एट बिलो - एक सुंदर अनुभव
लेखनप्रकार
गद्यातलं हे माझं पहिलं (आणि आवडलं नाही तर एकमेव ) लिखाण आहे.
साधारण वर्षभरापूर्वी नॅशनल वर मदर इंडिया चालू होता. कदाचित १५ ऑगस्ट असावा. बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...
सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.
पथकातल्या एकाला एक कल्पना सुचते. मोहीमेसाठी कुत्र्यांची गाडी आणलेली असते. मोहीमेत वापरली जाणारी ही कुत्री हुषार असतात. कुत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येतं आणि त्यांच्या सहाय्याने नायकाला घळईतून बाहेर काढण्यात यश येतं. तो बराच जखमी असतो आणि पाय जायबंदी झालेला असतो. लवकर मेडिकल हेल्प मिळाली नाही तर गॅंगरीन होऊन पाय कापावा लागण्याचा धोका असतोच.
युद्धपातळीवर एका हेलिकॊप्टरचा बंदोबस्त करून पेशंटला न्यायचं ठरतं. कुत्र्यांचा नायकावर आणि मिहीमेतल्या सदस्यांवर खूप जीव असतो. ते ही मागे लागतात. मोजक्याच जागेमुळं ते कुत्र्यांना बांधून ठेवतात आणि आम्ही लगेच येतो असं त्या कुत्र्यांना सांगून अमेरिकेकडे उड्डाण करतात.
नायकाचा पाय बरा होतो. तीन दिवस झालेले असतात. त्याला तिकडं कुत्र्यांच काय झालं असेल या कल्पनेनं अस्वस्थ वाटायला लागतं. त्याच्या भावनेची तीव्रता कुणाकडेच नसल्याने खास कुत्र्यांसाठी पुन्हा जावं असं कुणालाच वाटत नसतं. एकतर मोहीम आटोपलेली असल्याने आता पुन्हा जाणं म्हणजे सगळी जमवाजमव करणे,पैशांचा बंदोबस्त करणे हे सगळं आलंच.. हे सोपं नसतं
इकडं हवामान खराब होत चाललेलं असतं. कुत्र्यांना बांधून ठेवलेलं. हिमवादळं सुरू झालेली असतात......
पुढं काय होतं हे सांगत नाही. हा सिनेमा प्रत्येकाने पहावा इतका सुंदर आहे...!
त्या कुत्र्यांच काय होतं हाच सिनेमाचा विषय आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या नात्यावर केलेली एखादी सुंदर कविताच असावी असा हा सिनेमा आहे..
कुत्र्यांनी दाखवलेली माणुसकी आणि माणसाची बेपर्वाई, संकटात त्यांच एकमेकांवरचं प्रेम... !!! कसलेल्या अभिनेत्यांना मागं टाकतील असा त्या कुत्र्यांचा अभिनय... सगळंच अद्भुत !!
- संध्या
--------------------------------------------------------------------------
या सिनेमाच्या नेटवरील लिंक्स.
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
http://www.youtube.com/watch?v=OSwlozB-zyE&feature=player_embedded
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
पुढे काय हे टीव्हीवर पहा. माझाही अधून मधून काही भाग राहीला बघायचा..... झी स्टुडिओ वर नेहमी असतो.. किंवा मग सीडी !!
टीप :
http://www.youtube.com/watch?v=Z3eBOcWmZw4&feature=related
या वरच्या लिंकमधे पहिला भाग दिलेला आहे. या यूट्यूबच्या बाजूलाच एक ते बारा असे भाग दिलेले आहेत. संपूर्ण सिनेमा इथेच पाहता येईल..
वाचने
7089
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्त आहे हा सिनेमा. पाहिला
धन्यवाद्स...
एट बिलो पाहिलेला होताच.
अप्रतिम सिनेमा. First day
हा सिनेमा जर धर्मेंद्र ने पाहिला तर
धन्स.
अप्रतिम आहे..
In reply to अप्रतिम आहे.. by मैत्र
परत सुरुवात चुकली आहे. एका
In reply to परत सुरुवात चुकली आहे. एका by प्रचेतस
धन्यवाद!
बघितलेला आहे हा
अप्रतिम आहे हा सिनेमा
अतिशय आवडलेला एक सिनेमा.
आवडला. फारच सुंदर.
धन्यवाद !
लई भारी पिच्कर आहे हा, जबरा
नाही पाहीला अजुन. माहीतीबद्दल
आता बघेन म्हणतो. बघायलाच हवा.
हा पिच्चर अस्तित्वात आहे असे
धन्यवाद...नक्की बघेन........
सिनेमा बघायलाच हवा असं वाटतं
In reply to सिनेमा बघायलाच हवा असं वाटतं by गवि
(No subject)
आताच पाहीला. कुत्र्यांच काम
मैत्र करेक्ट केल्याबद्दल
धन्यवाद...