संगीत समीक्षण : गँग्स ऑफ वासेपुर २
गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अनुराग कश्यपच्या कारकिर्दितला बहुचर्चित हुकुमी एक्का. स्नेहा खानवलकर या प्रतिभाशाली मराठी मुलीने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. "हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत. स्नेहा खानवलकरच्या वैविध्यपुर्ण आणि रचनात्मक प्रयोगांमुळे चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत.
१. ची चा लेदर : "दुर्गा" नामक १६ मुलीने हे गाणे गायले आहे. रेल्वेच्या डब्यात गाण्यापासुन ते ची चा लेदर पर्यतचा दुर्गाचा प्रवास रंजक आहे. हे गाणे त्याच्या उड्त्या चालीमुळे, बिहारी लहेजा आणि त्यात चपखल बसणारया शब्दांमुळे लक्षात राहते.
२.काला रे : शब्द - उत्तम, संगीत -उत्तम , गायकी - अप्रतिम. स्नेहाच्या ताज्या दमाच्या आवाजामुळे हे गाणे जमुन आले आहे. ड्रम बीट्स आणि बॅकग्राउंड्ला वॉयलिन हा संयोग मंत्रमुग्ध करतो.
३. इलेक्ट्रिक पिया : तबला, हार्मोनियम व ढोलकीच्या कल्पक मिलापातुन हे गाणे तयार झाले आहे. "रसिका डी राणी" या गायिकेच्या अस्सल आवाजामुळे हे गाणे विशेष लक्षात राहते. याच चित्रपटातील "तार बिजली" म्हणजे या गाण्याची मुळ कलाक्रुती होय.
४. मुरा : हे माझे या ध्वनिमुद्रिकेतले अतिशय आवडते गाणे. या गाण्यात मंडोलिन आणि गिटारचा सुरेख वापर करण्यात आला आहे. गाण्याचे हिंग्लिश बोल ही या गाण्याची जमेची बाजु.
असा हा वेगळ्या धाटणीचा आणि वैशिष्ठ्यपुर्ण प्रयोगांमुळे लक्षात राहिलेला अल्बम. पण प्रत्येकालाच ही गाणी रुचतिल की नाही हा भाग वेगळा...
याद्या
5799
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
वेगळं संगीत असलेली गाणी
येस्स ही गाणी वेगळ्या धाटणीची
लिंक प्लीज!
ही घ्या...
In reply to लिंक प्लीज! by बिपिन कार्यकर्ते
आय अॅम अ हंटर - हे मला
या सिनेमाचा दुसरा भाग आहे हे
काला रे गाणं मला खुप
हो खरंय...
In reply to काला रे गाणं मला खुप by वपाडाव
ही गाणी कुठे ऐकता येतील?
वर एका प्रतिसादात लिंक दिली आहे..
In reply to ही गाणी कुठे ऐकता येतील? by कॉमन मॅन
हम्म
प्रतिसाद फारच आवडला..
In reply to हम्म by रमताराम
हम्म..
In reply to हम्म by रमताराम
प्रत्येक शब्दाशी पूर्णतः
In reply to हम्म by रमताराम
पुलेशु
समीक्षण जे आहे ते रोचक
धन्स.