पिढी प्रसवतेय व आपण त्यातला एक भाग आहोत या जाणिवेने चैतन्याची फीलींग येते. इथे गेस्टाल्ट कसा चेंज करायचा? आज मी मनुष्यजन्मात आहे. दगडापासुन माणुस बनायला मी गेस्टाल्ट बदलत प्रयत्न केलेत का? कि मनुष्यजन्म जस्ट एक लकी ड्रॉ निघाला? तसं असेल तर ह सिनेमा संपल्याबरोबर परत दगड व्हायचे चान्सेस आहेत. अलिखीत स्क्रीप्ट, अनोळखी पात्र, अनकंट्रोल्ड प्रसंग... असा सिनेमा बघायची कल्पना देखील भयावह वाटते. लाईफमध्ये मजा येण्यासाठी हि फार विचीत्र प्रिकंडीशन झाली. जर स्वरुपात स्थीर व्हायचय तर या सिनेमाच्या धुंदीची काय गरज? स्वरुप सेल्फ सफीशीयंट नसावं काय? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आहो, स्वरुप तर साला आपण ऑलरेडी आहोतच, त्यात कसली आलीये भीती? आणि गोल्डफिश ही निव्वळ मान्यता आहे ती सोडण्यात काय ते साहस? एक साधी गोष्ट पाहा : कालपर्यंत जी बायको वाटत होती ती आज `परस्त्री' झाली तर रिलेशनची काय मजा येईल? सगळं ओझंच गेलं. प्रत्येक वेळी ती नवी वाटते कारण तुम्ही तिला स्मृतीतून पहात नाही. सगळा नजरीयाच बदलतो जीवनाकडे पाहायचा. आपण नातेसंबंधांच्या गुंत्यातनं मुक्त होऊन सहप्रवासी होतो. आयुष्य सहलीला आल्यासारखं होतं.

In reply to by संजय क्षीरसागर

कालपर्यंत जी बायको वाटत होती ती आज `परस्त्री' झाली तर रिलेशनची काय मजा येईल? सगळं ओझंच गेलं. प्रत्येक वेळी ती नवी वाटते कारण तुम्ही तिला स्मृतीतून पहात नाही.
_/!\_ बास्स! आता ह्या नंतर काही समजावयाची गरज नाही असे मला वाटते. हे उदाहरण ही जर समजणार नसेल तर मग काहीही समजावून सांगणे व्यर्थ आहे. - ('बायको एक परस्त्री आहे', हा एक्स्पेरीमेंट करून बघितलेला) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

