देशाबाहेरील काळा पैसा, भ्रष्टाचार या विषयांकरता बाबा रामदेवांचे आजपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे.. मैदानात ठिकठिकाणी त्या संदर्भातील फलक लागले आहेत. त्यातील एका फलकावर भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म. गांधी, सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, शिवछत्रपती या थोर राष्ट्रपुरुषांची चित्रे आणि त्या सर्वांच्या मधोमध थोडे मोठ्या आकाराचे रामदेवबाबांचे चेले असलेले आचार्य बाळकृष्ण यांचेही चित्र असलेला एक फलक लावला आहे..
"वरील सर्व मंडळींसारखेच आचार्य बाळकृष्णही तूर्तास तुरुंगात गेले आहेत, पण तेही इतर सर्व मंडळींप्रमाणेच देशाकरता तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे देशाकरता तुरुंगात जाणे हे आचार्य बाळकृष्णांकरता भूषणावहच आहे.. " असा काहीसा सूर असलेले निवेदन सदर फलकावर आहे..
हा फलक पाहून आमची खूपच करमणूक झाली.. खोट्या पारपत्राच्या संदर्भात, खोट्या पदव्यांच्या संदर्भात आणि नेपाळी नागरिकत्वाच्या संदर्भात कैदेत असलेले आचार्य बाळकृष्ण हे शिवछत्रपतींच्या रांगेत बसण्याइतकेच थोर आहेत हे आम्हा पामराला माहीत नव्हते..!
यातला करमणुकीचा भाग सोडून दिल्यास आमच्या मते सदर फलक हा शिवछत्रपतींसारख्या, भगतसिंगांसारख्या प्रखर राष्ट्रपुरुषांचा धडधडीत अपमान असून हे कृत्य राष्ट्रदोहाच्या शिक्षेस पात्र आहे असे आमचे मत आहे..
या छोटेखानी लेखाद्वारे लोकशाही मार्गाने आम्ही या फलकाचा आणि फलक लावणार्यांचा तीव्र निषेध करतो..
-- कॉमॅ.
वाचने
4163
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म.
>>बाळकृष्ण्च्या ऐवजी सत्य
In reply to भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म. by विजुभाऊ
कारण यांचे लागेबांधे असतात.
In reply to >>बाळकृष्ण्च्या ऐवजी सत्य by कॉमन मॅन
हम्म...
In reply to >>बाळकृष्ण्च्या ऐवजी सत्य by कॉमन मॅन
दादा,
In reply to हम्म... by दादा कोंडके
दॅट इज दॅट!
In reply to दादा, by आनंदी गोपाळ
प्रोटोकॉल
कैच्याकै
मला यात काही वाईट वाटले नाही.
रुमाल टाकून ठेवतो..
कशासाठी?
In reply to रुमाल टाकून ठेवतो.. by आनंदी गोपाळ
इस्कटून सांगा. काय कल्ला नाय
In reply to कशासाठी? by श्रावण मोडक
बूचमारे
In reply to कशासाठी? by श्रावण मोडक
जाऊ द्या हो.
In reply to बूचमारे by सुनील
आयड्या भारी
नवी कॉन्स्परसी थेअरी !!!
In reply to आयड्या भारी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावरील
हम्म्म
त्यांना रांगेत तुम्हीच बसवलंत