>>कालपर्यंत जी बायको वाटत होती ती आज `परस्त्री' झाली तर रिलेशनची काय मजा येईल? -- मला अजीबात मजा येणार नाहि. हा केवळ उदाहरणाचा प्रतिवाद नाहि. पण "पर"स्त्री सोबत मजेची कल्पनाच करवत नाहि. हा नैतिकतेचा मुद्दा नाहि. "बायको" नावाच्या नात्याची गुंफण हे बंधन नसुन ति "पुरुष" व्यक्तीत्वाची सांगता आहे. परस्त्रीशी संबंध ठेवताना आप-पर भाव लोप होण्याची शक्यताच नाहि. मला बायको प्रत्येकवेळी नवी वाटायचीच भिती वाटते... कारण हे नाविन्य नजाणतेपणातुन्/अज्ञानातुन आलय. त्याबद्दल भिती असेल, उत्सुतका असेल, गाजरची पुंगी वाजली तर वाजली नाहि तर मोडुन खाऊन टाकली हा बेफिकर भाव असेल, काहि वेळाने कंटाळा तर निश्चित असेल... नसणार ते फक्त रिलॅक्सेशन. मुळात नातेसंबंधाचा गुंता का वाटावा हेच कळत नाहि... नेमक्या कुठल्या ओझ्याचं टेन्शन नाहिसं होणार आहे? आयुष्य सहलीला जाण्यासारखं निरर्थक करण्यात काय सुख आहे? जीवनाशी हातात हात घालुन चालण्याऐवजी "टाईम प्लीझ" ची इच्छा का करावी ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मुळात नातेसंबंधाचा गुंता का वाटावा हेच कळत नाहि... नेमक्या कुठल्या ओझ्याचं टेन्शन नाहिसं होणार आहे?> हाच प्रश्न मलादेखिल पडतो. आयुष्य ओझे नाही. कशालाही खोटं/स्वप्न/ सिनेमा कशासाठी म्हणायचे? मला अत्ता या क्षणी प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, त्यामुळे प्रत्येक जाणवणारी गोष्ट माझ्यासाठी खरीच आहे. माझी आई माझ्यासाठी आईच आहे. तिच्याकडे तरी परक्यासारखे कसे काय बघणार? त्यासाठी मेजर स्म्रुतिभ्रंश करुन घ्यावा लागेल. तरीही तिचा स्पर्श झाल्यावर तिला 'आई' म्हणून ओळखण्याची शक्यताच जास्त, कारण माझ्या जाणिवेत माझ्या स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणिवेच्या आधीच, तिच्या स्पर्शाची नोंद झाली आहे. ते नाते मी 'मान्यता' कसे काय म्हणू? दुसरी गोष्ट म्हणजे, आत्ता माझ्यावर कुणी हल्ला केला तर माझे अस्तित्व टिकवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. त्यात काही दुखले, तर मी एकवेळ वाक्यरचना अशी करेन, की माझे शरीर दुखतंय. पण जे काही दु:ख आहे ते त्या शरीरतल्या मला दिसणारच. आणि खरे रक्त येउन, खरी औशधे घ्यवी लागणार. आश्या वेळेस ते 'स्वप्नवत' म्हणणे म्हणजे स्वत:ला फसवणे झाले. शिवाय मी माझे अस्तित्व टिकवायचा प्रयत्न करते म्हणजेच 'माझी' इच्छा आहे की 'मी'( म्हणजे आतली एक मी+ शरीर) हे शिल्लक रहावे. अर्थातच माझी ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्याचा अर्थ माझ्या एकंदरीत आयुष्याची आणि माझ्यासोबत घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची , त्याच्याशी निगडीत माणसांशी असलेल्या नात्याची, आणि त्यायोगे निर्माण होणार्‍या भावनांची जबाबदारी देखिल माझीच आहे. (माझ्यापुरते सांगायचे तर मी स्वप्न सुद्धा 'खोटी' मानत नाही. कारण झोपेत का होईना, तो माझ्यापुरता माझाच अनुभव आहे. आणि त्या वेळेसच्या जाणिवेत मी तो पूर्णपणे घेतला आहे.) मग प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी जश्या आहेत तश्या स्विकारल्या, आपलेपणानी स्विकारल्या, तर आयुष्य जास्त चांगले जाईल, असे मला वाटते. शिवाय प्रत्येक गोष्ट पंचमहाभूतांपासून बनलेली आहे, तेंव्हा विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत काहितरी 'नाते' आहेच. त्यामुळे प्रत्येक गोष्ट्च 'व्यापक अर्थानी 'आपलीच' आहे. परकेपणा रहिला कुठे? उगीच हे खोटे, ते खोटे, मी वेगळी , शरीर वेगळे असे म्हणण्यापेक्षा, सगळे स्विकारावे आणि जे काही समोर होईल त्याला प्रामाणिकपणे , संपूर्णपणे तोंड देणे मला सोपे वाटते.

सर्व प्रतिसादांबद्दल एकच धन्यवाद! आणि मधल्या एका प्रतिसादाबद्दल हा शेर : बहोत उंची है ये शराब, हुजूर जरा आहिस्ता पिजे लफ्जोंसे पिला रहे हम, जरा आदाब तो सिखिए

जे सांगायला मला इतका आटापिटा करावा लागला ते त्यानं किती सहज मांडलय: मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो मी डाव रडीचा खात जिंकतो अंती तो मुक्त मोकळ्या स्वच्छ मनाने हरतो मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार लपतोन परि चेहरा आत भेसूर तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही त्या शाम निळ्याच्या मोरपिसा परि झुलतो मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो संदीप जिओ!

In reply to by संजय क्षीरसागर

रणछोडदास चांचड सारखी वाटतात... पण त्याचा फंडा मनाचा गेस्टाल्ट बदलण्याचा ("जे आवडेल ते करा") आहे, जाणिवेचा नाहि... त्यात आणखी काहि अ‍ॅडीशन हवी काय ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बहेती हवासा था वो, उडती पतंगसा था वो कहां गया उसे ढूंडो हमको तो राहेंही चलाती वो खुद अपनी राह बनाता मस्तीमे चलता, गिरता सम्हलता था वो हमको कलकी फिक्र सताती वो बस आजका जश्न मनाता हर लम्हेको खुलके जीता था वो कहांसे आया था वो छुके हमारे दिलको कहां गया उसे ढूंडो हा स्वानंद किरकिरे एक अजब रसायन आहे. काय नजरीया आणि काय अंदाज आहे! कुर्बान!
पण त्याचा फंडा मनाचा गेस्टाल्ट बदलण्याचा ("जे आवडेल ते करा") आहे, जाणिवेचा नाहि... त्यात आणखी काहि अ‍ॅडीशन हवी काय ?
तुम्ही हा लेख जतन करा. प्रतिसादांची उत्तरं पुन्हापुन्हा वाचा. अचानक तुम्हाला कळेल. आपण कायकाय विचार करत होतो आणि किती गुंता करत होतो आयचा घो, आय वॉज द रांचो मायसेल्फ!

In reply to by संजय क्षीरसागर

>>तुम्ही हा लेख जतन करा. प्रतिसादांची उत्तरं पुन्हापुन्हा वाचा. अचानक तुम्हाला कळेल. -- होय. जी काहि चर्चा झाली त्याचं शांतपणे सिंहावलोकन अवश्य करेल. माझा प्रॉब्लेम असा झालाय कि तुम्ही म्हणता तो लाईट मूड, आयुष्य इझी वाटणं, अजीबात ताणतणाव नसणं या गोष्टी मला बाय डिफॉल्ट झाल्यात. मला मी शरीरापासुन्/मनापासुन वेगळा आहे असं अजीबात न वाटता शरीर, मन हे माझंच एक्सटेन्शन आहे असं वाटतं. जा जगताचा पसारा एक स्वप्नवत सिनेमा न वाटता माझ्या कर्मांची, इच्छेची मीच रचलेली कहाणी वाटतात. त्याकडे त्रयस्थपणाने बघतो म्हटलं तर कुठे उभं राहुन हा पसारा पहावा हेच समजेनासं होतय. मला कळत नाहि कि हि तुम्ही म्हणता तशी आत्मसाक्षाकारोत्तर अवस्था आहे कि अजुन काहि भलताच प्रकार झालाय... म्हणुन इतके प्रश्न विचारले. या सर्व चर्चेचं शांतपणे मनन करेल. धन्यवाद. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

- भगवद्वीता २.५५ - २.७२ (स्थितप्रज्ञ/ ज्ञानमार्गियाची) - भगवद्वीता १२.१२ - १२.२० (ज्ञानी भक्ताची/ योगमार्गियाची) (दोन्ही जवळजवळ सारखीच आहेत.)

In reply to by संजय क्षीरसागर

उपनिषदांमध्ये हेच तर सांगितलंयः "द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते | तयोरन्यः पिप्पलः स्वादवत्य- नश्ननन्यो अभिचाकशीति||"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जय जय रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी! (नॉर्मल) जय जय रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी! (उंच स्वरात) जय जय रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी!( नोर्मल) ..तर मंडळी, पुढे हनुमान थेट लंकेतून उड्डाण करुन मिपावर पोचला... आणि बघतो तर काय???? हाऽऽऽऽऽ दन्गा सुरु!!!! :)

In reply to by संजय क्षीरसागर

बास्स! आता ह्या नंतर काही समजावयाची गरज नाही असे मला वाटते. हे उदाहरण ही जर समजणार नसेल तर मग काहीही समजावून सांगणे व्यर्थ आहे.
धन्यवाद!

=))))))) गाढवाला मजा आली तर आम्हालापण आली.